Tuesday, April 22, 2014

दु:खांसोबत जगायला शिक....| Marathi Kavita On Life | मराठी लेख | Virah Kavita | कविता | Marathi Sad Prem Kavita For Boyfriend Girlfriend

हसायला शिक
जगायला शिक
उघड्या डोळ्यांनी दु:ख लपवुन
समोर जाऊन लढायला शिक

कुणी नाही ईथे कुणाचे
जिवाची तुझ्या किंमत करायला शिक

आपले म्हणायला रक्तही आपलेच
वाहुन गेलेल्या रक्ताला विसरायला शिक

काळजाला सारेच देतात वेदना
वेदनांसोबत तु मरायला शिक

कितीही स्वप्न तुटले तुझे
चंद्रासारखे मोठं मन करायला शिक.....

दु:खांसोबत तु जगायला शिक......
-
©प्रशांत डी शिंदे

तुला तर माझी आठवणही येत नसेल ..| Marathi Sad Love Poems | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | Marathi Break Up Prem Kavita

तुला तर माझी आठवणही  येत नसेल
माझ्या विचारांत ,माझ्या मनात फक्त तूच असतेस
कसे एकटे जगतो आहे मी
माझे मला खरेच कळत नाही

पुन्हा गर्दीत शोधतो तुला मी
एकट्या जीवाला ह्या
वेदनांत जळताना बघतो मी

तू मात्र कुठेच  दिसत नाहीस
त्या वाटा , ते लोक सारे काही  तसेच आहे
त्यामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसत नाही
नैराश्यात   जखडलो आहे मी
आता तर  स्वप्नांतही आधार असतो
खरेच एवढे कम नशिबी आहे का मी ..........

खूप त्रास होतो आता
तुझी सवय झाली आहे
तुला कळत नसेल ते
माझ्या भावना मात्र रडत राहतात

कसे समजवायचे  मला मी
आईचेही  डोळे  माझ्याकडे पाहून वाहतात
आईला म्हणतो माझीच  चुकी  आहे ही
खरेच प्रेम असे दुखावरचं खपलं असतं .........

आता पहिल्यासारखी आपली भेट होत नसते
सुन्या पडलेल्या रस्त्यावर त्या
तुझी सावली कुठेच सापडत नसते

तरी शोधत राहतो तुला
हि रात्र मला छळत  असते
मन  ऐकत नाही
फुला-पानांमध्ये तुला शोधतं

वेड लागले तुझे मला
तुझ्याच विचारांतचं हे माझे मन असतं

तुझे नाव  विसरावं वाटत
पण कसे  कळत नाही
सारखा भास होतो तुझा
दूर जाऊनसुद्धा
तू आजही परवा एवढीच जवळ वाटतेस

आता मी थकलो आहे
त्यात तुझ्या  आठवणींतच हरवलो आहे
तू पुन्हा येशील  ठाऊक नाही
आलीस तरी पुन्हा माझी होशील ठाऊक नाही ......

मी जेवढे तुला आठवतो
तेवढेच प्रेम तू देशील ठाऊक नाही ........

तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........

तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४

हजार तुकडे झाले ...!!| Marathi Kavita | मराठी लेख | Prem Virah Kavita | विरह कविता | Marathi Sad Prem Kavita For Boyfriend Girlfriend

दु:खावर   तु  हसुन
जगत  असशील  बेगडी
प्रेमभंग  केलास  तु
विरहाचा  डोंगर  डोकी
हजार  तुकडे  झाले
पडली  ह्रदयाला  भोकी ...!!!

काय  अपेक्षा  तुझ्याकङून
वाट  तुझी  ही  वेगळी
कसा  मी  जगतो  आहे
तुझ्याविन  तडपडतो  आहे
काय  सांगू   प्रिये  तुला
एकटेपणा  मला  छळतो  आहे ...!!!

जगणं  तुझं  वेगळं  आहे
त्यापेक्षा   मरण   बरं  आहे
विरह   तु  सोसूनही
एकटेपणा   पचवशील  गं
माहीत  नाही   कसं  काय  ते
पण   मी   मात्र  माणूस   आहे ...!!!


            
                  । कवि-डी ।
                    स्वलिखीत
                    दि 16. 04.14
                      वेळ. दुपारी.  01. 34

तुझ्यावर प्रेम करतो म्हणून ...!! | Marathi Love Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता | Marathi Love Poems

तुझ्यावर  प्रेम  करतो  म्हणून
मला  वेडा  समजू  नकोस ...!!

