Saturday, June 27, 2015

तू होणार नाहीस माझी | Heart Touching Prem Kavita For Her/GirlFriend | Ek Tarfi Prem Kavita | One Sided Love Poems in Marathi

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,
तू आहेस माझी स्वप्न परी, नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वाऱ्यावरी,
येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जपुनी ,
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
 माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

एक मैत्रिण आहे | FriendShip Kavita in Marathi | Marathi Kavita on Maitri/Friend | Girl freind MArathi Kavita

एक मैत्रिण आहे माझी...
 नेहमी सलवार-कमीज़ घालणारी....
 साधेपणातच सौंदर्य आहे....
 हे सिद्ध करणारी,
 ... ... एक मैत्रिण आहे माझी...
 ... हिशोबिपणे वागणारी,
 तिच्या या सवयीमुळे.....
 माझे पैसे वाचवणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 कठोरतेने वागणारी,
 जरा ओरडलो की मात्र.....
 मुसू मुसू रडणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 माझ्यावर
 सारखी चिडणारी,
 न कळत मात्र.... माझ
 आयुष्य फुलवणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
 माझ्याशिवाय मात्र....
 स्वतःला अपूर्ण
 मानणारी.........

Friday, June 26, 2015

ती अशी का वागते | Marathi Prem Kavita For GrilFriend | Best Love Poems in Marathi | Nice Marathi Kavita Online

कधी पाहतेस , कधी पाहून हसतेस
पण येताच समोर मी , चटकन निघून जातेस
जाता माज्या डोक्यात हजार प्रश्न करते ,
अजुनही कलले नाही, ती अशी का वागते ?
फेसबुकवर ती चट्टिंग मात्र करते
पण काही विचारल तर सरळ नाही म्हणून सांगते
प्रत्येकवेली तिच्यापुढे मन माजे हरते
अजुनही कलेल नाही, ती अशी का वागते ?
कधी स्वताच समोर येते , डोळे इशारे करते
हाक दिल्यावर मात्र, मैत्रीन आहे म्हणते
काय कराव मला तेच नाही कलते,
अजुनही कलले नाही, ती अशी का वागते ?
एवढ सर्व होउनही ती तशीच वागते
पण तरीही ती मला हवीहवीशी वाटते
कारण हे वेड मन तिच्यातच रमते
पण प्रश्न अजुनही तोच ...
ती अशी का वागते

तुझ्या शिवाय मला दुसर | Marathi Kavita For GirlFriend on Love | Prem Kavita for GirlFriend in Marathi Font

तुझ्या शिवाय मला दुसर
काहीच आठवत नाही
तू मात्र माझ्या खेरीच
दुसर काहीच विसरत नाहीस
तुझ्या शिवाय एक क्षण सुद्धा
मला जगवत नाही
मात्र एक क्षण पुरत देखील
तू मला आपल मानत नाहीस
तुझ्या शिवाय बघितलेल्या प्रत्येक
स्वप्नाला माझ्या मते काही अर्थ नाही
तुला पडलेल्या स्वप्नात मात्र
तू मला कधी शोधलेच नाही

Thursday, June 25, 2015

एकदा मला भेटशील का? Heart Touching Marathi Kavita | Heart Touching Emotional Marathi Kavita on Love

वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का

...पहिला तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास

तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढ़ायचास

काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास

दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायचास
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिडवायचास

माझा चेहरा पडला तर
खुप नाराज होयचास
हळूच जवळ घेउन
सॉरी बोलायचास

आज ही मला तुझा
सारखा होतो भास्
कारे असा वागतोस
का देतोस त्रास

नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास.

आठवण काढू नको म्हणालीस | Break Up Marathi Kavita | Heart Touching Marathi Poems on Love

आठवण काढू नको म्हणालीस
तरी ते शक्य आहे का..??
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का..??
तुझ्या इतक समजून घेणारी मला
दुसरी कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाली
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी तिच्या मध्ये शोधू शकेल का....??
तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसरी मध्ये नाही सापडणार
कारण..,
तू ति आहेस जिच्यासाठी मी जगतोय
आणि तू म्हणतेस आठवण काढू नकोस......

तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला काही अर्थ असेल का..??

Wednesday, June 24, 2015

तिने लग्न केले तर | Prem Virah Kavita | Dukhi Prem Kavita | Virah Kavita in Marahit Sad Poems

तिने लग्न केले तर
सांग काय करशील ?
आडात जीव देशील
का झाडा लटकशील ?

तिचा जीव घेशील का
आम्ल अंगी फेकशील ?
प्रेमासाठी वाट्टेल ते
जगा या दाखवशील ?

सांगता न ये मनाची
काय उर्मी उसळेल
सूड क्रोध अपमान
अवहेलनी जळेल

मनावरी ताबा कुणा
आग होईल विझेल
पण सांगतो ऐक रे
ते तुझे प्रेम नसेल

हवेपणी हपापले
पशुत्व फक्त असेल
नरकाच्या नरकात
जगणे एक उरेल

विक्रांत प्रभाकर 

असं ही कधीतरी घडावं | Romantic Love Poems in MArathi | Romantic Prem Kavita in Marathi

मला पाहताच तुझं हृदय धडधडावं
कोणाची पर्वा न करता, तुझ्या डोळ्यांनी मला एकटक बघावं
मी ऐकत नसतानाही, तू बडबड करावं
असं ही कधीतरी घडावं ……

तुझं हृदय माझ्या प्रेमात पडावं
माझ्या एका शब्दासाठी तू हि तरसावं
स्वप्नात मी येईल या आशेने, रात्र-दिवस झोपावं
असं ही कधीतरी घडावं ……

मी कोणाशी बोलताना त्याने ही थोडं जळावं
स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम करावं
आज मी झुरते त्याच्यासाठी, त्याने हि थोडं झुरावं
असं ही कधीतरी घडावं ……


शितल ………

Tuesday, June 23, 2015

आज मला चिंब होऊन भिजायचय | Marathi KAvita on Paus Rain | Rain Poems in Marathi | Marathi Kavita On Rain in Marathi Font

(आज थोडा गारवा होता हवेमध्ये, हलका हलका पाऊसही टिमटीमायला लागला.  मन खूप शांत होतं, त्याच्या आठवणी नाही, दुःख नाही.
मनाच्या खूप खोलवर जाऊन पाहिलं आज काहीच वाटत नव्हत. आणि त्याच शांततेतून उमगली हि कविता ……)

जुन्या आठवणींना कुशीत सामवून
डोळ्यांमधे आशा जागवुन
पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला हर्षाने झेलायचंय …
आज मला खरंच भिजायचय……….

भान सारे हरपून जातील
दुखः सारे संपून जातील
या गार वाऱ्याच्या स्पर्शाने
ओंझळीत अश्रू सांडतील
या भरलेल्या हृदयाला निथळायचय……
आज मला चिंब होऊन भिजायचय ………

शितल …….

तो पहिला पाऊस | First Rain Marathi Kavita | Poems on Rain in Marathi | Paus Marathi Kavita

मनसोक्त बरसणारा,
चिंब भिजवणारा,
प्रेम व्यक्त करणारा,
तो पहिला पाऊस ……….

