Sunday, April 19, 2015

माहित नाही तू जवळ असल्याचा इतका भास का होतो | Marathi Kavita For GirlFriend/Her | Best Marathi Poems Online | Read Best Prem Kavita Online

माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो …

जेव्हा माझे हृदयाचे ठोके वाढतात
तेव्हा बोलत असतात  तुझे ओंठ शांतपणे…
जेव्हा थंड हवेत पण श्वासाची  गरम झळ येते
तेव्हा तुझे डोळे साद घालत असतात  निवांतपणे….

जेव्हा तुझा चेहरा अभिप्राय घेवून येतो
तेव्हा तुझें चित्र डोळ्यात पोहत असतात ….
जेव्हा तो निष्पाप प्रश्न घेवून येतो
तेव्हा मला भिंतीवरचे आरसे सुधा बघत असतात…

तुला कोणताच वचन दिला नाही मी
मग मी तुझी वाट का पाहत असतो …
अनावश्यकपणे संमती मिळाल्यावर
हा हृदय खूप अस्वस्थ का असतो……

माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो …

 - प्रसाद गावंड

फक्त तू थोड समजून घे ना | Marathi Kavita for GirlFriend / Her | Best Marathi Kavita For Girlfreind | Busy Life MArathi Kavita

माहित आहे मला की मी खुप busy असतो
पण तुझा विचार माझ्या मनात नेहमी असतो
फक्त तू थोड समजून घे ना

माहित आहे मला की मी तुला कॉल करत नाही
पण तुझ्याशी बोलायला मी ही तितकाच् आसुरलेला होइ
फक्त तू थोड समजून घे ना

माहीत आहे मला मी तुला खुप कमी वेळ देतो
पण तुझ्याशिवाय माझा वेळ
तरी कुठे जातो
फक्त तू थोड समजून घे ना

माहित आहे मला की मी पूर्वी सारख तुझ्याशि चॅटींग करत
नाही
पण मन मात्र नेहमी  तुझ्याशीच चॅटींग करताना ऑनलाइन होई
फक्त तू थोड समजून घे ना
फक्त तू थोड समजून घे ना.......

गजेंद्र वळवि

एकटा मी पडलो आहे | Lonely Marathi KAvita | Marathi Kavita on Alone | Ekta, Feeling Lonelly Marathi KAvita

आज पुनः आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे

बघ आज गुलमोहर पुनः बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत

ती सायंकाळची वेळ पुनः आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत


वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे

पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर  संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे

सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस

तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे

आज पुनः गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत
कारण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

गजेंद्र वळवि

अजब हे जग | Marathi Motivational Kavita | Kavita On Life in Marathi | Inspirational Motivational Best Marathi Kavita

किती निराळ असते ते बालपण
जिथे वडिलांची शिकवण आणि आई ची माया असते,
भविष्यतल्या अजब असलेल्या जगाची आपल्याला सवय नसते

कधी हळूच दूर होते ती साथ
आपल्याला मात्र ते कळत नसते,
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते

पोटा पाण्यासाठी दूर निघुन यावे लागते
पण मनात मात्र ती वडिलांची साथ आणि आई च्या मायेची उणीव भास्ते

लोकांच्या या गर्दीत कोण मित्र आणि कोण शत्रु हे आपणच समजून घ्यावे लागते
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते

ईथे स्वतःच्या जीवना पेक्षा
दुसर्याच्या जीवनात लोकांचा जास्त लक्ष असतो
कारण दुसर्याच्या झखमेवर मलम लावण्या पेक्षा त्यावर मीठ चोळणे यातच लोकांना जास्त रस असतो

स्वार्थी बनून गेलेल्या या जगात
आपण मात्र मरत असतो
वाटते की वडिलांची साथ
आणि आई ची माया
किती बरी असते
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते

तुझ्यावर प्रेम केल्याची | Virah Sad Marathi Kavita | Best Sad Marathi Kavita Blog | Virah Kavita Heart Touching Poems in Marathi

प्रेमात आणि युद्धात
सगळ काही माफ म्हणतात
पण तरीही मी भोगतो शिक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची ...!!

एवढाच माझा गुन्हा
प्रेम तुझ्यावर केले मी
पण तरीही पाहतेस परीक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची...!!

तु आणि फक्त तु
एवढेच दिसले मला
पण तरीही देतेस दिक्षा
तुझ्यावर प्रेम केल्याची...!!
.
.
.
.
.
              कवि-डी
              स्वलिखीत

का दिले आहे मन ? | Prem Kavita | Feelings Marathi Kavita | Kavita on Feelings | Marathi Kavita Blog

तुझ्या आठवणीची एक एक लाट ,
आज तुला भेटावे म्हणुन  सांगत आहे !

का अशी रागावुंन दुर आहेस तू ,
कशी तू अशी ,नाराज होऊ शकतेस तू !

अग मी तुझाच आहे ,
का हेच नेमके विसरतेस तू !

मन का दिले आहे ,
तूच एकदा सांग न मला !

मनात तूच आहेस फक्त ,
हेच जाणवत आहे मला!


मी इकडे तर तू तिकडे ,
का हा दुरावा असे आपल्यात !

तुझ्या हातात घालुन बांगड्या ,
माझ्या नावचे कुंकु कपाळी तुझ्या !

गळ्यात मंगलसूत्र माझ्या नावाचे ,
समोर हवी तू मला आता . !

तरी ही मन का दिले आहे,
सांग ना तूच मला ……….


क्षितीज समर्पण| 

Exam माझा प्रेमाची | Love Poem in Marathi | Best Love Poems in Marathi | Prem Kavita Marathi BLog

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
हासत हासत ती
उत्तर मला लिही का म्हणाली.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
पेपर च्या प्रतेक पानावर
मी नाव तीच लिहायलो.
नाव लिहिताच लेखणी
माझी आज का लाजायलि.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
या कोऱ्या कागदावर
तिच्या सोबत चे ते क्षण ही मी मांडायलो.
हासत हासत मी तिला हे का सांगायलो.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
माझ्या प्रेमाच्या पेपर मधे
प्रश्ण ती आवघड टाकायली.
मला ती तीच्या पासून
दूर करण्याचे प्रयत्न का करायलि.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि
प्रतेक पानावर तिचेच
नाव लेखणी माझी का लिहायली.
माझ्यापासून ती प्रतेक क्षण दुर का करायली.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
लिहिता लिहिता ते शेवटचे पान  ही आले.
आर्धावर ते माझे प्रेम का संपले.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
पेपर संमपताच घंटा ती वाजली.
माझा या आयुष्यातून तिचे नाव ही समंपवली.
मला तवा का असे वाटले.
हे पेपर का लवकर सूटले.

Exam माझा प्रेमाची
आज ती घेयायलि.
हे आसे घडताच लेखणी का माझी रडली.
पाना वरती लिहिलेली ही प्रेम कथा का आसी
समंपलि.
           
                                 कवी
                                बबलू 

Monday, April 13, 2015

मला काय माहीत तू अशी निघशील | Prem Break up Kavita in Marathi | Love Lost Poems in Marathi | Sad Break up kavita

मला काय माहीत
तू अशी निघशील....

माझ्याशी प्रेम करून
दुसर्याचा हात धरशील.....!

मी समजलो की, माझ्यावर
तु करतेस खुप प्रेम
खरंतर, मी तुला समजलोच नाही
हा होता माझा भ्रम
चालता-चालता वळणावरी
माझा हात सोडशील......

मला काय माहीत, तु
अशी निघशील..
मी तुझ्या नावे केले
होते माझे जीवन
खरंतर, मला तेंव्हाच कळायला पाहीजे होते

का घेतले उगीचच जिवंतपणी मरण
गोड बोलता- बोलता एका दिवशी
माझ्या ह्रदयाचे छेद करशील....

मला काय
माहीत, तु अशी निघशील...
तुला बघितल्यावर मला मिळायचे
सार्या जगाच बळ

खरंतर, मी समजू शकलो नाही
माझ्या नशिबाला आणि तुला
त्यातही तुझा चालूच होता छळ
छळता- छळता एका दिवशी
सार्या जगाशी हरवशील....