माझ्या  प्रेमाला  तु  आज
तराजूत  तोलू  नकोस ...!!

तुझं  सर्व  ऐकतो  म्हणून
मला  नौकर  समजू   नकोस ...!!

तुझी  वाट  बघतो  म्हणून
मला  प्रवासी  समजू  नकोस ...!!

तुझा   विचार  करतो  म्हणून
मला   नेता  समजू  नकोस ...!!

हसून   तुझ्याकडे  पाहतो  म्हणून
मला   जोकर   समजू   नकोस ...!!

माझं  प्रेम,  प्रेम   आहे
त्याला  झिरो  समजू   नकोस ...!!!


              । कवि-डी ।
               स्वलिखीत
              दि. 14.04.14
               वेळ. रात्री. 11.14

मी एव्हडा वेडा नव्हतो कधी !! | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता Facebook Share Poems

एकसारखा तुला पाहत होतो आधी
तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत होतो आधी
तुझ्या येण्याची वाट पाहत होतो आधी
मी एव्हढा वेडा नव्हतो कधी !!

तुझाच विचार करत होतो आधी
तुझ्या हसण्यात माझा आनंद होता आधी
तुझ्या दुःखात माझ दुःख होत आधी
मी एव्हढा वेडा नव्हतो कधी !!

तुझा आवाज ऐकायला तरसत होतो आधी
तुला मनवायला धावत होतो आधी
तुला हसवायला जोकर बनत होतो आधी
मी एव्हडा वेडा नव्हतो कधी !!

$vidyakalp$

भिंती प्रेमाच्या... | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता Facebook Marathi Poems

काहीं भिंती दगडाच्या
तर काही असतात
जाती धर्माच्या.
काही सत्तेच्या तर काही
प्रेमाच्या पण असतात.
प्रेम माणसाला,त्याग शिकवतो.
प्रेम मणसे जोडुन ठेवतो
प्रेम आनंद देतो
प्रेम जिवन जगायच शिकवतो
म्हणुनच प्रेमाच घर असाव,
पक्क- पक्क,
कधीना पडण्यासाठी....
प्रेमाच्या भिंती देतात,
सुख अण फक्त सुखच
कधी ना संपनार....
जपतात माणुसकी अण,जोडतात माणस प्रेमाचे...
म्हणुनच म्हणते,प्रेमाच्या भिंती असाव्यात
पक्या पक्या कधीना पडणा-या..

तरी का हि दूरी.. | Virah Kavita | विरह कविता | Marathi Prem Virah Kavita For Boyfriend Girlfriend

अनोळखी तू मला अन मी तुला,
  भेटलो जेव्हा पहिल्यांदा सूर जुळले तेव्हा........

बोलण्यातून एकमेकांस ओळखू लागलो,
  तू माझ्यातून तुला अन तुझ्यातून मला.......

हृदयाची तेव्हाच तू छेडली तार,
  तुझ्यात सारे भान हरपून गेलो,
   तुझ्या नजरेचे कितीतरी झेलत वार........

तुला विचारावे म्हटले जेव्हा जेव्हा,
  काय म्हणशील या भीतीनेच जात राहिला तोल तेव्हा तेव्हा.......

विचारिले तुला तू हो म्हणशील याच एका आशेने,
  नकार तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर अन,
   डोळे काही वेगळेच सांगत होते माझ्या दिशेने........

नाही तू म्हटलेस खरे पण,
  तुझे मन तरी मानत होते का? हे सारे.........

पुन्हा त्याच वाटेवर पुन्हा तू भेटलीस,
 नजरानजर होऊन मनात भरलीस........

यावेळेस तुझी नजर काही वेगळेच सांगत होती,
  माझ्या प्रेमाची कबुली तुझी नजरच देत होती........

होकार तुझा ऐकण्यास आतुर माझे मन,
   तुझ्या होकाराच्या आनंदात सजले माझे क्षण........

प्रेम जडले एकमेकांचे दोघांवर,
  तुझ्यात मी अन माझ्यात तू,
   हे सुखच आहे अनावर........

एके दिवशी वाटले किती दूर राहायचे आपण,
  होऊ वर वधू  तोडून जगाचे बंधन.........

आनंदाचे आकाश ठेंगणे घेऊन तुझ्याकडे आलो,
  तुझ्या मात्र एका नकाराने पूर्ण पणे खचलो........

कोणते असे कारण आहे जे तू सांगत नाही,
  प्रेम करते जीवापाड तरी तू ते दाखवत नाही........

