Sunday, July 28, 2013

मनातला पाऊस ...!!!

असाच काल कंपनीच्या गाडीतून जात होतो
भूरभूर पाऊस नुकताच सुरु झालेला
ट्राफिक नेहमीपेक्षा जास्तच
नजर खिडकीतून बाहेर रोखलेली
शून्यात
गाडीमध्ये रेडीओवर नेहमीसारखाच गोंधळ
आणि अचानक गाणे बदलून
"सावन बरसे तरसे दिल
क्योंना घरसे निकले दिल " चे
मनाला भिडणारे सूर ऐकू येतात
आणि मग ते हरिहरनचे सूर घेऊन जातात परत मागे
चालत्या गाडीला कोणीतरी रिवर्स गियर टाकावा
आणि सुसाट घेऊन जावे तुझ्या गावाला तसाच काही तरी
आणि उलगडावी तुझी प्रत्येक आठवण
वार्याने जशी पुस्तकची पाने आपोआप उलगडत जावी तशीच
बोटाला सुई मारावी आणि झरझर रक्त बाहेर यावे
असेच काही तरी गाण्याने केले होते
खूप दिवस धुळीने झाकाळलेली तुझ्या नावाची पाटी
एक दिवस पावसाने धुवून निघावी
आणि तुझा नाव लख्ख दिसावं असाच काही तरी
परत तीच काळजात धडधड
जिवंत असल्याचा पुरावा
म्हणूनच की काय निर्जीव झालेल्या मनाला
मातीचा दरवळलेला सुगंध ही जाणवू लागलेला

No comments: