Sunday, July 28, 2013

तू माझ्याशी लग्न करशील. Marathi Kavita Marathi Love Poems

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील. 
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच, तो लग्नाला होकार देईल.
 मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई-वडील हा निर्णय घेतील. 
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पेक्षा, तू माझ्याशी लग्न करशील....
मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार, कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार, 
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली, तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार.. 
तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील, त्याला ही भीक द्यायला तयार होतील, 
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा, तू माझ्याशी लग्न करशील...
यदा कदाचित, तो मुलगा चांगला निघाला तरी.. फक्त जीवनाशी तडजोड म्हणून, तो लग्नाला होकार देईल.
तुझे पालक ही त्याचे रूप आणि मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे, हे पाहून लग्नास मान्यता देतील.
पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी, काय तू जीवनभराच नात जोडशिल..
अग एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा, तू माझ्याशी लग्न करशील..... 
तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल.. तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल.. मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..
हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर, मला माहीत आहे तू नक्कीच हसशील.. 
तरी पण.........
एका अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा, तू माझ्याशी लग्न करशील....

कुणीतरी आज् सांगेन् का माझ्या अबोलीला... Marathi Kavita Feeling Sad Poems

एक् मैत्रीण् होती माझी
जिवाला जीव देणारी,
आणि वेळे परि माझे
दुखही वाटुन घेणारी
तिला माहीत होत
माझ्या मनात आहे कोण्?
पण मी समजु शकलो नाही
प्रेमाचा.हा त्रिकोण्
विश्वास ठेउन तिच्यावर
सांगत होतो सगळ तिला
मला हवी होती माझी अबोली
हे माहीत होत तिला
माझा निरोप घेउन
ती वेगाने पळायची
माहिती न्हवत पण् का ती
मनातल्या मनात जळायची
मला न्ह्वत माहित ती
अस का वागली होती
कदाचित ती ही माझ्यावर
प्रेम करायला लागली होती
पण् माझ्या मनात तर्
एकच् अबोली होती..
जी थोडी शांत
थोडी अबोल होती
ठरवल जेंव्हा आता
तिला बोलायचे सर्व् काहि
तेंव्हा माझी मैत्रिण् म्हणाली मला
तुला सत्य अजुन माहित नाही
प्रेम् करतोस् तु जिच्यावर
ति तुझी अमानत नाही...
तु इथे तिच्या
प्रेमासाठी झुरत आहे
आणि ती तिकडे कुणाच्यातरी
हातात हात घालुन फ़िरत आहे
तिचा एक्-एक शब्द
माझ्या काळजात शिरला होता
अशा प्रसंगी माझ्या मैत्रिनिणेच
माझा हात धरला होता माहित होत आता मी माझ्या अबोली पासुन
खुप दुर जाणार आहे
आणि माझी मैत्रिणच
माझी जिवनसाथी होणार आहे
,मी ही मग अबोलीच्या
आठवणींची होळी केली
आणि मैत्रिणीसोबत आउष्याला
नव्याने सुरुवात केली
हि तर आउष्याची
नवी सुरुवात होती..
पण् तरिही कसली तरी
कमी जाणवत होती.
दिवसा मागुन दिवस गेले
सर्व् काही बदलले होते.
ती ही बदलली
जिला मी जिवनसाथी म्हणुन निवडले होते.
मी आणि माझी अबोली
तिच्या जाळ्यात फ़सलो होतो हे मला समजु लागले होते
माझ्या आणि अबोलीच्या दुराव्याचे
कारण उमजु लागले होते,,
कोण मला फ़सवत होते
आणि कोण् माझी अमानत न्ह्वती
हे मला आता कळुन चुकले होते
म्हणुनच तर् मन् माझे
अबोलीच्या एका भेटीसाठी आउष्यभर मुकले होते......

पण्..
कुणीतरी आज् सांगेन् का माझ्या अबोलीला...
आता फ़क़्त एकदाच ये भेटायला...
जाता जाता मनातल सांगेन तिला
येताना मात्र अबोली
गुलाबाच एक् फ़ुल घेउन ये
आणि पहिला स्पर्श तुझाच असुदे
माझ्या समाधिला..........

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे,.. Marathi Kavita : Marathi Sad Feeling Lonely Poems

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते टपोरे घारे डोळे
व गुलाबासारखे गाल
तुझे ते ओठ नशिले
आणि मस्तानी चाल
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

Marathi Kavita : उत्तर दे ??????????????

माझ्याशी बोलू नकोस
अस म्हणतेस?
मग गपचुप माझ्या मोबाइल
वर misscall का देतेस?

छोट्या छोट्या कारणं वरुण
भानडतेस ,
मग स्वताच थोड्या वेळाने
sorry का म्हणतेस?

फिरायला जाऊ अस
म्हणतेस,
मग decide करताना
इतकी का डगमलातेस ?

रस्त्यावर हात पकडू नकोस
अस म्हणतेस,
पण इकती असल्यावर गपचुप
hug कशी करतेस?

माझ नाव तुझ्या सोबत जोडाव
अस म्हणतेस,
मग कॉलेज मधे पोरानी चिडवल्यावर
इतकी का भड़कतेस ?


दुसर्या couple ला पाहून romantice
होतेस,
मग स्वत रोमांस करायला इताकि
का लाजतेस?

माझ्यावर प्रेम करतेस
अस म्हणतेस,
मग तुझ्या आईला का घाबरतेस?

कविता कॉपी च्या आहेत
अस म्हणतेस,
मग sarvya कविता करतो
असा मैत्रिनिना का सांगतेस?

कविता वेईगरे जमत नाही
अस म्हणतेस,
मग माझ्या कवितेच answer
देयायला का बघतेस?
=========@========
देशील का उत्तर?? कवितेतून??

Marathi Kavita : तुझ्या लग्नाच आमंत्रण...

माझ्या साठी फ़क्त आता
एवढच करशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
तुझ्या लग्ना मधे
मी नक्की नक्की येइन
शेवटच्या दिवशी तुला मी
डोले भरून पहिन
तो दिवस माझ्या साठी
खुप दुखाचा असेल
त्या दिवशी माझ्या कड़े पाहून
हळूच हसशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का
तू नाही बोलवलस तरी
सुधा येइन तुझ्या साठी वेटर्स च काम मी करीन
मी भरलेल जेवनाच ताट
तू खाशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?

तो दिवस माझ्या साठी
खुप दुखाचा असेल
त्या दिवशी मी मंगल अस्टका गाइन
ती मंगल अस्टका खुप दूखाची असेल
ती ऐकून तू हळूच रडशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?
जसा सग्ल्यांचा निरोप घेशील
तसा माझा सुधा घेशील का
डोळ्यात डोळे घालून मला
जाऊ का म्हणशील का ?
जस रोज take care ,
have a nice day
गाड़ी सावकाश चालव
अस बोलायाचिस तस् बोलशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का

कदाचित तुझ लग्न मला
नाही होणार सहन
माझ्या डोळ्यात माझ च
दिसल मला मरण
मी मेल्यावर गुलाबाच फुल
माझ्या फोटोला वाहशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का..?

Marathi Kavita : हे शहर काळोखात बुडत असते ...!!

कसे हे गाव
हे शहर
काळोखात बुडत असते
मी बघत बसतोय ह्यांचे
काळोखात बुडणे
हलके हलके विरघळून जाणे
रात्रीचे दहा वाजून गेलेले
तरी कसा प्रकाश होता
संध्याकाळचा मंद मंद प्रकाश
सगळीकडे झिरपत होता
हवा अशी मस्त होती
थंड थंड नि निव्ब्वळ थंड होती
वाटत होते
रात्र आता होणारच नाही
काळोख होऊन
गाव काळोखात बुडणारच नाही
तरीही हे गाव काळोखात बुडत होते
हे खरेच जाणवत होते
संध्याकाळच्या संधी प्रकाशाला
काळोख हलके हलके आवळीत होता
प्रकाशाचे केविलवानेपण जाणवत होते
नि हे गाव
हलके हलके काळोखात बुडत होते

