Sunday, July 28, 2013

हरवलेली पाउलवाट ..!!

वाटा, पाउलवाटा
नागमोडी
वाटा तळ्याकाठच्या
गवती फुलांनी फुललेल्या
त्याला आठवतात
नागासारख्या वळत गेलेल्या
फणा काढून फुक्तारनार्या
तो हरवून जातो स्वताला
कुठल्याशा तळ्याकाठच्या
पाउलवाटेवर ...

त्याला आठवते ती पाउलवाट
तळयाजवळची
तळ्याकाठची...
सापाच्या शेपटीसारखी
नि ते गर्द निळे पाणी
त्यात उतरलेले आभाळ
पांढरा शुभ्र ढग
कधी सोबत ती
बिलगलेली....

खूप काळ हरवून गेला..
ह्या देशात परतायला
त्याच गावी
आजकाल तो शोधत असतो
ती पाउलवाट
असते नव्याने जन्मलेली
पण सोबत ती नसते
ती असते अस्तित्वाच्या पलीकडे
तो उभा तळ्याकाठी
त्याचेच प्रतिबिंब बघत
ती दिसतेय का..?
बिलगलेली....
कमीत कमी
त्या निळ्या निळ्या पाण्यात
पाण्याच्या भिंगात ...

No comments: