Friday, May 30, 2014

फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू | Marathi Kavita Facebook Pages | Marathi Poems Marathi Facebook Page | Prem Kavita Facebook | Like Marathi Kavita On Facebook

फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू

फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला

फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर

फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा

फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता

हातून काहीतरी निसटताना पाहतोय मी | मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita

किना-यावर उभ राहून
पाहिल तिला ......
आपल पाउल मागे घेताना
अस कितीदा पाहतो मी
आवडत मला ........
पाउल मागे घेतांना
खट्याळपणे तिने
पायाला केलेल्या गुदगुल्या
आठवतात मला ........
जीव जडलाय माझा
तिच्याच त्या
जीव लावण्यावर ........
माझ्या येण्याच्या चाहुलीने
तिने घेतलेली माघार
मला व्यापण्यासाठी
नाही, कदाचित ........
मला खुणावतेय ती
त्यावर आरूढ़ व्हायला
पण आता ........
पण आता
ओहोटी लागलीय
तिला आणि मलाही
अजुनही तसाच उभा आहे मी
किना-याला .......
वाळूत पाय घट्ट रोवून
तिला दूर जाताना
पाहतोय मी ........
हातून काहीतरी निसटताना
पाहतोय मी ........
पाहतोय मी ........

बाकि........ मी मस्त आहे | मराठी प्रेम विरह कविता | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे
होऊ दे त्याला काहीतरी
मी माझ्या कामात व्यस्त आहे
बाकि........ मी मस्त आहे ........
हो, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे
होइल कधीतरी सरळ,
त्यालाही वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........
तू आठवण करून द्यायचिस
की मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!
भलत्या स्वप्नांवर ही मात आहे
बाकि, मी मजेत आहे ................
गालांवर, डोळ्यांच्या खालि,
ओलावा आहे, फार बोचरा आहे
पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात
तुझाच हसरा चेहरा आहे
म्हणुन मी तसा बरा आहे .............
.
मी कसा का असेना,
बोलुन चालून एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??
बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर प्रिये तुझ्या आठवणीत | Athavan Kavita in Marathi | Miss You Dear Marathi Kavita | Don’t Leave me Marathi Poems | Tuji Aathavan Marathi Kavita

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
माझी आठवण काडशील ना...

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर
एकांतात
एकदा तरी माझासाठी रडशीला ना..

Saturday, May 17, 2014

आठवण | Missing you Marathi Kavita | Want to be with you | Missing You so Much Marathi Poems | Feeling Lonely Without You Marathi Kavita

आज तुझी खूप आठवण आली,

म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,

तुझा जुना नंबर शोधून,

बंद असून सुद्धा एकदा तपासून

पहिला,

नंबर अन अवेलेबल दाखवत होता,

इथे श्वास सारखा फुलत होता,

का माहित नाही कसतरीच

झालेलं,

मनात सारखं काहीतरी चाल्लेल,

हो तिथेच गेलेलो मी,

जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,

नजरेला नजरा देत,

एकत्र राहणार बोललो होतो,

तू मात्र निघून…

आयुष्याची वाट | Marathi Feeling Alone Poems | Marathi Feeling Lonely Sad Kavita |

आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच ।
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाटही जगते।।४।।

'वाट' लागण्यात सुध्धा
'वाटे'चीच बाजी।
चुकली 'वाट' तरी
'वाटे'चीच बाजी।।५।।

माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो | Marathi Kavita | Motivational Marathi Kavita | Marathi Sad Kavita For Boys

सीमा असतात धर्माच्या,
सीमा असतात निती नियमांच्या,
विचारांच्या चौकटीत,
माणुस नेहमी बंदच असतो.
प्रत्येक माणुस बंदीवानच असतो.
कही माणसानी स्वतावर घातलेल्या सीमा
तर काहीनां दुस-यांनी लादलेल्या सीमा
प्रत्येकासाठी सीमा चाकोरीचे तुरुगंच असते,
प्रत्येक माणुस बंदीवाना सारखे जगत असते.
सीमोऊल्लोघंना साठी प्रत्येक माणुस,
तडफडत असतो.
 माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो.
खोटी प्रतीष्टा, खोटे हसू,आणुन
तो विटलेला  असतो.
माणुस बंदीवाना सारखाच जगत असतो....

नशीब | Marathi Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | Emotional Marathi Kavita | Lonely Kavita

आयुष्याच्या वाटेवर चालताना
नशीबाची गरज का असते ?
जगी येताच हात नसणार्यांची
उगाच का यशाची सिडी असते
जगण्याच्या वाटेवर कर्तृत्वाची छाप लागते
निरस जगण तर पशूही जगतात
स्वाभिमानाच्या कतारित कष्टाळूच असतात
उगाच का जंगलावर सिंह राज्य करतात?
आनंदाच्या नादातच प्रत्येकाला प्रित आठवते
दु:खी असताना जगण्याची रित का बर नसते
जीवनात ज्यांच्या नशीबच खराब असते
खरतर त्यांच्या जीवनातच अपयशाची चिँता का नसते.....?

Friday, May 16, 2014

तु फक्त माझे गुण बघ| Marathi Kavita | मराठी कविता | Marathi Prem Kavita | प्रेम कविता | Marathi Understandi Kavita

गुण  आणि   दोष
प्रत्येकात  असतात

फरक  एवढाच  की
ते  कमीजास्त   असतात

कोणताही  माणूस
परिपूर्ण   नाही

पण    तो   माणूस
अपूर्णही   नाही

कर  तुलना   इतरांशी
बघ  मी  कमी  नाही

दोष  पाहशील  माझे
वाईटच  दिसेल  मी

गुण   पाहशील   माझे
तुला   प्रिय  असेल  मी............

             । कवि-डी ।
               स्वलिखीत
                दि. 18.03.2014
                वेळ. दुपारी. 02.40

काय अर्थ याचा ? | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता | Ek Tarfi Prem Kavita

तिरपा कटाक्ष तुझा अंन
हलकेच तू हसावे,
हलकाच स्पर्श तू मजला करावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
दिसताच मी, तू सैर भैर व्हावे
हलकेच पापण्यांचे जणू पंख व्हावे,
हात ठेउनी वक्षावर मनी भाव हा वसावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
जाता समोरुनी मी
तू आरश्यात पाही,
हात वारे करुनी मज खुणवावा
            काय अर्थ याचा मजला कळावा!
कधी नावासमोर तुझ्या,
कधी माझेच नाव यावे,
अर्थ तुझ्या मनीचा कोणा कसा कळावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
का असेल का हि " प्रीत "
तुझिया मनीची,
काय संदेश तुझिया मनीचा मजला कळावा
            काय अर्थ याचा मजला कळावा!

कवी प्रकाश साळवी दि. १८ मार्च २०१४ दु. ३.०० वा

तुझं हसणं मला खुप आवडतं...!! Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | Frienndship Kavita | Maitri Kavita

तुझं हसणं मला खुप आवडतं...!!

तुला हसताना पाहून,
मलाही हसावसं वाटतं.....

तुझ्या मधाळ हसण्याला,
डोळेभरुन पहावसं वाटतं.....

हसणचं तुझं असं गोड,
त्यात मिश्रीत व्हावसं वाटतं.....

तुझं ते लाजून हसणं,
मनाला माझ्या वेड लावतं.....

तू अशीच हसत रहा,
असं सांगावसं वाटतं.....

तुझ्या हसण्यानेच मला,
तुझ्यासाठी जगावसं वाटतं.....

तू हसतेस इतकी छान,
तुझ्यात गुंतावसं वाटतं.....

खरं सांगायच झालच तर,
तुझं हसणं मला खुप आवडतं.....

स्वलिखित -
दिनांक १७-०३-२०१४...
सांयकाळी ०६,२९...
©सुरेश सोनावणे.....

आहेत अजूनहि माणसं इथं | Virah Kavita | विरह कविता | Facebook Marathi Page | Marathi Emotional Kavita | Sad Emotional Poems

आहेत अजूनहि माणसं इथं .....
मनाला मन भिडवणारी
एकमेकांच्या विचारातून एकमेकांना घडवणारी

आहेत अजूनहि माणसं इथं .....
दिलासा देणारी,समजून घेणारी,
निस्वार्थी भावनेने आपुलकीचे दोन शब्द
प्रेमाने बोलण्याची आपेक्षा करणारी .....

आहेत अजूनहि माणसं इथं....
असह्याला मदत करणारी, बुडत्याला हात देणारी,
वृद्धांना रस्त्यावरून पलीकडे नेणारी,
सतकर्म करून फक्त आशीर्वाद घेणारी...............

आहेत अजूनहि माणसं इथं ....
प्रेमाने बोलणारी, माणसणांना श्रीमंतीत न तोलणारी,
माणसातली माणुसकी मनाला भावणारी,
माणुसकीच्या धाग्यात माणसांना गोवाणारी

आहेत अजूनहि माणसं इथं ....
जीवाला जीव देणारी,
त्या बदल्यात काही न मागणारी,
इमानाने वागणारी

आहेत अजूनहि माणसं इथं ....
हातात हात देणारी,
आपल्या सोबत नेणारी,
प्रेमाच्या नगरीत भरारी घेणारी

या माणसांची हीच जीवन जगण्याची खुबी
म्हणून हि दुनिया अजूनदेखील आहे उभी

मोठेपणा मिरवणारे अनेक माणसं दिसतील
देव देखील ध्यान करेल त्याच्या समोर हीच माणसं असतील
                                                           -   दि.मा.चांदणे

Sunday, May 11, 2014

मी असाच आहे..Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता | Marathi Love Poems Facebook Page | Poems For GirlFriend BoyFriend


मी असाच आहे..
कसाही असलो तरी
फक्त तुझाच आहे..
भेटलो नाही कधी तरी..?
भेट तुझी नि माझी नेहमीच आहे..
रागवणं हा तर फक्त बहाना आहे..
प्रेम वाढविण्याचा हा
नविन"FORMULA" आहे..
तुझी आठवण येते, हे तर
कारण आहे..?
वेडे, तुला विनाकारण
छळणं हा तर,
माझा स्वभाव आहे....