रस्त्यावरचे लाल ,हिरवे सिग्नल
निराळ्याच रंगाचे भासत होते
रस्ते सुन्न होते
शुकशुकाट होता सर्वत्र
हे परदेशात असेच होते
ह्या बर्फाळ हवेत रात्र अलगद उतरत असते
हे गाव ,हे शहर काळोखात बुडत असते

ही रेल्वे लाईन
लांबलचक पसरलेले रूळ
त्यांचे रंगीत सिग्नल
लाल ,हिरवे ,पिवळे
प्रकाशाचे टिंब
धुक्यात विरघळत होते
काळोखात बुडता बुडता
मी आहे म्हणत होते
ईतकेच काय ते
बाकी गाव काळोखात बुडत होते

ही गच्च झाडी
हिरवी हिरवी गच्च पाने
कशी काळोख होत होती
झाडापानातून काळोख सांडत होता
बुंध्याशी काळोखाचे गच्च थारोळे
साठलेले बघत होता ..
हलकेहलके हा काळोख
झिरपत झिरपत पसरणार आहे
नि हे गाव काळोखात बुडणार आहे
मी बघत बसतोय ह्यांचे
काळोखात बुडणे

Marathi Kavita : फारशा कविता नको करीत बसू ..!!

[एका काविमित्राचे नुकतेच लग्न ठरलेय. त्याला जरा उपदेश.
किंवा ज्या कवी मित्रांचे लग्न ठरलेय त्याना देखील ...]


आता आताशी फारशा कविता नको करीत बसू
थोडेसे मन मोकळे ठेव ,शब्दांच्या मोहात नको फसू
तुझे लग्न ठरलेय म्हणून हे म्हणतोय
थोडासा मनाला आराम दे म्हणतोय
शब्दाची शेती नको करीत बसू
फुलबागा शब्दांच्या नको फुलवीत बसू
ती आली की तिच्याशी थोडेसे बोलत बस
मनमोकळे होऊन जरासा हस
जरासा हसलास की कसा छान दिसशील
मग जरासा तिच्या डोळ्यात बघ
चांदणे कसे फुलून जाईल
मग तू मोहरून जाशील
कविता काय...?
कधीही फुलतील
कधीपण जमतील
कवितेचे ढग कधीपण जमतील
हलके हलके बरसून जातील
चिंब होऊन भिजून जाशील
ती अलगद येईल नि तू हलकेच गाशील

म्हणून म्हणतोय आता आताशी फारशा कविता नको करीत बसू
थोडेसे मन मोकळे ठेव, शब्दांच्या मोहात नको फसू ...!!

Marathi Kavita : पाहून तिला दुसरया बरोबर फिरताना.........

पाहून तिला दुसरया बरोबर फिरताना
बी पी झाला हाय
टेंशन नका घेऊ मित्रांनो
या प्यायला चाय ....
किती ही जवलची पोरगी असली
तरी विश्वास ठेवायचा नाय
लबाड आहे ही दुनिया
पाय घसरून द्यायचा नाय
थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर
नंतर करतील बाय
अचानकच सोडतील हाथ आपल्याला समजणार पण नाय
आज याच्या बरोबर
उद्या त्याच्या बरोबर
त्यांचा नींयम नाय
जास्त कमी काय बोललो तर म्हणतात
इथेच राहतो आमचा भाय
टेंशन नका घेऊ मित्रांनो या प्यायला चाय
जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय
तिच्या विरहात आपल जगन कधीच सोडायच नाय
तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय फाय
तिला पण दाखउन दयायच आम्ही
कुठेच कमी नाय..

Marathi Kavita : कसे आयुष्य फुलून जाते ..!!

कशी अचानक गाठ पडते..?
कसे आयुष्य फुलून जाते..!
ती आली की ,
कसे ऋतू बदलून जातात
अगदी हवेहवेसे होऊन जातात
आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते
मस्त सूर नि ताल
मन कसे गाऊन जाते ....!!

कशी अचानक फुलापाखारासारखी येते
मनाच्या आभाळात गिरकी घेत झुलत राहते
कसे मनसोक्त सूर लागतात
सूर कसे ताल धरतात
सगळेच कसे बदलून जाते
निळ्या निळ्या आभाळाचे
छान कसे गाणे होते ...?

ती आठवली की
मन कसे सैरभैर होते
शरीरावर रोमांच उठून जातात
कसे रक्तामध्ये दिवे पेटून जातात
कोणीतरी काळीज ओंजळीत घेऊन
कुणालातरी देऊन टाकते
ती दिसली की असेच होते
असेच होऊन जाते

आपण सर्वस्वी तिचे होऊन जातो
काळीज आपले हरवून बसतो
शप्पत हे खरे असते
हरवल्याचा हिशेब कोणी ठेवीत नाही
ती आपली झाली की खरेच असे होते
हरवण्यात देखील गम्मत असते ..!!

Marathi Kavita : घात...

गर्दीत हात सुटला तुझा
कासावीस मन झाले
नयनांच्या कोनात मग तेव्हा थेंब दोन आले
एकमेकांना नजर देऊन ते ही थोडे कावरे-बावरे झाले

एकटीच मी गांगरलेली.. एन सोबतीला..
तुझी जागा भरून काढायला म्हणून कि काय कुणास ठाऊक ??
मला छळणारा - तुझा गंध सामावलेला - तू माळलेला गजरा..
अनोळखी ठिकाण.. सारेच नवे..
मनाला भेदून टाकणाऱ्या कित्येक नजरा..

वेळ सरत होती तसे पटीपटीने वाढणारे श्वास..
एन चटकन समोर येऊन उभा राहशील असे असंख्य भास..
मी हरवेन, मला काही होईल याची पडलीच नव्हती..
तू कसा असशील हा एकच ध्यास..

हळू हळू गर्दी कमी होऊ कमी होऊ लागली..
एक जीवघेणी भीषण शांतता पसरली आसपास..
थकून गेले डोळे आणि सर्व आशा खल्लास
डोक्यान म्हटलं आता बास
पण मन काही मानेना
संकटात सापडलेले.. तासन तास उलटून गेले तरी तू येण्याची आस..
दुकट्यान केलेला तो शेवटचा प्रवास
आता काही वाट संपत नाही..
पूर्वी सारखे वाटेवर कुणी ओळखीचे पण भेटत नाही

मी भोळसट असेन कदाचित पण वेडी नव्हते..
ती चुकामुक नव्हतीच..
तो होता निव्वळ माझ्या आत्म्याचा विश्वास घात
आकांत केला.. चिडले.. रागावले..
तुला शोधून जाब विचारेन म्हटलं..
पुन्हा माझच मन शंकांनी दाटल..

तुला वाटल मी हरवले.. त्या गर्दीत कायमची भरकटले..
पण आता भानावर आलेय..
जगण्याला खरी दिशा मिळालीय
सौभाग्याच्या जिवंतपणी एक अभागी जीवन जगतेय
जगासाठी मी मेलीय.. तुझ्यासाठी हरवलीय ..
आज चित्र वेगळे असते नक्कीच
जर मी " तुझ्यात हरवलेले " तुला वेळीच कळले असते..

Marathi Kavita : वेडं मन...

नेहमीचंच ते हसणं बोलणं,
पण हवंहवंस का वाटू लागतं?
"फक्त मैत्री" म्हणता म्हणता
मैत्रीची सीमा का गाठू लागतं?

आतापर्यंत शहाणं राहिलेलं हे मन
अचानक वेड्यासारखं का वागू लागतं?
उद्या तिच्याशी काय बोलावं या विचारात
रात्र रात्र ते जागू लागतं.