अंगावर शहारे आणणारा,
चेहऱ्यावर आनंद ठेवणारा,
सर्वांना हवा हवासा वाटणारा,
तो पहिला पाऊस ……….

कवींचे शब्द फुलवणारा,
चहाचा घोट नवा वाटणारा,
धरतीस आसुसलेला,
तो पहिला पाऊस ……….

ऒल्या नजरांना प्रेमात पाडणारा,
एकाच छत्रीत जवळ आणणारा,
त्याची आठवण देणारा,
तो पहिला पाऊस ………

पहिल्या पावसाच्या चिंब भिजलेल्या शुभेच्छा !

शितल ……

Monday, June 22, 2015

प्रेम माझे तुझ्या साठी | Marathi Romantic Prem Kavita For Her | Romantic Poems in Marathi | Romantic Marathi Kavita Blog

प्रेम माझे तुझ्या साठी
मनात का राहिले...!
तू आज तरी मिळशील
मजला ते का बोलले...!

वाट तुझी ही वीणा
कारण मन माझे पाहिले...!
ना तुला हे कळाले...!
ना मला हे  कळाले...!

प्रेम तुझे ना पाहता
मनास का हे भाळले...!
प्रेमात तुझ्या जगण्या
साठी घोट मधाचे मी घेटले...!

नाम तुजे ना माहीत मला
प्रेम तुजवर मी केले...!
वीणा कारण मी स्वप्न
तुझे हे आसे आज सजवले...!

प्रेम माझे तुझ्या साठी
मनात का राहिले...!
तुज्या रुपाचे चित्र मी
मनात का रंगविले...!

           कवी-बबलु 

राहून गेलं | Prem Kavita Romantic | Love Kavita In Marathi | Prem KAvita For Her

प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं
राहून गेलं,

तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते
सांगायचं राहून गेलं.

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल
ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते
घडायचं राहून गेलं.

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर
डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना
माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं.

तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-
हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय
काढायचं राहून गेलं.

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल
जीवाची असह्य होई,
त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला
अडवायचं राहून गेलं.....

स्वलिखित - Prem Mandale

Sunday, June 21, 2015

आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस | Prem Kavita | Romantic Marathi Poems in Love Poems in Marathi

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे
असेच ते जपुन ठेव..
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस

सोम मडिवाल
पुणे अप्पर

एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच | Marathi Lonely Kavita in Marathi | Alone Kavita in Marathi | Ekta Feeling Lonely Kavita Marathi

कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो,
 पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत...........
कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते तिच्या सहवासात राहण्याची
 आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत
 आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच .

Saturday, June 20, 2015

जीवन कसं असतं ? | Marathi Poems on Reality Life | Poems on Life in Marathi | Life Kavita in Marathi | Real Life Poems in Marathi

जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं …
स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं

मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं
लागतं …
आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले
दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न
पडतात…
कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं
वाटतं …
जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते ठाऊक
नसतं ...
मरणं आपल्या हातात नसतं असे लोक
म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं
याचा विचार करायला ते विसरतात …

का मलाच तुझी इतकी आठवण येते | Miss You Very Much Marathi Kavita | Miss You Kavita in Marathi | Missing You MArathi Poems

का मलाच तुझी इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते,
प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते,
तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते,
स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते,
बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते,
रोज रात्री निजतांना उचकी गं लागते?
तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते,
प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते,
हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते....

सोमनाथ मडिवाल
पुणे अप्पर

Friday, June 19, 2015

सुंदर मन सहज भेटू शकत नाही | Marathi Kavita On Mann | Poems in Marathi Language | Beautifull Romantic Prem Kavita

कितीही सुंदर चेहरा असला तरी,
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी,
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,
पण खंर प्रेम मिळवायचं असेल,
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल,
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो,
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..

सोम मडिवाल
पुणे अप्पर

मला तुझा व्हायचं | Marathi Kavita For GirlFriend | Poems For GirlFriend | Romantic Prem Marathi Kavita

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचेआहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटल्या क्षण
पर्यंत तुझ व्हायचं...

सोमनाथ मडिवाल
पुणे अप्पर

Thursday, June 18, 2015

तुझ्यावर प्रेम करण्यासाठी | Prem Kavita For GirlFriend/Her | Love Prem Kavita Online Blog in Marathi Font

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..
तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..
अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

सोम मडिवाल
पुणे अप्पर

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही | Marathi Kavita For Her | Marathi Poems for GirlFriend

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन,
फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे,
तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात,
तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

सोम मडिवाल
पुणे अप्पर

Wednesday, June 17, 2015

असं फक्त प्रेमच असतं | Marathi Prem Feelings Kavita in Marathi | Poems in Marathi on Feelings

पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात

फिलींग | MArathi Kavita on Feelings | Feelings Marathi Poems | Feelings For You Marathi Kavita

खूप खूप वाटतं केव्हा तरी,
धावत तुझ्याजवळ जावं..
बाहुपाशात घेऊन तुला...,
सारं जगं विसरावं...
गतकाळच्या आठवणींना,
पुन्हा एकदा जागवावं...
दु:ख सार सारून,
तुला डोळ्यांत साठवावं...
आयुष्याच्या संध्याकाळी,
बेधुंद होऊन जगावं...
उरलेल्या दिवसांसाठी,
सुःख जरा मागावं...
छेडून अंतरंगाची तार,
सुःखद स्वप्नांना जागवावं...

Tuesday, June 16, 2015

धावपळ | Life Kavita in Marathi | Poems on Life in Marathi Font | Marathi Kavita For Life Reality

काय ठाऊक काय झालं
माझं मन मला म्हणालं
का तू विचारात असतो
सतत दुखातच दिसतो

का करतो इतकी मरमर
आरामही नाही क्षणभर
इवल्यास्या पोटासाठी
कितीरे करतो धावपळ

मीही सांगितली ती गऱ्हाणी
एकट्या पोटाची चिंता नाही
थोडा आहेरे कुटुंबाचा भार
म्हणून करतो हा कारभार

आई बाबा नी बायको पोरं
यांचा करतो फक्त विचार
माझी तर कतेलच जिंदगी
त्यांच्या सुखाला हा आधार

त्यांना तर मीच एक आधार
माझ्यावीन होतील लाचार
रडायला नको मी नसतांना
म्हणून हि धावपळ जगतांना

म्हणून हि धावपळ जगतांना

शशिकांत शांडीले (SD), नागपूर

पहिला पाऊस | Paus Marathi Kavita | Marathi Kavita on Rain | Poems on Rain in Marathi

पहिल्या पावसाच्या पडण्याने
मना-मनाचा आनंद उदंड होतो
पहिल्या पावसाच्या भिजण्याने
इथे मातीचा सुध्दा सुगंध येतो

मात्र या नैसर्गिक रीतीवरतीही
प्रदुषणीय प्रताप होऊ शकतो
अन् पहिल्या पावसाचा कुठे
दुर्गंध सुध्दा येऊ शकतो,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.