Sunday, May 4, 2014

नाही कळले कधी | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता | Sad Prem Marathi Kavita Facebook

तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी नाही कळले कधी
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो मी तुला तू मला ,
नाही कळले कधी धुंध हुरहूर ही ,
श्वास गंधाळला ओळखू लागलो तू मला मी तुला ,
नाही कळले कधी
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
तू कळी कोवळी साजरी गोजरी ,
चिंब ओल्या सारी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे ,स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो तू मला मी तुला
धुंध हुरहूर ही ,श्वास गंधाळला
ओळखू लागलो मी तुला तू मला ,
नाही कळले कधी
शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहतानाही तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो मी तुला तू मला
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी
नाही कळले कधी !! —

कुणी समजून घेत नाही | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | Marathi Lonely Poems | Sad Marathi Kavita | Missing You Kavita

कुणी समजून घेत नाही

याची खंत कधीच नव्हती

मीच कुणाशी बोलत नाही

हा आरोप लोकच करतात.

रानफुलातला, प्राजक्तातला फरक त्यांना कळतो,

पाखराताला, फुलपाखरातला फरक त्यांना कळतो,

मग हे का नाही कळत त्यांना की

प्रत्येक माणसाच्या साच्यातही फरक असतो.

हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात

स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात,

बंद ओठांची माणसं मूक नसतात खरी

त्यांच्याही मनात वावटळं असतात.

मी तोंड उघडत नाही

दाताखाली जीभ येऊ नये म्हणून,

डोळे वर करून पाहत नाही

प्रकाशाने दिपून जाऊ नये म्हणून.

हसत नाही, कुणी रडू नये म्हणून

रडत नाही, कुणी हसू नये म्हणून

सोबत करत नाही, जाता येत नाही म्हणून

थांबून राहत नाही, थांबता येत नाही म्हणून.

मी तुमच्यातली आहे हे धरून चालू नका,

वाळीत टाका पण टोचून मारू नका.

Thursday, May 1, 2014

तुझी आता सवयच झालीय.. Like us on Facebook : https://www.facebook.com/poemsmarathi | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

सकाळी  मी  उठायचं  म्हटलं  की ,
तुला  पहायची  आता  सवयचं  झालीय. .

दात  घासायचं  म्हटलं  की ,
कोलगेटची   आता  सवयचं  झालीय..

आंघोळ  करायची  म्हटलं  की ,
डेटालची  आता  सवयचं  झालीय. .

नाष्टा  करायचा  म्हटलं  की  ,
पोह्याची  आता  सवयचं  झालीय. .

ऑफिसाला  जायचं  म्हटलं  की ,
लोकलची  आता  सवयचं  झालीय. .

काम  करूनही   बोलण   खाण्याची  ,
बाॅसची  आता  सवयचं   झालीय. .

संध्याकाळी   घरी   आल्यावर  ,
तुझ्या  चहाची   सवयचं  झालीय. .

कॅन्डल  लंच   म्हटलं   की  ,
जेवणाची   तुझ्या  सवयचं  झालीय. .

आयुष्यात  माझ्या  आता ,
तुझ्या    सोबतीची  सवयचं   झालीय. .

कारण   एकदा  सवय  झाली  की  ,
जीवन   जगणं    सोपं  नसत..

सवय  लावून ,  सवय  मोडनं
खरंच   सोप    नसतं.........


              । कवि-डी ।
               स्वलिखीत
                दि. 19.03.2014
                वेळ. रात्री. 09.  34 

तिचं भांडण | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

छोट्या  छोट्या
कारणावरून
तिला  भांडल्याशिवाय
करमत  नाही

भांङून  पुन्हा
परत  तिला
बोलल्याशिवाय
करमत  नाही

दोन  चार  दिवसाला
तिचं  भांडण
ठरलेलं  असतं

रुसून  पुन्हा
तिचं  हसणं
ठरलेलं  असतं

भांडल्यावर  कोण
पहिल्यांदा  बोलतो
असा  यक्षप्रश्न
आमच्यापुढे   आसतो

ताटाखालचं   मांजर
होणार   नाही
गुलामगिरी   तिची
सहन  करणार  नाही

म्हणते  ती  स्वतःला
पाणी  लावणार   नाही
मीच  का  बोलावं
आता  जमणार  नाही

बाळ   आमचं  पडतं
अचानक च    रडतं
विसरतो  भांडण
मन  आमचं  जुळतं............