हळू हळू वाटू लागतं कि
तिला हि याच भावना आहेत.
हेच गृहीत धरून मन मला
"carry on, carry on" सांगू लागतं.

सहज कधी बोलता बोलता
अचानक मन हळवं होतं.
रुजलेल्या भावनांचा खुलासा
तिच्यासमोर करून देतं.

तिच्या मनात तसं काहीच नाही
हे इथवर पोहोचल्यावर उमगतं.
कायम उंच भराऱ्या घेणारं हे मन
क्षणांत असं मग कोमेजून निघतं.

एखादया परक्यासाठी कायम
का हे मन असं झुरतं?
ज्याला किंमत नाही प्रेमाची
त्यावरच का ते प्रेम करतं?

Marathi Kavita : झाडे वाट बघत बसतात ...!!

मी बघतोय ह्या देशातील सूर्य
बर्फात गुंडाळून ठेवलेला
शुभ्र वाटतोय खुपसा
पण तोंडावर बोट
गप्प गप्प मुकामुकासा
जीव गुदमरून जातोय त्याचा
बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड
चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे
बाहेर निसटले की तेही गारठून जातात
लंगडत लंगडत खुरडत
हलकेच झाडावर रेंगाळत बसतात
शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर
पिवळ्या उन्हाचा तुकडा
हलकासा स्पर्श
नुसता कोरडा
निर्जीव
केविलवाणा...!!

झाडे मिटल्या डोळ्यांनी घेत राहतात त्याचा स्पर्श
कधीतरी पेटून उठेल
नि त्याचा उष्ण श्वास
अंगा-अंगावर झुलेल
नि पालवी फुटेल हिरव्या स्वप्नाची
झाडे शांत
क्लांत
स्वप्ने बघत रोमाचून जातात
आपल्या हिरव्या गर्भारपणाची
मिटल्या डोळ्यांनी वाट बघत बसतात
कधी विरघळून जाऊ त्याच्या गच्च मिठीत
नि उजवेल कूस कधी..?
केव्हा ..?
झाडे वाट बघत बसतात
त्याच्या सळसळण्याची
त्यासाठी ती शांत
ध्यानमग्न
आतुर होऊन जातात
आत्मसमरपणासाठी .......!!

Marathi Kavita : तू आठवत राहतेस...

कसे आभास होत असतात मला
कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या
तू आठवत राहतेस संध्याकाळी
तिन्हीसांजेला,
कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या
ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी
अलगद पावलांनी
किती दूर आहेस तू
नि मी असा परदेशी
फक्त एकटा
माझ्या खिडकीतून बघत बसतो
हे खिन्न आभाळ
नि घराकडे परतणारी पाखरे


तुझ्या आठवणीचे
किती काहूर उठतात मनात माझ्या
नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे
गच्च कल्लोळ नुसता
मी गुदमरून जातो
तुझ्या आठवणीत


मग कधीतरी अचानक
फोनवर बोलताना दिसू लागतो मला
देवघरातील दिवा
नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव
किती शांत पणे सहन करीत असतेस
माझा विरह
मुलाना सांभाळीत
हे सगळे आठवून
हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो
माझ्या मनातला
नि हलके हलके शांत होऊन जाते मन
मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थनापाखरासारखी निशब्दपणेपंख मिटून
झाडा -पानात हरवून जाते
तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी
माझेही मन होऊन जाते निशब्द
मन मिटवून
प्रार्थनेच्या स्पंदनात
आत्ममग्न
तुला विसरण्याचा
एक छोटा प्रयत्न ...

Marathi Kavita : सुचत नाही .!!

सुचत नाही
सुचत नाही
काही केल्या कळत नाही
कसे रुसून गेले शब्द
असे कधी झाले नाही
काय चुकले माझे
शप्पत काही कळत नाही ..!!