कधी न कधी होशील कायमची माझी,
  येशील सारी बंधने लाथाडून तू आहे सतत वाट पाहण्यास तुझी..........

वाट तुझी पाहीन चातकापरी,
  राहतेस माझ्या मनी तरी का हि दूरी........
   राहतेस माझ्या मनी तरी का हि दूरी........ @कविता@

असं कसं प्रेम तुझं .....!!! | Prem Kavita | प्रेम कविता | विरह कविता | Marathi Prem Kavita For Boyfriend Girlfriend

असं  कसं  प्रेम  तुझं
ना  भुक  ना  तहान  आहे
तुला  भेटावया  आज
मन   माझं  व्याकुळ  आहे ...!!

असं  कसं  प्रेम  तुझं
फक्त   तुझाचं  ध्यास  आहे
तुला  पाहण्यासाठी  आज
मन  माझं  कासावीस  आहे ...!!

असं  कसं  प्रेम  तुझं
उद्योग  ना  दुसरा  व्याप  आहे
तुझ्यावर  प्रेम  करण्याचं
मला  फक्त   काम   आहे ...!!

असं   कसं  प्रेम   तुझं
तुझाचं  फोटो  ह्रदयात  आहे
तुझा  आवाज  ऐकण्याठी
मन  माझं  उतावीळ   आहे ...!!

असं  कसं  प्रेम  तुझं
मन  माझं   बेभान  आहे
फक्त  तु  तु  आणि   तु
एवढचं   त्याला   माहीत   आहे ...!!!


                । कवि-डी ।
                 स्वलिखीत
                 दि. 14.04.14
                 वेळ .सकाळी.  07. 10

Monday, April 21, 2014

आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते । Marathi Sad Kavita | Marathi Lonely Poems | Feeling Empty Sad Marathi Kavita

खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप
भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच
बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत
नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते
जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू
पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब
खाली.. पडल्या वाचून राहत
नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला | Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Funny Kavita For Facebook | Marathi Facebook Page

एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा -
अधिकारी म्हणाला. " रावणाला कोणी मारला ?" -
ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला -
प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला,
मास्तरांना म्हणाला -
"रावणाला कोणी मारला, का येत
नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" -
म्हणाला
मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला,
की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर
बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ? 

Saturday, April 19, 2014

वाटतं कधी-कधी आपलंही कुणी असावं…..! Marathi Kavita | मराठी लेख | Prem Virah Kavita | विरह कविता

वाटतं कधी-कधी आपलंही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..,
मग तिच्याच समजूतीने क्शनभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलंही कुणी असावं…..!!
वाटतं कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……,
ह्ळूच येवून तिने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटतं कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलंही कुणी असावं…..!!
वाटतं कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटतं कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात
पडावं…..!!

Sunday, April 6, 2014

टाईम पास २ Timepass 2 | Matathi Funny Kavita Facebook Share | Marathi Vinodi Facebook Post

