Sunday, October 25, 2015

विसारेचय तुला | Virah Kavita For GirlFriend | Virah Prem Kavita Blog | Poems for Her | Share For Free on Whatsapp Facebook

आभाळा एवढी तुझ्या आठवणी ,
मन माझ इवलसं,
तरी करीत आहे आकांत,
कारण,
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!

कधी होता सहवास तुझा,
आज आहे फक्त आभास तुझा,
नको मज कुठला ही ध्यास तुझा,
होय,
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!

मंद झोका नाही,
एक वादळ होतीस तू माझ्या जीवनी,
मोडायचच होत,
तर का गुम्फलीस ह्या मनी,
नको आता कुठलाही भास हि तुझा,
कारण,
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!
विसारेचय तुला!!


                                 ------अमित जयवंत गायकर

काय असत प्रेम ? | Prem Kavita | What Is Love | Poems in Marathi | Marathi Kavita Blog | Latest Marathi Poems | New Kavita

काय असत प्रेम ?
जे वाईट कामापासून परावृत्त करत ते कि
जे वाईट काम करायला लावत ते,

काय असत प्रेम ?
जे मरणापासून खेचून आणत ते कि
जे जगण असह्य करून टाकत ते,

काय असत प्रेम ?
जीवन आनंदाने भरून टाकत ते कि
जे जीवनमार्गात काटे पेरत जात ते,

काय असत प्रेम ?
कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते कि
इतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते,

खरच, काय असत प्रेम ?

आज आलेली तुला भेटायला मी | Marathi Kavita For BF/BoyFriend/Him | Poems For Him in Marathi | Miss You Poems For Him

आज आलेली तुला
भेटायला मी
जाताना मात्र वीणा मी
राहिले नाही ती
                तुझा प्रत्येक शब्द
                मनात घर करून राहिला
                तू दिलेला राग ही आता
                माझ्या मनास भावला
आजची आपली पहीली भेट
मी कायम लक्षात ठेवणार
अन् तू चुकून जरी विसरलास
तरी तुला विसरू नाही देणार
                 देवाकडे आजपासून मला
                 एकच मागण मागायचय
                 आजच्या सारखच मला
                 तुझ्यासोबत कायम रहायचंय
                                          
          अन् तुला आयुष्यभर माझ्या
          डोळ्यांसमोर पहायचंय
वीणा

आयुष्यात एकच चुक केली ..प्रेम | Prem Kavita Online | Heart Touching Poems in Marathi | Sad Heart Touching Kavita

आयुष्यात एकच चुक केली
जिवापाड प्रेम केलं तुझ्यावर
पण तु माझ्यासोबत
टाईम पास करून निघून गेली ...
.
एकच चुक केली ...
तुझ्यावर विश्वास ठेवला
पण तु माझा विश्वासघात
करून निघून गेली ...
.
एकच चुक केली ...
तुझ्या बोलण्यात मी
स्वतःला हरवत गेलो
पण तु तर माझा केसानेच
गळा कापून निघून गेली. ..
.
एकच चूक केली. ...
साथ जन्म तुझ्यासोबत
चालण्याचं स्वप्न
बघितलं ...
पण तुला साथ पावलही
माझ्यासोबत चालता नाही आलं ...
.
एकच चुक केली ....
तुला स्वतः पेक्षा जास्त
जपलं ...
पण तु माझ्या भावनांशी
खेळून गेली. ..
.
एकच चुक केली ...
तुझी वाट बघत
बसलो ...
पण तु माझ्या आयुष्याची
वाट लावून निघून गेली ...
.
जावुदे जे झालं ते झालं
जर तुला वाटलं परत यावं
तर बिन्धास्त परत ये ...
तुझं माझ्या आयुष्यात
नव्याने स्वागत राहील. ..
.
स्वलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)

Sunday, October 18, 2015

मनी दाटलेल प्रेम, कधी ओठांवर तू आणशील | Prem Kavita | Propose Kavita Online | Marathi Kavita Blog

किती दिवस असा राहशील
नुसतं चोरून तीला पाहशील
मनी दाटलेल प्रेम कधी
ओठांवर तू आणशील...

कधी हात हाती धरून,
तिच्या समोर प्रस्ताव मांडशील
स्वप्ने खूप उरात ठेवून,
फक्त आशा वाढून ठेवशील
मनी दाटलेल प्रेम कधी
ओठांवर तू आणशील...