मला काय माहीत
तु, अशी निघशील.....
मी तुला दोष देत नाही
तु तर निरपराधी होतीस
खरंतर, मीच केला होता गुन्हा
आताही माझ्या वेड्या मनाला
आस आहे तुझी
पण चेहरा दिसणार नाही पुन्हा
वाटलं होतं मी मरता- मरता तरी
अखेरच्या क्षणाला फक्त
एकदा तरी भेटशील....

मला काय माहीत,
तु अशी निघशील......

स्वलिखित - Prem Mandale

मी तुझी होणार नाही | Virah Prem Kavita | Sad Dukhi Love Poems in Marathi font | Virah Heart Touching Marathi Prem Kavita

मी तुझी होणार नाही
माझं स्वप्न ही बघु नकोस
हाती तुझ्या काही लागणार नाही
प्रेम माझ्यावर करु नकोस

मी काही दिवसांची सोबती रे
न्यायला मला मरण आलंय रे
माझ्यात मन गुंतवु नकोस
स्वताहुन स्वताला फसवु नकोस

मी गेल्यावर खुपच रडशील
एकांताच्या विरहात उसासे सोडशील
माझ्यासाठी स्वताला दुखवु नकोस
मेल्यावर ही मला रडवु नकोस

मी सांगितले तिला शेवटचे
आतातरी मला अडवु नकोस
अंतर दुराव्याचे अजुन वाढवु नकोस
राहिलेत जे दिवस तुझे ते
तरी माझ्यापासुन हिरावु नकोस
प्रेमच प्रेम करु दे मला
मिठीतुन तुझ्या दुर करु नकोस
आयुष्यभर पुरेल मला प्रेम तुझे
साठवण्यापासुन मला रोखु नकोस...!
कवी-गणेश साळुंखे...! 

माझं तुला होऊदे | Heart Touching Prem Kavita Online | Best Prem Kavita Read Online | Marathi Kavita Blog in Marathi Font

तुझ्या प्रीतीला प्रीत म्हणून जुळूदे
तुझ्या अश्रूंना हलकेच मला पुसूदे
तुझ्या ओठांना साद माझ्या ओठांची
तुझ्या मनाचे ओठांना काही बोलुदे

माझ्या नावाचं फुल तुझ्या हृदयात खिलला
माझ्या जीवनाला साथ तुझी जचुदे
माझ्या गीताला गोळ स्वर हलकेच मिळता
माझ्या शब्दांना चाल तुझी मिळूदे

तुझ्या हृदयात साठवली स्वप्न अपार
तुझ्या स्वप्नांची पूर्ती मला करुदे
तुझ्या अंगणात उभी माझ्या जीवनाची गाळी
तुझ्या होकाराने तिला पुढे चालुदे

माझ्या मधुर प्रेमाला तू परखुनी चाल
माझ्या प्रेमाला तू काही वाव दे
तुझ्या मनाला सांग दगळ होऊ नको
तुझ्या मनाला माझं मन भिळूदे

आणी माझं तुला होऊदे

शशिकांत शांडीले (SD), नागपूर 

प्रेम केले अति | Prem Kavita Read Online | Best Prem Kavita For Facebook Whatsapp Share

प्रेम केले अति
तेथीची माझी झाली  माती ...!!

ठेवीला तुझ्यावर विश्वास
तेथीची झाला माझा घात ...!!

दिली तुला मोकळीक
तेथीची हरवले स्वातंत्र माझे ...!!

देवाहूनी पुजीले तुला
तेथीची माझा दगड झाला...!!

ह्रदयात ठेवीले तुला
तेथीची प्रेमाचा चुरा झाला...!!

सोन्यासारखी दिली किंमत
तेथीची माझी उतरली कळा...!!

जीवापैक्षाही घेतली काळजी
तेथीची पेटला वनवा मनी ...!!

चुक झाली उमजली मला
पायातली चप्पल पायात ठेवीली ...!!

.                     कवि-डी
                       स्वलिखीत
                   दि.30.03.2015
                  सकाळी 06.52

Sunday, April 12, 2015

मरण हि अता यायणा | Marathi Prem Kavita Blog Online | Read Prem Kavita Online | Marathi Blog

मनी दडलेल्या प्रश्नाचे
उत्तर अजूनही मिळेना
का जगतोय मी
हेच नेमकी कळेना....

जीवनाला माझ्या
अर्थ का मिळेना
अर्थ हिन् जगण्यास
सावरता यायना...

नागमोडया जीवनाची
वाट काही मिळेना
दिशा दाखवण्यास
कुणी वाटाडया ही दिसेना...

साथ हवी होती तूजी
साथ काही मिळेना
हात हवा होता हाती
तो हात तुझा मिळेना...

अंधारमय जीवनात माझ्या
रंग अता यायना
रंग हिन् आयुष्यात
कुणी रंग ही भरेना...

प्रेमाच्या नात्यात
अता गुंतावेसे वाटेन
हृद्याचा धागा
कुणाशि ही जुळववासा वाटेना...

अन वाटले तरी
तुझ्याविना हृदयात कुणीच् उतरेना...

आता कुणातच
मन हे वेडे रमेणा
तुझ्याविना ह्रदय
कुणासाठी ही धडकेना...

एकटे जीवन असे
किती दिवस जगू
श्वास सोडवावासा वाटतोय
पण मरण ही अता यायना...

इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस | Best Prem Kavita in Marathi | Read Marathi Poems Online | Marathi Long Poems

इतकी रागावलीस....
इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुला माहित आहे ना
तुला किती miss करतो सर्वात जास्त तर
तुझ्यावरच प्रेम करतो
तुटलेले मन परत जोडणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात
नाही
तु नसलीस की मन
कशातही रमत नाही
एकदातरी हास ना
की कधीच हसणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुझ्याशी नाही बोललो
तर अन्न गोड लागत नाही
हरवलेल्या नझरेला
दुसर काही दिसत नाही
ए सांग ना ग आता की काहीच सांगणार
नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
कोणी प्रेम नाही दिले
सर्वांनीच झिडकारले
ह्या दुर्दैवी जीवाला फक्त तूच प्रेम दिलेस
कसे फेडू उपकार तुझे
सात जन्मांत जमणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
प्रेमाची किंमत मलाच कळू शकते
माणसांची किंमत
तुलाच मात्र कळते
तु नाही विचारले तर
मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
माझ्या हृदयात तर
फक्त तू आणि तूच आहेस
पण तुझ्या हृदयात मला
छोटीशीही जागा देणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
♥→→♥←←♥
एक प्रियकर..M.jare

मला प्रियसि नाही | Marathi Kavita on Love | Prem Kavita For Whatsapp | Marathi Kavita Read Online

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला एका
मुलीवर प्रेम का झाले रे
मन हे माझे तिच्यातच
का दडले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला तिच्या
रुपाचे वेड का लागले रे
तिला पाहताच मन का
माझे फुलले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही तिचे मला छंद
का लागले रे
मनात माझ्या तिचे गंध
का पसरले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही क्षणो क्षणी
तिचे भास का झाले रे
ती समोर आल्यावर
माझे शब्द का रुकले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
खरच मला प्रियसि नाही
तरी ही आसे का घडले रे
तिला पाहताच मन माझे
 वेडे का झाले रे

        (आज तरी माझी कोणी प्रियसि होईल का ?
         आज तरी कोणी माझ्या मनाला सावरील का ?
         आज तरी कोणी मला होकार देईल का ?
         आज तरी एकांत माझे दूर कोणी करील का ? )
           

                     कवी
                बबलु पिस्के 

जेव्हा तू येशील परतून कधी | Marathi Virah Sad Dukhi Prem Kavita | Read Sad Marathi Poems Online

जेव्हा तू येशील परतून कधी
तेव्हा हि मी तसाच असेल
तितकाच हट्टी,तितकाच वेडा
जितका तुझ्या बाबतीत अगोदर होतो.
ना कधी सुधरणार मी
ना तुला कधी विसरणार मी
तितकेच प्रेम करेन तुझ्यावर
जितके या अगोदर करत होतो.
मी हा असाच आहे
आणि असाच राहीन
तितकेच दुःख पचवून जगेन
जितके या अगोदर जगत होतो
हे सगळ फक्त एका होकरावर बदलेल
पुन्हा एखदा जीवनात आनंद रुजवेल
तितकाच समाधानी होईल मी
जितका या अगोदर कधीच नव्हतो..
स्वलिखित - Prem Mandale

Sunday, April 5, 2015

मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत | Sad Dukhi Prem Kavita Blog | Marathi Poems Online | Virah Marathi Kavita

माझा ब्रेकअप झाल्यानंतर
१४ फेब्रुवारी २०१२ ला
मी माझ्या प्रियासीला व्हेंलनटाईन
डे Wish
करण्यासाठी
फेसबुकवर केलेला शेवटचा मेसेज.....