टाईम पास २

माधवराव लेले भटाची चाळ सोडुन
पुण्याला राहायला जातात.तिथेच स्थायिक
होतात.प्राजक्ता तिथल्याच एका कॉलेज मध्ये प्रवेश
घेते.पण ती अजून दगडुला विसरलेली नसते.
दगडु बरोबर घालवलेले सोनेरी क्षण तिच्या मनात
आठवण बनुन राहीलेले असतात.ती परत
कोणाच्या प्रेमाचा विचार करू शकत
नाही.त्या दरम्यान वल्लभ
माधवरावांच्या मर्जी विरूध्द स्पृहा शी लग्न करतो.
त्या मुळे माधवराव नाराज होतात.ते वल्लभ
ला घराबाहेर काढतात.वल्लभ व स्पृहा वेगळे
राहायला जातात.त्यामुळे प्राजक्ता ने जर परत काय
चूक केली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी माधवराव
देतात.३,४ वर्षांचा कालावधी जातो.एक हँडसम,
स्मार्ट मुलगा प्राजक्ताच्या कॉलेज मध्ये
एंट्री करतो.त्याचे नाव असते रॉकी.त्यावेळेस
रॉकी समोर काही मुले एका मुलीची छेड काढत असतात.
ती मुलगी दुसरी कोणी नसुन
प्राजक्ता असते.रॉकी त्या मुलांची धुलाई
करतो.प्राजक्ता रॉकीचे आभार मानायला लागते.पण
रॉकी "ईट्स माय ड्युटी " असं म्हणुन तिथुन निघतो.पुढे
रॉकी प्रा.ची.बर्याच संकटात मदत करतो.त्यामुळे
ती दोघे चांगले मित्र बनतात.एकदा माधवराव
लेलेंच्या गाडी समोर मुलगी आल्याने अपघात होतो.
लोक माधवरावांना मारायला लागतात.पण ऐन
वेळी रॉकी तिथे येऊन त्यांना मदत करून
त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. त्यामुळे
रॉकीचे इंप्रेशन माधवरावांवर पडते. पुढे रॉ.
प्रा.ला प्रपोज करतो.पण आपली प्राजू रॉकीला नकार
देते.ती म्हणते आपण फक्त चांगले मित्र आहोत व दगडु
बद्दल त्याला सर्व सांगते. मग रॉकी प्राजु ला एक
गिफ्ट देऊन निघुन जातो. ती ते उघडून पाहते तर
त्या मध्ये मोरपंख व तिचा फोटो असतो ती आनंदात
त्याला पळतच जाऊन घट्ट मिठी मारते. व म्हणते.आज
पर्यंत का लपवुन ठेवलेस...
तेव्हा रॉ. म्हणतो मला पहायचं होतं
की मी तुझ्या मनात अजून कितीसा शिल्लक आहे.
प्राजू:-माझे प्रेम टाईम बरोबर पास होणारे नव्हते.
दगडुने सायकल चालवुन नंतर बाईक रेसिंग करुन कसे पैसे
जमा केले व १२ वी मध्ये ८५ टक्के मार्क़स कसे काढले
वगैरे ....वगैरे..
हे सांगताना माधवराव लेले सर्व ऐकत असतात.ते
त्याची माफी मागतात.
पण रॉकी तुमच्या मुली मुळे काहीतरी करु शकलो.
पुढे काय....
दोघांचं लग्न....
व वल्लभ आणि स्पृहा चा स्वीकार....

संपला पिक्चर

तुझा आठवणी पुसट होत चाललेल्या | Virah Kavita | विरह कविता | Marathi Virah Kavita Facebook

तुझा आठवणी पुसट होत चाललेल्या,
तुझ्या आठवणी,
तरी मनात घर करुन बसलेल्या ,
तुझ्या आठवणी ,
डोळ्यात पाणी आणणार्या ,
तुझ्या आठवणी ,
मग लगेचच हसवणार्या ,
तुझ्या आठवणी ,
चांदण्या राञी माझ्यासोबत बसणार्या ,
तुझ्या आठवणी ,
आपलि कहाणी चांदण्यांन सांगणार्या ,
तुझ्या आठवणी ,
माझ्या सोबत कविता करणार्या ,
तुझ्या आठवणी ,
त्या कविता गाणार्या देखिल ,
तुझ्या आठवणी ,
माझ्यासवे पावसात भिजणार्या ,
तुझ्या आठवणी ,
खिडकित बसुन पावसाचे थेंब
वेचणार्या देखिल ,
तुझ्याच आठवणी ,
माझ्याशी अखंड बडबडणार्या ,
तुझ्याच आठवणी ,
मख अचानक मूकं होणार्या देखिल ,
तुझ्याच आठवणी ,
कितीहि हरवल्या तरी परत
सापडणार्या ,
तुझ्या आठवणी,
तुझ्याविना जगताना पण
आता उरल्या त्या "फक्त" तुझ्या आठवणी ,,,
तुझ्या आठवणी,,,
तुझ्या आठवणी

एकांत | मराठी लेख | Marathi Virah Kavita Facebook | विरह कविता | Facebook Sad Marathi Page

एकांत…।
ज्याला हवाय त्याला न मिळणारा, आणि
ज्याला नकोय त्याची साथ कधीही न
सोडणारा।
एकांत
नदीकिनारी, थंडगार निसर्गात
हवा हवासा वाटणारा ,
रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे
काळजात घर करणारा ।
एकांत
मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगत
डोलावणारा , खवळलेल्या समुद्रात त्याच
मनाला हेलकावे घ्यायला लावणारा ।
एकांत
आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ
पाहणारा , त्याच चक्रव्युहातून बाहेर
पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा ।
एकांत
पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर
गाण्यासारखा भासणारा , तोच चिवचिवाट,
जीवन किती बेसूर आहे याची जाणीव करून
देणारा ।
एकांत
येणाऱ्या आयुष्याकडे आशेने
पाहायला शिकवणारा , आयुष्यभर होऊन
गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा ।
एकांत
चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा , तीच
रेघ हळूच अश्रूंनी मिटणारा ।
एकांत
निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा ,
जगणाऱ्याला आतल्या आत मारणारा ।
एकांत । ।