गोष्ट काळजात ठेवून,
अस मन मारून जगशील
तिला सगळं काही सांगून,
कधी मन हलक करशील
मनी दाटलेल प्रेम कधी
ओठांवर तू आणशील...

तुझ्या काही न बोलण्याने
असाच तू ही तिच्यापासून दुरावशील
मनात तिच्याही असताना,
फक्त न बोलण्यानेच हा खेळ हारशील
मनी दाटलेल प्रेम कधी
ओठांवर तू आणशील...

                                                      
                                                      कवि:- रवी पाडेकर (8454843034)
                                                      मुंबई, घाटकोपर   

तुझी 'ती' सवय ,माझ' ते 'प्रेम | Prem Kavita in Marathi Font | Read Online Marathi Poems in Mararhi Font

( आपण एखद्यावर किती प्रेम करतो आणि त्याचीच किम्मत समोरचा कशी करतो याची तफावत मी या कवितेत मांडली आहे... प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच म्हणून दाद द्यायला विसरु नका)

######सवय ######

तिला सवय होती बदलायची ,मला प्रेमात आकंठ बुडायची
निपचित पडलेल्या ऋदयास हळूच फुंकर मारायची.......

तिला सवय होती स्वप्न दाखवायची ,मला मात्र ते डोळे बंद करुण पहायची,
कधीही तयार न होणाऱ्या नात्यात आंधळे पणाने जगायची.......

तिला सवय होती क्षण बदलायची, मला तेच क्षण ,क्षण-क्षण साठवायची....
निपचित पडलेल्या नात्याला नवे जीवन द्यायची

तिला सवय होती रंग बदलायची, मी मात्र रंगहिन होतो,
तिच्या रंगात मिसळण्यास जनु आधीन होतो
तिच्याच प्रेमात पूर्णपणे स्वाधीन होतो,

तिला सवय होती आकाशात सैरभैर उडायची, अन मला मात्र तिला उंच उड़ताना पहयाची
सांजवेळी पुनःशा घरटयात बसून तिची वाट पहायची

अखेर डाव तिने मांडला
चव चाखुन प्रेमाचा प्याला हां सांडला
तिने ओवलेल्या कच्या धाग्यात हा प्रेमाचा मोती अखेर जड़ जाहला
अन आज पुन्हा एक पाखरू पोरका जाहला

याघरटयास जिव्हाळा लाउन
सवयी प्रमाणे तिही दुसऱ्या फांदीवर गेली,
नव घर शोधन्यासाठी, पुन्हा एका पाखराला पोरकं करण्यासाठी...
पुन्हा एका पाखराला पोरकं करण्यासाठी-----

कवि :तुषार भारती..पुणे

एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ | Poems In Marathi For GirlFriend/Her | Girl Friend Kavita in Marathi Font

एकदा माझ्यासारखं,
कधी तू ही जगून बघ...!!
दुःखात असताना ही,
कधी खोटं खोटं हसून बघ.....

स्वप्नांच्या जगात हरवताना,
कधी स्वतःला सावरुन बघ.....
मनातल्या अबोल भावना,
कधी शब्दात मांडून बघ.....

सुखाचे क्षण अनुभवताना,
कधी दुःखाचे ओझे वाहून बघ.....
प्रेमाची अपेक्षा ठेवताना,
कधी दुस-यांना प्रेम वाटून बघ.....

विरहाचे गीत गाताना,
कधी एकटेपणा सोसून बघ.....
आपल्यांची आठवण काढताना,
कधी मलाही आठवून बघ......

स्वलिखित -
दिनांक १५/०४/२०१४...
दुपारी ०१:५१...
©सुरेश सोनावणे.....

माझी कोण आहे तु | Marathi Kavita For GirlFriend/Her | Prem Kavita Online Be Free To Read and Comment

धडधड आहे तु माझ्या
हृदयाची ..
.
श्वास आहे तु माझ्या
जिवनाची ....
.
माझ्या आयुष्याची एक
नविन दिशा आहे तु ....
.
माझ्या आयुष्याचा जोडीदार
आहे तु ....
.
माझ्या कवितेतील शब्द
आहे तु ...
.
आणि या प्रेमवेड्याची
प्रेमवेडी आहे तु. ..
.
पुन्हा नको विचारू माझी
कोण आहे तु ....
.
स्वलिखीत :- Prem Mandale