Friday, June 12, 2015

तू भेटलीस तर ठीक | Funny Vinodi Marathi Kavita in Marathi Language | Vinodi Marathi Poems

मुलांनो, मुलींना कधी Serious  घेवू नका , Time pass करा ...
Serious जर घ्याल तर नक्कीच फुक्कट मराल...
Time pass कराल तर राहाल आयुष्यात सुखी ,
भेटली तर पारो नाहीतर चंद्रमुखी ...
शेवटी पारो किवा चंद्रमुखी कोणाचीच जागा Fix नसते ,
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो , लग्नासाठी बोलू नका , Propose मारा
शेवटी लग्नासाठी एकतर "पती परमेश्वर" नाहीतर कायमचा "रामेश्वर"  
Propose मध्ये होकार मिळाला तर ठीक ....
नाहीतर मैत्री तर उरलेलीच असते ,
मैत्री मध्ये थोड्याच दिवसात पोरगी हसते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

मुलांनो Love करू नका, पण Try जरूर करा
शेवटी प्रेमात "हो" किवा "नाही" असते ,
प्रयत्नात "हि" नाहीतर "ती" असते
ती भेटली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण छान दिसते ....

पण काय सांगू मित्रांनो...., सर्वांची "ती" अशीच असते
कधी स्वतःहून येत असते तर कधी जबरदस्तीने जात असते ...
कारण तुमच्या त्या वेडीलाही प्रेमाची खरी गम्मत माहित नसते ....
म्हणून सांगाच  त्यांना ....
तू भेटलीस तर ठीक नाहीतर  तुझी मैत्रीण तयारच असते....

मैत्री विरुद्ध प्रेम | Friendship Poems in Marathi | Kavita For Friendship in Marathi Font

एका मुली - मुलात कधी
निखळ मैत्री का हो नसते ?
नेहमी त्यांच नात काहो
प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा
आणि मित्रा -मित्रात मजा
मुली -मुलाच्याच मैत्रीला
प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण
आणि खो घालतो सहवास
हळू हळू  वाढते जवलिक
अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोळक्यात मधून
तो थोडा वेगळा होतो
प्रेमाच्या त्या जादुपोटी
कावळ्यांमध्ये बगळा  होतो

तीही नंतर दूर होते
चिव चीवणाऱ्या सखिंपासून
त्या बिचाऱ्या पाहत रहातात
तीच वागन आवासून

त्या दोघांच बोलन मग
विषय विषायानी वाढत जात
मैत्री सारख पवित्र प्रेम
आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगळे  होतात
निरोप देतात मैत्रीला
विराम पडतो त्यांच्याशिवाय
हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात
औपचारिकतेने बोलायला
सख्या फक्त सख्या रहातात
खोट्या गप्पा तोलायला

त्या घोळक्यातील  मुला मुलित
दरी पडत जाते खोल
प्रत्येकाला मिळते  साथ
ढासळत  जातो मैत्रीतला  तोल

मैत्री मधली शुद्धता
प्रेमामुळे  झिरपत जाते
प्रेम आणि मैत्रीमध्ये
मैत्री तेवढी विखरत  जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती
हळू हळू  फ़स्त होते
फुटकळ  अशा प्रेमासाठी
खरी मैत्री पण स्वस्त होते

कोण नसते कोणाचे | Lonely Alone Sad Marathi Kavita | Dukhi Poems in Marathi

1)कोण नसते कोणाचे
ढग  नसतात आकाशाचे  
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
समुद्र नसतो किना-याचा
स्वार्थ असतो सगळ्यांचा....
 तरी ठाम असते जवळ येणे सा-यांचे.........

2)कोण नसते कोणाचे
ढग  नसतात आकाशाचे  
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
आपलेच डोळे आपणच पुसायचे
जीवनाचे पुस्तक परत एकदा उघडायचे
त्यात मग डोकावून पाहायचे
सुख दुखांचे क्षण आठवायचे
आणि हसत हसत मृतुच्या दारी येऊन बसायचे .

३) कोण नसते  कोणाचे ,
ढग  नसतात आकाशाचे  
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
तरीही अपुरे आहोत  दोघे हि
जसे क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचे ..
चेतन र राजगुरु .

आपलीशी वाटणारी व्यक्ति | Virah Kavita In Marathi Font | Dukhi Sad Kavita in Marathi

आपलीशी वाटणारी व्यक्ति सुद्दा

मधेच सोडून जातात

विश्वास सम्पादन करून

विश्वासघात करतात

कधीच भरणार नाही असे

घाव मनाला देवून जातात

auther unknown

सोबत घलवितात फ़क्त

मोजकेच दिवस

पण आयुष्यभर विसरणार नाही

असे आठवणी देवून जातात

प्रेम केल होत मी तुझ्यावर

मला सोडून तू कशी काय राहशील

आज मी जिथे तुझी वाट पाहत आहे

उदया तूच तिथे माझी वाट पाहशील

आज ही ती | Marathi Virah Dukhi Kavita | Dukhi Sad Marathi Poems in Marathi Font

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही
चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही
सगळयान्बरोबर असताना हसून दुःख लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती
मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी जानवलीच नाही
ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत नव्हती ?
याचे उत्तर एकच समजले मला,
मी आपली मैत्रिण समजत होतो जिला
तिने मला आपला मित्र कधी मानलेच नाही...
आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही....

तु मला आवडतेस | Marathi Love Prem Kavita For GirlFriend/Her | Prem Kavita in Marathi Font

तु मला आवडतेस
ही कविता असेल असे मलाही वाटत नाही, आणी याला कोणी कविता म्हणावी अशी
माझी इच्छाही नाही. हे नुसतेच जुळलेले शब्द आहेत, भावना दर्शवण्यासाठी
एकत्र जमलेले. तुम्हास शब्दांपलीकडचे वाचता आले तर तुमची जीत, पण आवडली
नाही तर माझी हार.



तु मला आवडतेस.

नाही !
मी प्रेम करत नाही तुझ्यावर !
पण होय… तु मला आवडतेस.
याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.
कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.
याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.
कारण, ’आवड’ नी ’प्रेम’ यात फरक आहे.
आवड ’मर्यादीत’.
म्हणुनच त्याला विशेषणांची ’गरज’ आहे.
उगाच का म्हणतो आपण,
थोडं आवडतं… जास्त आवडतं.
कधी म्हणताना ऎकलंय ?
“माझं थोडंसच प्रेम होतं !”

पण प्रेम ? प्रेम म्हणजे…?
आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,
आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !
मग वाट कशीही असो,
काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.
आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं
असंतर मला कधीच वाटलं नाही.
म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही.

पण, तु मला आवडतेस.
तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !
नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.
होय, तुझ्या असण्यामुळं.
नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा….
’सोबत असण्यामुळं.’
हे जास्त बरोबर आहे.
बस्स ! अशीच सोबत रहा.
कारण…

तु मला आवडतेस

माझे शाळेतले प्रश्न | Marathi School Poems | Funny Vinodi Marathi Kavita on School Shala

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.

प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------

प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.

मराठीत भाषांतर करा.

चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात...........