मी फक्त तुझाच आहे | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता For Facebook Posts

मी फक्त तुझाच आहे
कारण मी फक्त तुझाच आहे ,
रात्रीचे हे चांदणे तुझ्यासाठी आहे,
हवेतला हा गारवा तुझ्यासाठी आहे,
मला रोज पडणारे एक नवीन स्वप्न
तुझ्यासाठी आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
माझ्यासाठी तर तू एक स्वप्न आहेस,
पण तरीही मी तुझी मनात एक आठवण
जपली आहे,
माझ्या मनाचा एक कप्पा सदैव
तुझ्यासाठी आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
तू आठवणीत असलीस तरी मला आठवणीत
जगण्याची इच्छा नाही आहे,
पण इच्छे शिवाय जगण्यास
हि काही अर्थ नाही आहे,
म्हणूनच माझी जगण्याची एक इच्छा तू
आहेस,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
मनात इच्छा खूप आहेत पण या इच्छेत
असलेली तू सोबत
नाही आहेस,
आणि तू सोबत नाही म्हणून
जगण्यालाही काही अर्थ
नाही आहे,
तू सोबत नसलीस म्हणून काय झाले
तुझी आठवण तर सोबत
आहे,
तुझ्या आठवणीत जगण्यात हि एक वेगळीच
मजा आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ...!!!.....

एक जोडपं | Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Funny Kavita For Facebook

एक जोडपं आपल्या २
वर्षाच्या मुलाला घेऊन नवीन
रूम मध्ये
शिफ्ट झालं, सकाळ मजेत
गेली, रात्री तीघ जन
झोपी गेले..
.
सकाळी उठल्यावर
पोरगा बापाला म्हणाला,
“पप्पा, आपला नवीन
बाथरूम
जादूचा आहे..”
.
बाप म्हणाला, “हो का..?? कस
काय रे?”
.
पोरगा म्हणाला,
“मी दरवाजा उघडला तर
लाईट चालू झाली,
मी सु-सु केली,
आणि दरवाजा बंद केला तर
आपोआप लाईट बंद झाली”…
.
बापाला पण नवल वाटलं,
बायको धावत आत गेली,
आणि बाहेर येऊन पोराला धु-
धु-धुतला..
.
बाप म्हणाला,
“त्याला का मारतेस?”..
बायको म्हणाली,
.
.
.
.
.
.
.
.
.
“अहो हा नालायक फ्रीज
मध्ये
मुतला बघा..!!!

उरलेल्या आठवणी चाफतोय | Marathi Miss You Kavita | मराठी विरह कविता | Athavani

घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट
करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...
आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे
वजा,
वर्गात
केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात
अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून
कधी घेतलेली रजा...
आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील
भेळ...
जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत
मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने
थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र
असायची,
पण तरीही पालक
सभेला दांडी मारायची तयारीच असायची...
शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच
असायची,
त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर
शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच
गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस
पाहतोय.... आणि फ़क्त
उरलेल्या आठवणी चाफतोय

ते प्रेम आहे | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते
...ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो
...ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही
...ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
...ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते
...ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही
जिच्यासाठी ख़ुशी मागता
...ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही
... ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
...ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि
नंतर एकांतात हसू येते
...ते प्रेम आहे
हि पोस्त वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण आली
...ते प्रेम आहे.

देव जोड्या वरुन बनवून पाठवतो | मराठी लेख | Sad Kavita | विरह कविता | Marathi Virah Kavita Facebook

म्हणतात,
देव जोड्या वरुन बनवून
पाठवतो........
मग चुकीच्या व्यक्तिवर प्रेम
का करायला लावतो.......
शेवटी नशीबात आहे तिच मिळणार
ना......
मग चुकिच्या व्यक्तिची वाटच
का पहायला लावतो.....

Saturday, April 5, 2014

तुझी इच्छा मी पूर्ण केली | Marathi Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | Facebook Marathi Page

तुझी इच्छा मी पर्ण केली....
तुझ्या आयुष्यातून मी निघून गेलोय..
मंग का रडतेस आता...
तुला रडण्या वेळी खांदा देणारा मीच
होतो...
तुझे दुख; स्वतः वर घेणारा मीच होतो..
तू माझी झाली नाही..... पण
मी तुझा झालोय...
आणि फक्त तुझाच राहील...
तुझी इच्छा मी पूर्ण केली..
मंग का रडतेस...
का रडतेस....