मलाचं माहित नाही मी रोज,
कसा जगण्याचा प्रयत्न करतोय,
तुला न आठवावे म्हणुन
स्वःताला नेहमी बिझी ठेवण्या प्रयत्न
करतोय.....

काय माहीत ?
माझ्या सोबत का असे झाले,
ज्यांना आपले म्हटले,
तेचं आज मलाचं परखे झाले.....

किती प्रेम करतो मी तुझ्यावर,
हे तुला कधीचं कळणार नाही,
माझे खरे प्रेम आहे तुझ्यावर,
टाईमपास किँवा पोरखेळ नाही.....

तु सुध्दा माझ्याशी,
परख्यासारखी वागलीस,
एका चुकीच्या निर्णयाने,
माझा त्याग करुन निघून गेलीस.....

रोज रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी,
देवा मला दुसरा दिवस दाखवु नकोस,
अशी नेहमी प्रार्थना करतोय.....

रोजचं तुझ्या आठवणीत झुरतोय,
रोजचं तळमळतोय,
रोजचं धडपडतोय,
अडखळतोय तळमळतोय तडफडतोय.....

रोजचं रडत रडत
स्वतःला फसवण्याचा,
अर्थहीन निरुपयोगी प्रयत्न
करतोय,
रोजचं झिरपनारे अश्रूं पितोय.....

मी तुझ्यावर खुप खुप प्रेम
करतो गं,
जसे काल करत होतो,
तसे आजही करतोय,
" I LOVE YOU...
Shona.....
मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत.....

यानंतर तिने मला,
" SAME TO YOU बोलून,
BLOCK केले.....


स्वलिखित -
दिनांक १४-०२-२०१२...
रात्री ००,०९...
© सुरेश सोनावणे.....

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते | Marathi Prem Kavita For Her | Best Marathi Prem Kavita | Marathi KAvita For Facebook Whatsapp Hike

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
ती समोर असली कि काही सुचेनासे होते
पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेनासे होते
अन ती निघून गेली कि
उत्तरांची गर्दी मनात दाटून येते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
चंद्र बघताना ती आठवते
अन तिला बघितले कि चंद्राकडे बघायचे राहून जाते
रात्री जागून चांदण्या मोजताना रात्र संपून जाते
स्वप्नांचीही पहाट होते झोपायचे मात्र राहून जाते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
अल्लड वारा तिच्या येण्याची खुण देऊन जातो
अन गेला गेला म्हणता पाऊस पुन्हा येऊन जातो
पावसातून चालत राहतो फक्त भिजायचे मात्र राहून जाते ...

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
नास्तिक आहे म्हणता म्हणता तिच्यासाठी आता देवासमोर जातो
मला काहीच नको असे म्हणून तिलाच मागून जातो .....
हात जोडून उभा राहतो फक्त नवस बोलायचे मात्र राहून जाते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
मी प्रेमात पडूच शकत नाही असं बोलून
तिच्यात प्रेम शोधत राहतो
ती आल्यावर स्तब्ध होऊन जातो फक्त
मनातले बोलायचे मात्र राहून जाते ....
का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .

तू असताना | Marathi Miss You Kavita Blog | Marathi Prem Kavita For Her/GirlFriend

तू असताना कधीच वाटलं न्हवत
तुझ्याशिवाय आयुष्य एवढं भयाण असेल
तुझ्यासोबतचे सर्व क्षण एवढे अंगावर येतील
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं .............

तुझी वाट बघताना तेव्हा एक गंमत होती
पण आता तीच गंमत जीव कासावीस करेल न्हवत वाटलं

भातुकलीचा खेळ खेळता खेळता
राणी अर्ध्यावरती सोडून जाईल न्हवत वाटलं
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....