Monday, June 8, 2015

मी मित्र नाही | Marathi Friendship Kavita | Kavita on Maitri | Marathi Poems For Friend | Friendship Poems in Marathi

मैत्रीच्या नादात फसवून
मी करतो विश्वासघात
माझा मित्र बनण्याचा
तू करू नको रे नाद

दुष्ट आहेत विचार माझे
कपटी माझ मन
चुकून जरी झालास मित्र
हरवून बसशील आयुष्याच रण

दूर राहा माझ्या पासून
मी.. मित्र नाही
शत्रू मी तुझ्या यशाचा
यशाचं सूत्र नाही

राहिलास जर मजपाशी
तू सर्वच गमवून बसशील
आयुष्य च वाया गेल्यावर
तू काय रे कमवशील

सावध ! हो आधीच
हि शेवटची चेतावणी
परत रडू नको
तुझी झाल्यावर कानउघाडणी

भरपूर मित्र भेटतील तुला
इथे मी एकटाच नाही
हाथ पुढे कर एकदा
तुला भेटतील भरपूर काही.

नको तुझ दुःख
आणि नको तुझ सुख
एकटच राहायला आवडत
मला नाही मैत्रीची भूख

कसे सांगायचे तुला | Marathi Poems For Her | Marathi Kavita For GirlFriend

कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात
भेटीचा आनंद की विरहाची नशा झाली  ह्या जीवनात

तुझ्या मनात राहायचे आहे एवढेच स्वप्न माझे
तुझ्यासोबतच आयुष्य जगायचे
बांधायचे होते घरटे छोटेसे  माझे

तु म्हणशील ती दिशा होती
तूच आरसा माझा
तूच माझे जग अन तूच होता आधार माझा

कसे सांगायचे तुला
हे आयुष्य म्हणजेच आहेस तू
तू नाहीस तर आहे अधुरे जीवन माझे

दुरावा कसा येतो
क्षणिक शब्दांच्या चर्चेत
हरवून जातात स्वप्न अन मिळतात फक्त मोती आसवांचे

कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या  ह्या मनात ....................
-
 ©प्रशांत डी शिंदे....
दि. १९-०१-२०१५

माझं हे आयुष्यं | Marathi Dukhi Kavita | Sad Life Poems in Marathi

माझं हे आयुष्यं म्हणत
आयुष्यं निघुन जातं
शेवटी काय? ....
तर म्हणे देहामधला हा आत्मा
शरीर सोडुन जातं
कुठं जातं?
कुठुन येतं काही ठाऊक नाही
फक्त मरणातंर त्याला
कुणीही नाव ठेऊन जातं....
-
©प्रशांत डी शिंदे....
२२ /०८/२०१४

खूप चांगला डाव खेळते नशिबही | Marathi Kavita On Nashib | Life Marathi Poems

खूप  चांगला डाव  खेळते नशिबही
डोळ्यांनाही अंधत्व देत असतं प्रेमही

विश्वासाची  नाती  राहिलीच कुठे
आधार तर  देतात परकेही
पण साऱ्यांत असूनही  नेहमी  एकटाच मी  ........

असाच मी  मोहात अडकून  नात्यांच्या
शोधू लागलो  रेशीमगाठी  आपुलकीच्या

समोरच होते आपलेही माझेच  त्यांना म्हणायचो
पण  निर्णय नेहमीच  होते   चुकीचेच

शोधले  आपले मी   माणसांतही
पण  देहावरही शेवटी  येणार होते फुले  ती मतलबाचीच     ......

खूप चांगला डाव  खेळते हे  नशीबही .........
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१९/११/२०१३
स.१०.२४ मि

फक्त तुझ्यासाठी | Marathi Poems For Her/GirlFriend | Heart Touching Marathi Poems Gor Her

आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....

Sunday, June 7, 2015

ति बदलत जातेय |Virah Marathi Kavita in Marathi Font | Virah Kavita Marathi Blog

काल पर्यत माझ ऐकणारी,
मी सांगेल ते करणारी ती
बदलत चालली आहे...

नेहमी माझ्या प्रश्नाला उत्तर
देणारी माझी ती,
आज मलाच प्रश्न विचारत
चालली आहे..
खरचं ती बदलत चालली आहे..

मला लोकांशी कमी बोल
ते विश्वास घात करतात
सांगणारी ति आज माझाच
हात एकटा सोडुन चाललीये..
खरच ती खुप बदलत चाललीये..

... सिध्दार्थ पाटील ™…
.. दि. १५.०७.२०१३ ..

