पण हवंहवंस का वाटू लागतं?
"फक्त मैत्री" म्हणता म्हणता
मैत्रीची सीमा का गाठू लागतं?
आतापर्यंत शहाणं राहिलेलं हे मन
अचानक वेड्यासारखं का वागू लागतं?
उद्या तिच्याशी काय बोलावं या विचारात
रात्र रात्र ते जागू लागतं.
हळू हळू वाटू लागतं कि
तिला हि याच भावना आहेत.
हेच गृहीत धरून मन मला
"carry on, carry on" सांगू लागतं.
सहज कधी बोलता बोलता
अचानक मन हळवं होतं.
रुजलेल्या भावनांचा खुलासा
तिच्यासमोर करून देतं.
तिच्या मनात तसं काहीच नाही
हे इथवर पोहोचल्यावर उमगतं.
कायम उंच भराऱ्या घेणारं हे मन
क्षणांत असं मग कोमेजून निघतं.
एखादया परक्यासाठी कायम
का हे मन असं झुरतं?
ज्याला किंमत नाही प्रेमाची
त्यावरच का ते प्रेम करतं?
No comments:
Post a Comment