Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : आपले शब्द छान मित्र झाले आहेत ..!!

मी तुमचे नाव ऐकून आहे
तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात
आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत
कोण हो तुम्ही.?
कोण हो मी ..?
हा आपण प्रश्न नाही विचारायचा
कधीसुद्धा ..!!
कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत
आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या
मुठभर उधळलेल्या ....
आपापल्या परीनं चमकत राहतील
चांगले मित्र होऊन मस्ती करतील
करुद्या...!
खेळूद्या ...!!
आपण त्यांची मैत्री बघू
कधीतरी मनात येते माझ्या:
शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे
किती छान आहेत ....!
मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
[कारण आपण आपल्या शब्दांचे आई -बाबा आहोत ना ??]
तरीसुद्धा
आपण नाही भेटायचे कधी सुद्धां ....
एकमेकानां
आपले शब्द भेटतायतना ?
मला
तुम्हाला
आपल्याला
तेवढे पुरे आहे
नाहीका ..?
तुमच्या शब्दावरून मी छान कल्पना करतोय तुमची
तुमच्या स्वभावाची
तुमच्या प्रेमळपणाची
बस.... !!
तेवढे तुम्हालाही पुरे आहेना ..?
कारण तुम्ही कोठे ..?
परदेशात ..!
महानगरात ..!!
शहरात ...!!!
मी खेड्यात
कौलारू घरात
माझे शब्द तुमच्या शब्दाशी दोस्ती करून आहेत
तेवढे मला पुरे आहे
माझ्यां शब्दाचे आई बाबा धन्य आहेत ....!!

No comments: