Friday, January 10, 2014

कल्लोळ आज सारा मनी झाला होता | मराठी कविता | Marathi Poems

कल्लोळ आज सारा मनी झाला होता,
माझ्याच अस्तित्वाचा मज वीट आला होता,

भुतकाळात बघतांना आज मन गहिवरले होते,
जुन्या आठवणींनी आज खेळ मांडले होते,

कुठेच आज मार्ग मीळत नव्हता,
जणु माझ्या जगाचा शेवट झाला होता.


रचना - भूषण कासार

या जगात खरच किती | Online Marathi Poems | मराठी कविता | Marathi Kavita Online

या जगात खरच किती,
मतलबी लोक असतात.....

आधार घेण्यापुरता,
आपला वापर करतात.....

आणि त्याचं मन,
पूर्णपणे भरलं की.....

आपल्याला न सांगता,
एकट सोडून जातात.....

कारण विचारल तर,
तुझी ती लायकीच नाही.....

म्हणून ते आपलाच,
तिरस्कार करतात.....

आणि आपल्याला कवडीमोल ठरवून,
आयुष्याची माती करून जातात.....

आपल्याला भयानक दु:ख देवून,
ते मात्र खुप खुश राहतात.....

आपल्या एकाकी रडण्यावर हसून,
जखमेवर मीठ चोळतात.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(


स्वलिखित -
दिनांक ११-१२-२०१३...
सकाळी १०,१७...
© सुरेश सोनावणे.....

२०१३ या वर्षातील ही शेवटची कविता | Marathi Vinodi Kavita | Marathi विनोदी कविता.

२०१३ या वर्षातील ही शेवटची कविता,
माझ्या x- Girlfriend साठी.....
*******************
शोना आता कधीच,
नाही आठवणार तुला.....
*******************
तुझ्या आठवणीत,
नाहीच रडणार मी.....
*******************
खर तरं आता,
तुझ्या नाकावर टिच्चून,
*******************
नवीन Girlfriend,
पटवणार आहे मी.....
:D   :D   ;D   :D   :D


स्वलिखित -
दिनांक ३१-१२-२०१३...
सायंकाळी ०६,५१...
© सुरेश सोनावणे.....

मी हि आहे माणूस | मराठी कविता Marathi Poems | Marathi Kavita Blog.

माझ्या न दिसणाऱ्या योनिकडे पाहून
तू जिभल्या चाटत असतोस
माझे वक्ष झाकलेले असतांनाही
तू डोळे विस्फारून पाहतोस

दिसते तुझ्या डोळ्यांत मला
लालसा फक्त माझ्या शरीराची
म्हणूनच सजा भोगते मी
खाली मान घालून चालण्याची

मी घातलेली असते साडी
तेव्हा जाते तुझी नजर उघड्या पोटाकडे
कधी घातला खोल गळ्याचा ब्लाउज
तर अधाशासारखा पाहतोस तू पाठीकडे

जरी मी घातलेला असतो सलवार कुडता
तरी तू डोकावतोस माझ्या गळ्यामध्ये
अन घातलीच मी जीन्स तर
पहातो वेड्यासारखा माझ्या ढूंगनाकडे

घालता मी आखूड चड्ड्या
पाहतो माझ्या मांड्यानकडे
काय घालू मी आता
मजलाच पडलेय रे कोडे

म्हणजे तू आहेस म्हणून
मला मनासारखं नाही वावरता येणार
मी कसं जगायचं हे हि
तूच आता ठरवणार

तू हि कसाही राहतोस
मी कधी आक्षेप घेतला कां रे
मग माझ्याच जगण्याला
तुझ्या बेड्या कां रे

मी हि आहे माणूस
मला स्वच्छंद होऊन जगू दे ना
होईन कधी मुक्त मी
मला मोकळा श्वास घेऊ दे ना .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १ . १२ . १३ वेळ : ३ .०० दु .