पावसाचा प्रत्येक थेंब तुझ्या ओंजळीत झेलायचीस तू
पण माझ्या डोळ्यांतला पाऊस झेलायला तू नसशील न्हवत वाटलं

रखरखीत उन्हात माझी सावली व्हायचीस तू
पण आता पाऊसही असा रखरखीत वाटेल न्हवत वाटलं
खरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....

तूच माझे आयुष्य आहेस असे बोलता बोलता
आयुष्य माझे इतके कमी असेल कधीच न्हवत वाटलं
खरंच तू असताना.........

शिक्षा तुलाही अन मलाही | Heart Touchng Break-Up Marathi Poem | Sad Dukhi Emotional Marathi Kavita | Prem Kavita Blog Online

आपणच देऊ चल एकमेकांस शिक्षा..
विसर तू मला, मी तुला आठवणार नाही..

आपण वागू असेही एकदम परक्यासारखे
भेट होता तुझी , मी ओळखही दाखवणार नाही

कधी आलीस अचानक तू माझ्या समोर
तू अनोळखी असेल , मी जराही हसणार नाही

जरी जीवापाड प्रेम केलं मी तुझ्यावर
आजपासून तुला , स्वप्नातही बघणारं नाही

कितीही काळीज जळालं तुझ्या प्रेमासाठी
ती आग तुला , कधीच मी दाखवणार नाही

पण कुठलीही वेदना आली चुकून तुझ्याजवळ
तर तुझ्यासाठी मी , जीव देण्यास डगमगणार नाही .
----------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. २८ . ९ . १३   

Saturday, April 4, 2015

कसे सावरू मनाला नेमका हाच पेच आहे | Prem Kavita Blog | Prem Kavita For Her/GirlFriend | Share on Facebook Whatsapp Hike Skype

का प्रत्येक श्वासात तिचीच आस आहे
मिटलेल्या पापण्यांत का तिचाच आभास आहे...........
का तिची वाट बघत मन अजूनही त्याच ठिकाणी स्तब्ध आहे
का भावना गोठलेल्या आहेत अन डोळे निशब्द आहेत..........
का अजूनही पाउस कोरडा आहे अन का संध्याकाळ धूसर
का अजूनही स्वप्नं जागी आहेत अन का पुस्तकातले गुलाबाचे फूल ओलसर...........
का आहे ह्रदय असे थंड अन का आहेत श्वास उष्ण
का अजूनही प्रश्न अनुत्तरित आहेत अन का प्रत्येक उत्तरामागे एक नविन प्रश्न..............
सरल्या क्षणात का अजूनही रूप तिचे तेच आहे
कसे सावरू मनाला नेमका हाच पेच आहे.....................

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो | Prem Kavita blog | Read Best Marathi Poems Online

प्रेमात कधी घडतो तर कधी बिघडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करतो

पण त्यांना सांगताना का तो अडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याची वाट बघताना ती अन तिची वाट बघताना तो का बरं चिडतो

कितीही भांडलो तरी पुन्हा एकत्र येण्यासाठी का बरं धडपडतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याने जरा दुसरीकडे बघितले तर ती अन तिने बघितले तर तो का ओरडतो

गर्दीत तिला कुणाचा धक्का लागू नये म्हणून का तो तिला जवळ ओढतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

का कुणी आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन आपला हात सोडतो

का कुणी दाखवलेली स्वप्नं एका क्षणात मोडतो

अन का आपण हस-या चेह-याने या जगासमोर रडतो

कारण.....

की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस | Prem Kavita Online | Love Poems In Marathi | Read Marathi Kavita Online

मनातले अबोल भाव,
हळूच अश्रूंने खोलतेस,
मी जवळ येताच,
गोड गोड लाजतेस.....

कळत नाही अदा तुझी,
का तु असे वागतेस,
कधी दूर असूनही,
जवळपास भासतेस.....

कधी स्वप्नात येऊन,
झोपेत बडबडतेस,
कधी मधाळ हसतेस,
कधी तान्ह्या बाळासारखी रडतेस.....

कधी अचानक रुसतेस,
कधी प्रेमाचे मनवतेस,
कधी खुप खुप ओरडतेस,
कधी sorry बोलतेस.....