                । कवि-डी ।
                 स्वलिखीत
                  दि. 17.03.2014
                वेळ. रात्री 09.24

सखा सोबती माझा एकटेपणा...!! Like us on Facebook : https://www.facebook.com/poemsmarathi | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

सखा सोबती माझा एकटेपणा...!!

हजारोच्या गर्दीत असूनही,

आठवतो हा क्षण पुन्हा.....

पुरता ऐकला पडलोय मी,

सये जाहलो तुजविन सुना.....

असा काही लागला ह्रदयी,

निघता निघेना प्रितीचा रंग जूना.....

शुध्दीत राहूनही बेशुध्द झालो,

बोचू लागल्या असाह्य जखमा मना.....

कुणाला सांगू दुःख माझे,

ऐकवू माझी व्यथा मी कुणा.....

शेवटी ऐकलाच राहीलो मी,

सखा सोबती माझा एकटेपणा.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

स्वलिखित -
दिनांक ०९/०४/२०१४...
दुपारी ०१:४८...
©सुरेश सोनावणे.....

सांग माझ्यासाठी एवढं करशील.. Like us on Facebook : https://www.facebook.com/poemsmarathi | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

झाडावरचं  हसरं  फुल
हसुन  मला  म्हणालं

आज  तुला  काय  झालंय
भान  तुझं  का  गेलंय

एकटाच  हसत  असतोस
कुणाशी  बोलत  असतोस

तिच्या  प्रेमात  पडलास  ना
जिव  तिच्यावर  जडला  ना

मी  म्हणालो ,  हे  फुला
खरं खरं  सांग  मला

माझं  प्रेम  तिला  सांगशील
गजर्‍यांमध्ये   तिच्या  फुलशील

आभाळाएवढं  प्रेम  तिच्यावर
निरोप   तिच्या  कानी  सांगशील

सांग  माझ्यासाठी  एवढं  करशील
सांग  माझ्यासाठी  एवढं  करशील..........


                        । कवि-डी ।
                        स्वलिखीत
                     दि. 07. 04.14
                    वेळ. संध्याकाळी .06.36

फक्त तूझयासाठी Like us on Facebook : https://www.facebook.com/poemsmarathi | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

तिच्या नादाने सर्व आयुष्यं झाले खुले ,
किरतो प्रेम किती तिच्यावर मी ,
माझे मलाच न काळे

का हरवली माझी वाट | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

तुझ्या श्‍वासात गुंफताना,
हरवलो होतो मी स्‍वताला...
तुझ्या मोहात पार डुबलो,
अनं सावरु कसं मनाला...
माझ्या या आसवांना,
पुसणारं नाही कोणी...
मग पुन्‍हा का सतावतात,
ह्या तुझ्या आठवणी...
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट......
सागराच्‍या या किनारी,
लागे एकटेपणाची चाहुल...
वाटे माझ्या मनाला,
का पडले प्रेमात पाऊल...
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट...
माझ्या या स्‍वप्‍नांना,
कधी पंख फुटणार नाही...
नको सोडून जाऊ मला,
माझ्या या पोरक्‍या पणी
का कळेना, मला पुन्‍हा,
का हरवली माझी वाट..

जीवन प्रवाही असायला हवं | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

झुळझुळ वहाणाऱ्या पाण्याला तरी
कुठे असतो मार्ग मोकळा
असंख्य दगड , धोंडे , यांना पार करत
खडकांवर आपटूनही
पुन्हा माघारी येत वेगळा मार्ग शोधत
ते पुन्हा वाहू लागतं शीळ घालतं

जीवनही असंच प्रवाही असायला हवं
जगायचंय तर अडचणी तर येणारच
काही नैसर्गिक काही मानवनिर्मित
त्याला तोंड देत देत
त्यातून मार्ग काढत चालायला हवं

असंख्य काटे आले मार्गात
डोंगर उभे होते मार्गावर
तरी मानवानं त्यांना भेदून मार्ग काढलाच नां
तसंच कुठल्याही प्रसंगी मार्ग काढून
जगण्याला नवी दिशा देणं जमायला हवं
त्यासाठी जगण्याची उर्मी कणखर मन हवं

मरणाला स्वतःहून आपलं करणं
हे तर असतं खूपच सोप्पं
पण जगण्याला सामोरं जाणं
हेच माणसाचं लक्षण असायला हवं
जो न डगमगता गाठतो किनारा
त्यालाच वाटत जीवन हवं
त्यालाच भेटत जगणं नवं
==========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ७.४.१४  वेळ : ६.२० स.