माझे अधुरे राहिलेले प्रेम | Marathi Love Story Poems | Marathi Stories Online

प्रेम तर सारेच करतात  काहींचे प्रेम  पूर्ण होतं जे  एकमेकांना मिळून जातात सुखाचा संसार  होतो   तर
काहींचा  प्रेम अधुरे राहतं  जसे  माझे  माझेही  प्रेम अधुरेच राहिले . ह्या अधुरे राहिलेले प्रेम म्हणजे खूपच  आठवणीने  भरलेलं समुद्र  आणि त्या समुद्रात  आपली भरकटलेली होडी ,पण  त्या होडीला  किनारा च   सापडत नाही तसेच  आठवण खूप येते पण ती  मिळतच नाही .
माझे हि प्रेम  असेच झाले  ते कधी झाले  कळलेच नाही  पण मला कळले तेव्हा उशीर झाला  होता .  ती खूप चांगली होती तिला मी आवडायचो   पण माझा स्वभाव मस्तीखोर  त्या मुले  तिचे प्रेमही मी मस्ती मध्ये नेले  जे मला नंतर  जाणवले  मी केवढी मोठी चुकी केली , पण काय करू आता  ते पूर्ण होणार नाही . तिच्या प्रेमापुढे मी शून्य ठरलो   मी समजूच शकलो नाही तिच्या प्रेमाला कारण ती वेळ होती शाळेची  मी आणि ती सोबतच शिकायचो  आठवी इयत्ते पासून आम्ही एकाच  क्लास   मध्ये होतो .  ती आमच्या सरांची ची भाची होती  आमचे  सर म्हणजे  तिचे मामा  त्यांना काहीही बोललो  आर तिला राग यायचा  आणि  मी मुद्दाम बोलून तिची मजा घ्यायचो  ..  ते दिवस मला आज हि आठवतात ..
 एक  दिवस होता शिक्षक दिनाचा  आम्ही सगळ्यांनी साजरा करायचे ठरवले  आमचा क्लास सकाळचा असायचा  आम्ही मुले सकाळीच जायचो  सर्वांच्या अगोदर   मस्त मजा करायचो  एक  तास  आणि नंतर मुली यायच्या  तसेच  त्याही दिवशी  आम्ही लवकर गेलो  आणि क्लास ची सजावट केली  आम्ही केलेली सजावट पाहून आमच्या  वर्गातल्या मुली खूपच खुश झाल्या  , का नाही होणार आम्ही केलेच तसे होते साफसफाई पासून  बोर्ड पर्यंत   सगळेच सजले होते   आणि  खायला पण  आणून ठेवले होते   हे  तर मुलींनाही माहित नव्हते आम्ही साजरा करणार आहोत  म्हणून  त्यांनी विचार केला होता पण आम्ही ते साक्षात केले होते आणि जसे आमचे  सर आले  ते तर पाहून चकितच झाले कारण  आम्ही जेवढी सजावट आणि जो कार्यक्रम ठेवला होता तो खरच खूप चांगला   होता आणि आमच्या सरांना आवडला हि त्या दिवशी मुली  हि खूप सुंदर  दिसत होत्या . सरांनी हि आम्हाला शाबाशकी  दिली आणि आम्ही  त्या दिवशी तोडके मोडके  भाषण केले  ..खूप मजेदार होते ते दिवस आम्ही त्या  आमच्या शाळेच्या दिवसात   मजा तर केली तेवढाच अभ्यास हि केला .. पण माझ्या मित्रांनी प्रेमाकडे जरा जास्तच लक्ष दिले  आणि मी अभ्यासाकडे आणि मस्ती कडे  त्या मुळे मी  पास झालो आणि माझे सर्व मित्र नापास झाले ..  आणि ते नापास झाले म्हणून आम्ही  पार्टी हि केली, हे  होते आमचे  शाळेत असतानाची मस्ती धमाल .
         पण  तिच्या विषयी तर सांगायचे तर राहूनच गेले,
 हा ..तर ती  खूप चांगली  होती मी जे करायचो ते तिला खूप आवडायचे  माझी मस्ती तर तिला खूप आवडायची सर्वांचा लाडका होतो मी क्लास मध्ये  त्या मुळे माझी काळजी सारेच घ्यायचे ,पण ती जरा जास्तच घ्यायची  ती माझ्या सोबत  शेवट पर्यंत एकही शब्द बोलली नाही पण तिच्या मनात जे काही होते ते मैत्रिणी कडे सांगायची  आणि ते मला हि समजायचे  मला हसू यायचे  तेव्हा कारण मला माहित होते जर  प्रेम केले तर मी नापास होईल माझ्या मित्रांसारखे .. पण   मला कळले  मी  चुकी केली  ती माझ्यावर खरच प्रेम करत होती .
ती माझ्या कडे पहायची  मी तिच्या कडे पहायची   मला माहित  होते  ती माझ्या कडे पहायची पण मी तिला पाहताच ती  दुसरीकडेच  नझर फिरवायची  हा खेळ  खूप  छान वाटायचा  ,ती हसताना खूप सुंदर दिसायची तिचा राग म्हणजे मध  तो राग म्हणजे  गोड असायचा म्हणजे मना पासून  नव्हताच कारण  ती माझ्या वर प्रेम करत होती .  ती माझ्यासाठी झुरली पण मला  कळलेच नाही  तिला रात्री झोपही यायची नाही सारखा विचार करायची   माझ्याशी बोलायचे पण ते तिला हि जमले नाही आणि मला हि जमले नाही  ,तिला भीती होती  तिच्या मामाची आणि तिच्या घरच्यांची पण तिने जर  मला तसा इशारा  दिला असता  तर मी  तिच्यासाठी सारे काही केले असते पण ते तिने मला जानउ  दिले  नाही  . तिने हे सारे तिच्या मनात  ठेवले आणि माझे तर  सारेच मनात राहिले  मी  तर माझ्या मनातले कधी बोलूच शकलो नाही ..
शेवट असा  झाला कि आमचे शाळेचे  दिवस संपायला आले  असताना मी खूप हिम्मत करून तिला विचारले  तेही मित्रांना सोबत घेऊन  कारण माझी ह्यासाठी हिम्मत  झालीच नाही   त्या दिवशी ती आली  आणि  मी तिला विचारले हि  तुझे  माझ्यावर प्रेम आहे का ? कदाचित  हे मी  चुकीचे बोललो    मी  जर ''  माझे तुझ्यावर  प्रेम आहे  मला तू आवडतेस असे बोललो असतो तर  ती मला मिळाली असती  "
पण ते जमलेच नाही   आणि ती रडू लागली  तिचे रडू माझ्या कडून पाहून गलेले नाही म्हणून  मी तिथून निघून गेलो  पण त्या वेळेस मी तिथे थांबलो असतो तर  तिचे उत्तर मला मिळाले असते ..
पण ते मला जमलेच नाही .... असे हे माझे पहिले प्रेम  जे आज हि मला आठवतं  आणी  मी आजही दु:खी  होतो . कारण पहिले प्रेम म्हणजे एक लाट  जी भरती येते तशी  सारे  जुने  दिवस  आठवण देऊन जाते ..
पण आजही मला वाटतं हे माझ्याशीच का होतं...?
त्यानंतर  मला कुणी आवडे  पण  आता  कून इतरी आवडायला लागले आहे पण  कदाचित  दुसर्या साठी आहे  , पण असे का होतं  जे आपल्याला आवडतं  ते दुसर्यालाच मिळून जातं? 

तुला तर माझी आठवणही येत नसेल | Miss You Marathi Kavita Blog

तुला तर माझी आठवणही येत नसेल
माझ्या विचारांत , माझ्या मनात फक्त तूच असतेस
कसे एकटे जगतो आहे मी
माझे मला खरेच कळत नाही
पुन्हा गर्दीत शोधतो तुला मी
एकट्या जीवाला ह्या
वेदनांत जळताना बघतो मी
तू मात्र कुठेच दिसत नाहीस
त्या वाटा , ते लोक सारे काही तसेच आहे
त्यामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसत नाही
नैराश्यात जखडलो आहे मी
आता तर स्वप्नांतही आधार असतो
खरेच एवढे कम नशिबी आहे का मी ..........
खूप त्रास होतो आता
तुझी सवय झाली आहे
तुला कळत नसेल ते
माझ्या भावना मात्र रडत राहतात
कसे समजवायचे मला मी
आईचेही डोळे माझ्याकडे पाहून वाहतात
आईला म्हणतो माझीच चुकी आहे ही
खरेच प्रेम असे दुखावरचं खपलं असतं .........
आता पहिल्यासारखी आपली भेट होत नसते
सुन्या पडलेल्या रस्त्यावर त्या
तुझी सावली कुठेच सापडत नसते
तरी शोधत राहतो तुला
हि रात्र मला छळत असते
मन ऐकत नाही
फुला-पानांमध्ये तुला शोधतं
वेड लागले तुझे मला
तुझ्याच विचारांतच हे माझे मन असतं
तुझे नाव विसरावं वाटत
पण कसे कळतच नाही
सारखा भास होतो तुझा
दूर जाऊनसुद्धा
तू आजही परवा एवढीच जवळ वाटतेस
आता मी थकलो आहे
त्यात तुझ्या आठवणींत हरवलो आहे
तू पुन्हा येशील ठाऊक नाही
आलीस तरी पुन्हा माझी होशील ठाऊक नाही ....
मी जेवढे तुला आठवतो
तेवढेच प्रेम तू देशील ठाऊक नाही ........
तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४

घडणारं घडत राहतं | Marathi Poems Sad | Marathi Kavita Sad Dukhi Poems

घडणारं घडत राहतं
त्यावर कुणी हसतं
तर दुखी मन तेव्हा मात्र रडत राहतं
कुणाचे स्वप्न सत्यात तर कुणाचे
आयुष्यंच उध्वस्त होतं
आयुष्याच्या खेळात बहुधा
असंच काही घडत राहतं
कुठे वसलेलं गाव ते
नदीच्या किनारी
वाहत्या पाण्याचा खळखळाट ही ते
मरणावर एखाद्याच्या चुपचापच निघून जातं
आंधळी होते रात्र ही तेव्हा
जीव निघून जातो जेव्हा
दिसू लागतात नजरांना
आपलीच लोक रडतांना
देता ही येत नाही आवाज असण्याचा
कळतं मिळाला मृत्यू तेव्हा
जाळून जातं घर काहींच
विजत नाही अश्रूंनी ती आगही तेव्हा
आली ती लेकरं रस्त्यावर
छत्र मात्र कुठेच नाही
देवाकडे पाहून मग
विसरून जातो तो माणुसकीही तेव्हा....
घडणारं घडत राहतं
कुणी हसतं
कुणी रडत राहतं ............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२२-०४-२०१४

दूर गेलीस निघून | Marathi Kavita For Her | Girlfriend MArathi Kavita | Poems for Her/GirlFriend

दूर गेलीस निघून
आठवणी मागे ठेवल्यास
तुझे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांत
आज फक्त अश्रुधारा उरल्यात
तुलाही ठाऊक असेलच
माझ्या हृदयाचे हुंदके
पण ....
तू येऊ शकणार नाहीस ठाऊक आहे मज ते
मनाला हि आता समजावतो आहे
तू कुण्या दुसर्याचीच झाली आहेस
पण मनन मनात नाही
म्हणतं सारखं
" तू कालही माझीच अन आजही फक्त माझीच आहेस ....."
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.१०-०६-२०१४

जगायला शिक | Virah Marathi Kavita | Without Me Marathi Kavita

जगायला शिक माझ्याविना तू
पुन्हा स्वप्न नवे पाहायला शिक
जीवनाचे डाव खेळलो आपण
मी हरलो तू फक्त जिंकायला शिक
हातात नशीब गोंदलय तुझ्याही
एकटेच दुखांशी लढायला तू शिक
हरवलेत दोन जीव
एकाचे हृदय तर स्पंदन दुसरयाचे
देवाकडे अश्रू गाळून
प्रेम आपले परत मागायला शिक
जगायला शिक वेडी
नसेल उद्या मी तू माझ्याविना
जगायला शिक ..............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१०-०७-२०१४

कसे सांगायचे तुला | Dukhi Marathi Kavita | Sad Feeling Lonely Alone Marathi Kavita Blog

कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात
भेटीचा आनंद की विरहाची नशा झाली ह्या जीवनात
तुझ्या मनात राहायचे आहे एवढेच स्वप्न माझे
तुझ्यासोबतच आयुष्य जगायचे
बांधायचे होते घरटे छोटेसे माझे
तु म्हणशील ती दिशा होती
तूच आरसा माझा
तूच माझे जग अन तूच होता आधार माझा
कसे सांगायचे तुला
हे आयुष्य म्हणजेच आहेस तू
तू नाहीस तर आहे अधुरे जीवन माझे
दुरावा कसा येतो
क्षणिक शब्दांच्या चर्चेत
हरवून जातात स्वप्न अन मिळतात फक्त मोती आसवांचे
कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात ....................
-
©प्रशांत डी शिंदे....
दि. १९-०१-२०१५

काय आहे हे आयुष्यं | Marathi Kavita On Life | Poems on Life in Marathi | Life Poems In Marathi

काय आहे हे आयुष्यं
का असे जगतो आहे
दुसर्यांनाच मिळावे सुख
मला दिसावे फक्त दुख हे माझे
दिवस जातात तसे
नैराश्यात बंदिस्त मन माझे
कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल दुख माझे ....................
कुठे चुकलो मी
काय दोष आहे माझा
नशिबाच्या भांडणात कसा हा जन्म माझा
तरी जगतो आहे नव्या स्वप्नांच्या आशेत
कधी तरी यावे सुख ओंजळीतही माझ्या
जिथे तिथे मिळाली निराशा माथी ह्या
देवाच्या दारात अश्रू वाहतो आहे
कसे दिसत नसावे हे अश्रू माझे तयासी
का ऐकू न यावी हि हाक माझी
तरी देव शोधतो आहे
कसेबसे मिळावे प्रेम क्षणभरांचे
ते ही नशिबातून हरवते आहे
कोण समजेल दुख माझे
कोण असावे माझे
न सोबती न इथे कोण कुणाचे
कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल दुख माझे ....................
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१५

तुझ्यावर खूप प्रेम माझे | Prem Kavita Blog | Marathi Love Pyar Prem Kavita

तुझ्यावर  खूप  प्रेम आहे माझे
तुला सांगायला मला जमत नाही .......

ओरडतो तुला  नेहमी कारण
तुझ्याशिवाय करमत नाही........

ओरडतो मी तुझ्याशी
अबोला हि धरतेस तू
माझ्यासोबत भांडण करून
मग अश्रूंनाही जवळ करतेस तू ....................

खरच मला असह्य गं  तुझा माझा असा दुरावा
पाहत जा कधी तू  माझे हि  डोळ्यांना
विरहात   भांडणार्या  ह्या माझ्या हृदयाच्या स्पंदनांना.......

वाटता  कधी  तरी  समजून घेशील
तू  माझ्या मनाला
पण  तुलाही  ते जमत नाही
अन मी पुन्हा एकटा पडतो .............

समजावतो मनालाच  माझ्या
नशीबच  आहे  माझे  ऐसे
जे स्वप्नांनाही पूर्णत्व मिळत नाही ..............
तुझे  डोळे  बोलतात
माझ्या डोळ्यांना ते जमत नाही
विचारांचे  ओझे  मनावर
कधीच मला एकटे सोडत नाही ..........

तुझ्यावर  खूप प्रेम  माझे
कसे गं  तुला कळत नाही .............
-
©प्रशांत डी शिंदे

कोणीच कुणाच काहीच लागत नाही | Sad Dukhi Marathi Kavita Online | Read Full Marathi Pomes

मनातल्या अबोल भावनांना,
कोणीच का समजत नाही.....

शब्दात लिहलेले दुःख,
कोणीच का जाणत नाही.....

दोन शब्द जिव्हाळ्याचे,
कोणीच का बोलत नाही.....

आपण एकटेपणात रडताना,
कोणीच का सोबत रडत नाही.....

का असे होते नेहमी,
खरच काही कळत नाही.....

आपलेच सोडतात साथ आपली,
परखी कधी आपली होत नाही.....

कुणाला कितीही आपलं करा,
कोणीच कुणाच काहीच लागत नाही.....

कोणीच कुणाच काहीच लागत नाही.....


स्वलिखित -
दिनांक १८-०९-२०१३...
सांयकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....