कधी i love u म्हणतेस,
कधी i hate u बोलून छळतेस,
कधी जवळ करतेस,
कधी दूर लोटतेस.....

कधी miss-call करुन सतवतेस,
कधी call न उचलतास cut करतेस,
कधी उबदार मिठीत घेतेस,
कधी क्षणोक्षणी तरसवतेस.....

कधी दुराव्याच्या गोष्टी करतेस,
कधी आपलसं करुन टाकतेस,
कधी परख्यागत वागतेस,
कधी मला माझ्या पासून चोरतेस.....

कधी वाट बघतेस,
कधी वाट चुकतेस,
कधी खुप खुप आठवतेस,
कधी विसरुन जातेस.....

खरच कळत नाही मला,
का तु असे करतेस,
मला जानून बुजून छळतेस,
की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....

की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....


स्वलिखित -
दिनांक २९-०९-२०१३...
सकाळी ०८,२९...
© सुरेश सोनावणे.....

प्रेम हे असंच असतं | Prem Kavita on Love | Marathi Prem Kavita Blog | Read Marathi Poems Online

प्रेम हे असंच असतं ........
जेव्हा जवळ असतं
तेव्हा ते कळत नसतं
जेव्हा ते कळत
तेव्हा ते जवळ नसत
प्रेम हे असंच असतं ......
जेव्हा कसतरी होतं
तेव्हा प्रेम झालंय हे कळत
जेव्हा प्रेम झालंय हे कळत
तेव्हा कसतरी होण काळजात घुसतं
प्रेम हे असंच असतं .......
जेव्हा तिला विचारावसं वाटतं
तेव्हा ही योग्य वेळ नाही असं वाटतं
जेव्हा कळत  प्रत्येकवेळी आपल्याला ही योग्य वेळ नाही असं वाटतंय
तेव्हा कुठं फायनल विचारायचं धाडस होतंय
प्रेम हे असंच असतं ........
जेव्हा उत्तर हो  कळत
तेव्हा मन सगळं जग विसरतं
जेव्हा हे स्वार्थी जग विसरतं
तेव्हा कुठं हे खरं प्रेम झालेलं असतं
प्रेम हे असंच असतं ............

मयुर जाधव 

एक स्वप्न होते माझे | Marathi Athavani Kavita | Sad Dukhi Prem Kavita in Marathi | Miss You Marathi Kavita

एक स्वप्न होते माझे,
तुला आपले करायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला राणी बनवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला सर्व सुख द्यायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुझे दुःख माझ्यावर घ्यायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला मनसोक्त हसवायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला स्वप्नात पहायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुझ्या जखमे फुंकर
मारायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला ह्रदयात ठेवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला लाजताना पहायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला प्रेम रंगात रंगवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला बहूपाशात घ्यायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला घट्ट मिठीत कवटाळायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला डोळे भरुन पहायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला मनात साठवायचे.....

एक स्वप्न होते माझे,
तुला सुखात ठेवायचे,
एक स्वप्न होते माझे,
तुला मरणाच्या शेवटी आठवायचे.....

सा-या आयुष्याची झाली माती,
माझे एक स्वप्न अधुरे राहीले,
तुला माझ्या डोळ्यासमोर,
दुस-याची होताना पाहीले.....

आता मनात पक्के ठरवले की,
काहीही करुन तुला कायमचे
विसरायचे,
तुला कधीच न आठवायचे,
तुझ्या आठवणीत नाही रडायचे.....


स्वलिखित -
दिनांक २९-०९-२०१३...
दुपारी ०४,०५...
© सुरेश सोनावणे.....

मन माझं उनाड | Sad Prem Kavita in Marathi | Miss you Heart touching Marathi Kavita in Marathi Font

हे मन माझं उनाड आता
एका जागेवर नाही बसत
कितीही सौंदर्य बघितलं
तरी याच मन नाही भरत  ???

दिवसभर फिरून फिरून
रात्री जेंव्हा माझ्याकडे येत
कितीही सौंदर्य बघितलं असलं तरी
तुझ्याच आठवणीत रडून
रडून मग झोपी जात

@सतीश भूमकर