Monday, July 8, 2013

Marathi Prem Kavita : आता कुठे हसू लागलो आहे मी

आता  कुठे हसू लागलो आहे मी
तुला  विसरलो  आहे  असे  सांगतो
खरे तर आठवणी सोबतच जगू लागलो आहे मी ..

आता तुला  माझा  कसलाच त्रास  होणार नाही
कारण  ते शहरच तुझे  सोडून आलो आहे मी
सारी नाते  सारे  सोबती  सोडून
आज  एकटे जगू लागलो आहे मी ....

एक खरे सांगू तुझ्याच आठवणी  आहेत
म्हणूनच  जगू लागलो आहे मी ....

आठवतात  ते  दिवस मला आज ही
जेव्हा  तू  माझ्या जवळ असायची
कधी  रे आपण  लग्न करू

सारखे मला बोलत असायची
पण  माझे  दारिद्र्य

माझ्या  प्रेमात ही  आडवे  का यावे
जे  तुला  आज  दुसर्याचे पाहत  यातना भोगतो आहे मी ....

तुला मात्र  माझे  दुख नाही  मी दाखवणार
कारण  मला ठाऊक आहे
कळेल तुला  हे  तेव्हा 
डोळ्यांतले तुझ्या पाणी बनणार आहे मी .....

हरलो आहे मी  आयुष्याच्या  ह्या  युद्धात
पाकळ्यांसारखे गळून  पडलो आहे मी
तुडवत आहे  भावनांना  माझ्या आज सारेच
तरी  अश्रू  लपवून  जगतो आहे मी ....

तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
-

No comments: