Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : कसे डोळे बोलत असतात ..!!

कसे डोळे बोलत असतात
तुम्हाला न कळत काहीतरी म्हणत असतात
नजर ओळखता येते
बेरकेपण समजून जाते
लबाडी डोळ्यात दिसते
निर्व्याज मन अलगद दिसते
कसे डोळे बोलत असतात
तुम्हाला न कळत काहीतरी म्हणत असतात

डोळ्यात दिसत असते बेरकीपण
दिसत असते खुनशीपण
मग्रूर
बेफिकीरपण सुद्धा दिसत असते डोळ्यात
कधी कधी धारदार नजर
जरब असते डोळ्यात कुणा कुणाच्या

डोळ्यात दिसत असते भोळेपण
डोळ्यात दिसत असते अल्लडपण
निर्मळ मन
आदर
आपुलकी
सहानभूती
आणि
करुनेणे ओथंबलेले
मी पाहिलेत
असे करुणेने भरून आलेले डोळे
नि ओंजळीत आभाळभर प्रार्थना
नि प्रसन्न स्मित
गंगटोकला
बुद्ध विहारात
एका तरुण भिक्कुचे

2 comments:

Anonymous said...

osm

Anonymous said...

CHAN AAHE KAVITA