Friday, June 5, 2015

तिचा छंद | MArathi Prem Kavita On GirlFriend/ Her | Marathi Love Poems For Her/Girlfriend

कुठला ही छंद नव्हता मला
प्रेमाचा गंध नव्हता मला
आयुष्य जगत होतो मी वेगला
प्रेमाचा रंगच माहित नव्हता मला

अचानक एक घटना घडली
एक परी माझ्या जीवनात आली
ती परी माझ्या मानत भरली
माझे जीवनच बदलून गेली

ती समोर येताच मी स्वताला विसरून गेलो
तिच्या  प्रेमाच्या जाल्यात अडकत गेलो
काहीही न करता फ़क्त तिलाच पाहत राहिलो
तिला पाहत पाहत जीवन जगत राहिलो

हे कस झाल समजल नाही मला
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला

गोष्ट अशी एका भेटीची | Marathi Prem Kavita | Stories in Marathi | Prem Story in Marathi

तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट
हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते

डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला
तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले

क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली
सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली

एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास
तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती

मला दूर  सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून त्या व्यक्तीच्या दुचाकीवर स्वार  झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका
प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

हे कधी कळलेच नाही | Prem Kavita in Marathi | Poems in MArathi | Read Online

हे कधी कळलेच नाही

१)खोट खोट नापास होईन म्हणत
खर नापास झालो
हे कधी कळलेच नाही

2)खोट खोट झोपेच सोंग करताना
खरी झोप लागली
हे कधी कळलेच नाही

३)खोटा आनंद दाखवताना
खरा आनंद विसरून गेलो
हे कधी कळलेच नाही

४)खोट खोट हसताना
खर हसणं विसरलो
हे कधी कळालेच नाही

५)खोट खोट रडण्याच नाटक करताना
खरे अश्रू कधी आले
हे कळलेच नाही

६)खोट खोट प्रेम आहे म्हणताना
खर प्रेमात पडलो
हे कधी कळलेच नाही

७)खोटी आठवण काढताना
खरेच डोळे पाणावले
हे कधी कळलेच नाही

८)तुझ्या दुखाचा विचार करताना
माझे दुख हे कधी कळलेच नाही

९)तुझ्या आनंदाचा विचार करताना
माझा आनंद हा कधी कळलाच नाही

१०)माझ्या चुकांचा विचार करताना
तू चुकशील हे कधी कळलेच नाही

११)मरणाची खोटी भीती दाखवत
खरेच स्वताला मारले
हे कधी कळलेच नाही

१२)तुझ-माझ हे नात खर-खर अतूट वाटत असताना
त्याच मृगजळात कधी रुपांतर झाल
हे कळलेच नाही

१३)खोट खोट विसरण्याच नाटक करत
मला खरेच विसरलीस
हे कधी कळलेच नाही

१४)एवढ सार झाल.....
पण तुज मी न विसरलो
अन तू मला विसरलीस

१५)आयुष्याच स्वर्ग करायचं हे स्वप्न
उराशी असताना
नरकाच्या वाटेवर कधी गेलो
हे कळालेच नाही..........
ITS LITTLE EFFORT BY ME…
DEDICATED TO ALL MY LOVED ONES AND MOST LOVED. 

तुझ प्रेम | Dukhi Prem Kavita | Sad Love Marathi Poems in Marathi Font/Language

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचे काहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीच का खरे नसते???

तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थी होते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणू मोरपीस होते
मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठी शेवटचे होते ???

मैत्रीच्याही पुढे पाऊल टाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हाती घेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशील याचीच वाट पाहत राहिले..

तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूप मौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासून दुरावण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावर तेवढच  प्रेम करत होते

मग  खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठी अखेरचे होते ???

नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाची चाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्या एवढे  अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठी कधीच खर नसेल???

खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठी आखेरंच असेल????  

( मोनिका साळुंके ) 

हरकत नाही | Prem Kavita in Marathi | Marathi Prem Kavita Blog | Read Marathi Poems Online Free

जाते म्हणतेस हरकत नाही ,
कढत अश्रू पाहून जा
नाते तोड्तीस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसत आहेस हरकत नाही
बुडती नाव हळूच पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणार माझ मन फक्त एकदा पाहून जा............

विवेक राजहंस,पुणे

आई साठी केलेली कविता | Marathi Kavita on Mother | Aai Marathi Kavita | Mother's Poems in Marathi

कोटी कोटी प्रणाम
माते , कोटी कोटी प्रणाम ||

तूच दिलास जन्म मला
वाढवलेस तूच मला
लहान पणी पायावर उभे राहायला
शिकवलेस तूच मला

चालता चालता पडले मी
तर स्वतः उठायची लावलीस सवय
चांगल्या वाईट गोष्टींमधून
चांगले आत्मसात करण्याची लावलीस सवय

कधी चुकले मी
तर तू मला मारायाचीस
पण नंतर मात्र तू
प्रेमाने जवळ घ्यायचीस

तुझ्या हाताच्या जेवणाला
आहे प्रेमाची चव
तुझ्या हाताचे पाणीही लागते
अमृता हूनही गोड

तू माझ्या कळत - न कळत
केलेस जे संस्कार माझ्यावर
त्यांच्यामुळेच मी आहे लायक
ह्या जगात जगायला

तुझ्या उपकारांमुळेच
माझ्यात आले धैर्य , प्रसंगाला सामोरी जाण्याचे
तुझ्या उपकारांमुळेच
मी बनले खंबीर
तुझ्या उपकारांमुळेच
मी बनले स्वावलंबी
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळते जीव माझा तुझ्यावरून आई
आई थोर तुझे उपकार

तुझे हे ऋण तू घातलेस माझ्या ओंजळीत
करतीये मी ओंजळ सांभाळण्याचा प्रयत्न
पण तू मला दिलेल्या ऋणान मुळे
मी झाले आहे नतमस्तक तूझ्या पुढे
होऊन नतमस्तक तुझ्यापुढे
मागणे मागते मी एक
सदा राहुदे माझ्यावर तुझ्या आशीर्वाद

मागणे आहे देवापाशी
भरपूर सुख तुला मिळो
तुझी माया मला मिळो
ह्या मायेच्या बदली माझे ,
आयुष्य तुला लागो

कोटी कोटी प्रणाम
माते , कोटी कोटी प्रणाम ||
-------------------------------------
  विशाखा  बेके  २९ / ०१ / २०१२ 

बदल हेच आयुष्य असतं | Motivational Marathi KAvita | Inspirational Marathi Poems Blog

हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...

हारणारेही कधीकधी असे उडतात,
की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत...

आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत...

वेळ बदलते...माणसं बदलतात
पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...

बदल हेच आयुष्य असतं हे
बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...

-   गौरव पाटील 

जीवन-मरण | Marathi KAvita On Life | Aayusha MArathi Kavita

जगून जगून कसाही जगशील
सगळा हिशेब इथेच करायचा आहे रे
मागचा जन्म, पुढचा जन्म
का कधी कुणी पाहिलाय रे



शेवटच्या घटका मो ज शील  जेंव्हा
अश्रू ढाळायला येतील कित्येक रे
मुक्या शब्दांनी विचारशील त्यांना
आयुष्यभर हसवायला कुणीच कसे न्हवता रे



आयुष्य हे असच असतं 
एकटा आलास...एकटाच तू जाशील रे 
फरक फक्त त्यांनाच पडतो 
ज्यांना जगणं शिकवून जाशील रे 



कधी असेही जगून पहा की
लोकांच्या मनात घर करून राहशील रे
ते जगणं हि काय जगणं, ज्याला
फक्त मरणाने येईल शेवट रे

                 -गौरव पाटील 

का कधीकधी असं जगावं लागतं? | Marathi Sad Kavita On Life | Dukhi Marathi Poems in Marathi

का कधीकधी असं जगावं लागतं?
दुखाचे वादळ मनात असूनही
चेहऱ्यावर मात्र हसू ठेवावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?

कुणा व्यक्तीवर इतकं प्रेम करूनही
तिला दूर जाताना पहावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?


कितीही थकले पाय तरी
पुन्हा नवीन वाटेवर चालावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?


आठवणीत हरवलेल्या क्षणांसाठी
स्वतःचच अस्तित्व हारवेल वाटतं
का कधीकधी असं जगावं लागतं?


शेवटाच्या भीतीने आयुष्याच्या
जगण्याचेच सुख गमवावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?


-गौरव पाटील

Tuesday, June 2, 2015

कळलेच नाही | Marathi Childhood Kavita | Marathi Prem Kavita Blog

कसे गेले ते बालपणीचे रम्य दिवस
कळलेच नाही ……
आठवणींचे रंग हातावरी ठेवून
 ते नाजूक फुलपाखरू ……
कधी उडून गेले कळलेच नाही …….
आई वडिलांची करंगळी धरून चालता चालता ।
कधी मोठे झालो कळलेच नाही ….
उनाडपणाला त्या बालपणीच्या
जाणिवेची किनार कधी आली कळलीच नाही ….
हवीहवीशी ती नाती
कधी विसरून गेलो कळलेच नाही …
आयुष्याच्या या पानावर
आठवणीचे गोड क्षण कधी उमटले
कळलेच नाही.. कळलेच नाही
दीपक मुठे 

तिची प्रेमकहाणी | Prem Kavita | Prem Kavita For Her | Marathi Poems for Her

देह मन आणि जाणीवेवर
झालेले कृतघ्न निर्दयी वार
सोसुनही उभी आहेस तू यार
सलाम तुला !
अन तुझ्या प्रेमाच्या लढाईला !
सुटणार जीवन पुन्हा घट्ट पकडून
वादळाला तोंड देत आहेस तू
सोप नव्हते  ते
वेदनात असह्य असे तडफडणे
वेड्यागत रात्र रात्र जळत जागे राहणे
कधी प्रेमाची शपथ देत
त्याला पुन्हा साद घातली असशील तू
कधी विरहाने व्याकूळ होत
त्याची अजीजीही केली असशील तू
कधी बेभान रागाने खदखदत
त्याच्याशी खूप खूप भांडली असशील तू
तर कधी नाही त्या धमक्या देत
टोकाच्या शत्रुत्वा उतरली असशील तू
आणि हातातील सारे उपाय सरल्यावर
हाताशेने अंधारात एकटी रडली असशील तू
मनाने कदाचित मृत्युच्या दारात
जावून आली असशील तू
ते युद्ध प्रेमाचे जरी हरलीस तू
जीवनाचे दाहक रूप पाहून आलीस तू
कदाचित प्रेम कसे नसते
हे कळल्यावर
प्रेम कसे असते हे नीट जाणशील तू

विक्रांत प्रभाकर 

आठवणी | Prem KAvita | Athavani Kavita in Marathi

आठवणी पिकतात मोसमाप्रमाणे ठराविक वेळेला आणि त्य येतातही .
आंबट , तिखट ,काडू  आणि गोड सुद्धा …
म्हणून  ठरवून अलॆल्य वेळेला कधी थांबवता येत  नाही .
म्हणतातना पानाला चुना आणि मनाला आठवणींच्य खुणा
लागल्य शिवय आयुष्य रंगीत होत नाही ..
तसाच काहीसं  जीवन गुंता आहे कधीही न सुटणारा ,
राहूद्य तसाच गठी सुटतील तेव्हा सुटतील …

तू प्रेम केले पाप नव्हे | Prem Kavita | Love Poems in Marathi Font Language

तू प्रेम केले पाप नव्हे
हे ठावूक असे मजला
या जगाची रित वेगळी
दे झुगारूनी त्या साऱ्याला

ये अशीच ये तू धावत
मी उभा असे कधीचा
हे हात उभारून माझे
ग साधक तव प्रीतीचा

हे मृगनयना चंचला
दे प्रीती तुझी दे मजला
मी तोडून साऱ्या कारा
हा उभा उंच उडण्याला

का अजूनही थबकली
तू कोण विचारी पडली
ग सोड चिंता सगळी
ही सुटून वर्ष चालली

विक्रांत प्रभाकर 

ये फिरूनी | Dukhi Virah Kavita in Marathi | Sad Poems in Marathi

नभी दाटूनी मेघ भरले
फिरूनी तो पाऊस आला,
थेंब ओला डोळा माझ्या
सजन माझा परदेस गेला !

साथ तूजला देतसे दामिनी
अंगणी मज कडकडाट झाला,
कारे असा बरसतो वेडा
जीव माझा घाबरून गेला  !

यावे सत्वर फिरूनी  पुन्हा
जाशिल परतूनी ठावे मजला,
हुरहूर मज चिंब भिजण्याची
आण माघारी प्रिय सजनाला !

©शिवाजी सांगळे

पोरकी | Virah Kavita in Marathi Font | Sad Virah Kavita in Marathi Language

बांधला असता मीही बाळा
झुला तुला झुलवायला
कड्कन तुटली फांदी
अन् झाले पोरकी झाडाला!

खुप वाटते मनाला माझ्या
यावे फिरूनि तुला भेटायला
तुटलेली फांदी कशी जोडायची-
विचारशील का तुझ्या बाबांना?

आठवत असशिल तुही सदा
निघून आलेल्या तुझ्या आईला...
तुट तुट तुटतंय काळीज माझं
आंघोळ रोजची माझ्या ऊशीला!

असायला हवे बाळा तुला
बाबांचे छञ,कणखर व्हायला
मिळायला हवी होती तुला
माया आईची,जग रीत शिकवायला!

असाच सुटला कलहाचा वारा
सोसाट्यात `तो´ही सापडला
कड्कन तुटली फांदी
अन् झाले पोरकी झाडाला!
.....झाले पोरकी झाडाला!!


*अनिल सा.राऊत*| 

फक्त तुझ्याच आठवणीत | Marathi Missing You Kavita | Missing You Poems in Marathi

खुप सतावलस या प्रेमात..
एकदा तरी येउन जा...
व्याकुळलेल्या वेड्या मनाला,
थोडस प्रेम तरी देऊन जा......!

या डोळ्यानी फ़क्त तुझाच चेहरा दिसेल अशी,
नजरेला नजर तू भिडवून जा....
पाणावलेल्या डोळ्यांना या,
गोड स्वप्ने तू देऊन जा.......!

मनी तुझेच शब्द रहातील,
अशे गोड शब्द तु बोलून जा.......
भेटली होतीस पहिल्या वेळी जशी,
तशीच पुन्हा एकदा तरी भेटून जा....

ह्रुदयात तुझच नाव राहिल,
इतक वेड तू करून जा...
हरवलेल्या या वेड्या प्रेमाला...
जगण्याचा रस्ता तू दाखवून जा....!

आयुष्यभर फ़क्त तूझाच राहीन...
वचन माझे तू घेउन जा.....
तूझ्याच आठवणीत डोळे बंद करण्यापूर्वी.....
एकदा तरी मला बघून जा...
एकदा तरी मला बघून जा.....!