Sunday, July 28, 2013

Marathi Prem Kavita : पण ती येईल काय ?

आतुरतेने तिच्या येण्याची वाट बघतोय.
भेटीची तिच्या स्वप्न रंगवतोय.
दिशा दाखवणारी ती म्हणून वाट चुकतोय.
वाट चुकली म्हणून सावरायला तरी ती येईल काय ?
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची पुसणी करायला तरी ती येईल काय ?

लागताच चाहूल पावसाची आठवणीत तिच्या भिजायचय
तिच्या समवेत सरींमध्ये खूप खूप खेळायचय
एकाच आश्रयाखाली भिजलेली तिला बघायचय
थरथरनार्या शरीरातून अबोल आवाज ऐकायचाय
पण त्या सरी घेऊन तरी ती येईल काय ?

तिला फुल आवडतात म्हणून मला वेचायचीय.
केलेला गजरा मलाच तिच्या वेणीत माळायचाय.
सुगंधाने फुललेला चेहरा मला न्याहाळाचाय.
डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंना अलगद टिपायचाय.
पण फुलांचा येताना बहर तरी ती येईल काय ?

राणा वनात एकट्यानेच तिची वाट बघायचीय.
पश्चिमेकडून प्पुर्वेकडे जाणाऱ्या प्रत्येक सावलीत तिची प्रतिमा उमटवायचिय.
तिला वेड लावेल अशा चांदण्या रात्री तिला खुलवायचिय.
पण मला साखर झोपेतून उठवण्यासाठी तरी ती येईल काय ?

आली तरी माझ म्हणन ऐकून घेईल काय ?
डोळेभरून तिला पाहता यावे म्हणून तरी ती येईल काय ?
म्हणून तरी ती येईल काय ?

No comments: