Sunday, July 28, 2013

कुणीतरी आज् सांगेन् का माझ्या अबोलीला... Marathi Kavita Feeling Sad Poems

एक् मैत्रीण् होती माझी
जिवाला जीव देणारी,
आणि वेळे परि माझे
दुखही वाटुन घेणारी
तिला माहीत होत
माझ्या मनात आहे कोण्?
पण मी समजु शकलो नाही
प्रेमाचा.हा त्रिकोण्
विश्वास ठेउन तिच्यावर
सांगत होतो सगळ तिला
मला हवी होती माझी अबोली
हे माहीत होत तिला
माझा निरोप घेउन
ती वेगाने पळायची
माहिती न्हवत पण् का ती
मनातल्या मनात जळायची
मला न्ह्वत माहित ती
अस का वागली होती
कदाचित ती ही माझ्यावर
प्रेम करायला लागली होती
पण् माझ्या मनात तर्
एकच् अबोली होती..
जी थोडी शांत
थोडी अबोल होती
ठरवल जेंव्हा आता
तिला बोलायचे सर्व् काहि
तेंव्हा माझी मैत्रिण् म्हणाली मला
तुला सत्य अजुन माहित नाही
प्रेम् करतोस् तु जिच्यावर
ति तुझी अमानत नाही...
तु इथे तिच्या
प्रेमासाठी झुरत आहे
आणि ती तिकडे कुणाच्यातरी
हातात हात घालुन फ़िरत आहे
तिचा एक्-एक शब्द
माझ्या काळजात शिरला होता
अशा प्रसंगी माझ्या मैत्रिनिणेच
माझा हात धरला होता माहित होत आता मी माझ्या अबोली पासुन
खुप दुर जाणार आहे
आणि माझी मैत्रिणच
माझी जिवनसाथी होणार आहे
,मी ही मग अबोलीच्या
आठवणींची होळी केली
आणि मैत्रिणीसोबत आउष्याला
नव्याने सुरुवात केली
हि तर आउष्याची
नवी सुरुवात होती..
पण् तरिही कसली तरी
कमी जाणवत होती.
दिवसा मागुन दिवस गेले
सर्व् काही बदलले होते.
ती ही बदलली
जिला मी जिवनसाथी म्हणुन निवडले होते.
मी आणि माझी अबोली
तिच्या जाळ्यात फ़सलो होतो हे मला समजु लागले होते
माझ्या आणि अबोलीच्या दुराव्याचे
कारण उमजु लागले होते,,
कोण मला फ़सवत होते
आणि कोण् माझी अमानत न्ह्वती
हे मला आता कळुन चुकले होते
म्हणुनच तर् मन् माझे
अबोलीच्या एका भेटीसाठी आउष्यभर मुकले होते......

पण्..
कुणीतरी आज् सांगेन् का माझ्या अबोलीला...
आता फ़क़्त एकदाच ये भेटायला...
जाता जाता मनातल सांगेन तिला
येताना मात्र अबोली
गुलाबाच एक् फ़ुल घेउन ये
आणि पहिला स्पर्श तुझाच असुदे
माझ्या समाधिला..........

2 comments:

Anonymous said...

osm kavita....

Anonymous said...

पण्..
कुणीतरी आज् सांगेन् का माझ्या अबोलीला...
आता फ़क़्त एकदाच ये भेटायला...