सुचत नाही
सुचत नाही
काही केल्या कळत नाही
कसे रुसून गेले शब्द
असे कधी झाले नाही
काय चुकले माझे
शप्पत काही कळत नाही ..!!
पूर्वी कसे छान होते
नुसते शब्द फुलत होते
कळीतून फुल फुलावे
तसे सगळे घडत होते
काय झाले ..?
काय घडले ..??
शप्पत ..!
काही कळत नाही ..!!
ढग दिसले
शब्द बरसले
फुल दिसले
शब्द फुलले
पाखरू दिसले
शब्द झुलले
आज काय झाले ..?
काय घडले ..?
शप्पत काही कळत नाही ..!!
कसे नापिक होउन गेले मन
शब्द कसे अंकुरत नाही
काय करावे ..?
कसे करावे ..??
खरेच काही कळत नाही ..!!
सुचत नाही
सुचत नाही
खरेच काही कळत नाही ...!!
सुचत नाही
काही केल्या कळत नाही
कसे रुसून गेले शब्द
असे कधी झाले नाही
काय चुकले माझे
शप्पत काही कळत नाही ..!!
पूर्वी कसे छान होते
नुसते शब्द फुलत होते
कळीतून फुल फुलावे
तसे सगळे घडत होते
काय झाले ..?
काय घडले ..??
शप्पत ..!
काही कळत नाही ..!!
ढग दिसले
शब्द बरसले
फुल दिसले
शब्द फुलले
पाखरू दिसले
शब्द झुलले
आज काय झाले ..?
काय घडले ..?
शप्पत काही कळत नाही ..!!
कसे नापिक होउन गेले मन
शब्द कसे अंकुरत नाही
काय करावे ..?
कसे करावे ..??
खरेच काही कळत नाही ..!!
सुचत नाही
सुचत नाही
खरेच काही कळत नाही ...!!
No comments:
Post a Comment