Monday, July 8, 2013

जेव्हा पासून break -up झालंय

जेव्हा पासून  break -up झालंय
मन कशातच लागत नाही
शोधत असते नजर माझी
ती मात्र कुठेच  दिसत नाही ....

खरे सांगू तुला
मी तिच्यावर खूप प्रेम करतो
पण तिला कुणास ठाऊक  हे का कळत नाही 
तिने हे असे वागावे
मला खरच काही  कळत नाही  ..

चुकी माझी एवढीच ना
मी  तुझी  जास्तच  काळजी करतो
का हे  तुला डोळ्यांत माझ्या दिसत नाही

जेव्हा पासून  break -up झालंय
सारखा  फोनकडे  पाहत असतो  मी
तुझा  call नाही तर एखादा massage  तरी येईल 
म्हणून फोन एक क्षण ही दूर ठेवत नाही मी

आता काय उरलंय  जगण्यात ह्या
प्रेम  माझे  हरवून  बसलो आहे मी
प्रेम युगुलांना पाहून  आता
त्यांच्यातच  तुला  पाहत असतो मी


जेव्हा पासून  break -up झालंय
वेड्यासारखाच    रात्री ही जागत असतो मी
तुझा  आवाज  ऐकू येईल म्हणून
डोळे मिटून  तुला आठवत असतो मी ...


जेव्हा पासून  break -up झालंय....
रोजच मरत असतो  मी ......
खूप  एकटा असतो मी .....

जेव्हा पासून  break -up झालंय....

1 comment:

Anonymous said...

जेव्हा पासून break -up झालंय
मन कशातच लागत नाही
शोधत असते नजर माझी
ती मात्र कुठेच दिसत नाही ....
realy awsom.