पूर्वी कसे छान होते
नुसते शब्द फुलत होते
कळीतून फुल फुलावे
तसे सगळे घडत होते
काय झाले ..?
काय घडले ..??
शप्पत ..!
काही कळत नाही ..!!

ढग दिसले
शब्द बरसले
फुल दिसले
शब्द फुलले
पाखरू दिसले
शब्द झुलले
आज काय झाले ..?
काय घडले ..?
शप्पत काही कळत नाही ..!!

कसे नापिक होउन गेले मन
शब्द कसे अंकुरत नाही
काय करावे ..?
कसे करावे ..??
खरेच काही कळत नाही ..!!

सुचत नाही
सुचत नाही
खरेच काही कळत नाही ...!!

Marathi Kavita : तिच्या विरहात जगन आता..

तिच्या विरहात जगन आता
खुप मुश्किल झालय
म्हनुनच माझ नाव
यम देवाकड बुक केलय
नाही उरली जगण्याची इच्छा
मला आता दूर जायचय
या खोट्या दुनियेत
मला अजिबात नाही रहायच
अहो आज पर्यन्त ती
खुप प्रेम करत आली
अचानकच मला फसउन
दुसय्रा बरोबर गेली
"तू माझ्याशी लग्न नाही केलस तर
मी जिवच देंइन" अस सारख बोलायची
म्हनुनच मला सवय झाली
प्रतेक स्थळ नाकारायची
घरचे सगले रागवायचे
गावातले लोक नाव ठेवायचे
पापा आणि आई रोज
टेंशन मधेच असायचे
माझ्या बरोबरच्या मुलांची मूल
शाळेत जाऊ लागली
आणि आमची लग्न पत्रिका अजुन कोनाशिच
न्हवती जुळली
आता नाही करायच लग्न मला
ना आता जगायचय
या धोकेबाज लोकांपासून
मला दूर निघून जायचय
खरच तुझ्या विरहात माझ जगन मुश्किल झालय
आणि जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय
जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय

Marathi Kavita : तू कॉल करणार होतास..

तू कॉल करणार होतास
संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

Marathi Kavita : कसे डोळे बोलत असतात ..!!

कसे डोळे बोलत असतात
तुम्हाला न कळत काहीतरी म्हणत असतात
नजर ओळखता येते
बेरकेपण समजून जाते
लबाडी डोळ्यात दिसते
निर्व्याज मन अलगद दिसते
कसे डोळे बोलत असतात
तुम्हाला न कळत काहीतरी म्हणत असतात

डोळ्यात दिसत असते बेरकीपण
दिसत असते खुनशीपण
मग्रूर
बेफिकीरपण सुद्धा दिसत असते डोळ्यात
कधी कधी धारदार नजर
जरब असते डोळ्यात कुणा कुणाच्या

डोळ्यात दिसत असते भोळेपण
डोळ्यात दिसत असते अल्लडपण
निर्मळ मन
आदर
आपुलकी
सहानभूती
आणि
करुनेणे ओथंबलेले
मी पाहिलेत
असे करुणेने भरून आलेले डोळे
नि ओंजळीत आभाळभर प्रार्थना
नि प्रसन्न स्मित
गंगटोकला
बुद्ध विहारात
एका तरुण भिक्कुचे

कधीच न्हवत वाटल मला... | Marathi Sad Heart Touching Kavita | Sad Break up Kavita

कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडल
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडल
नेहमी मला म्हणायची ती
डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलान्नी
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
भाराउन च गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती
( खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय पण तिला विसरता येत नाही तिला आठवल्या शिवाय क्षण जातच नाही .........मित्रांनो / मैत्रिनिन्नो प्रेम करत असाल तर खर करा टाइम पास म्हणून करू नका, गरजे पुरत करू नका , दुसर्याच जीवन अस माती मोल करू नका ...... तुमच्या विरहात एखाद्याला जगन मुश्किल करू नका )

Marathi Kavita : आपले शब्द छान मित्र झाले आहेत ..!!

मी तुमचे नाव ऐकून आहे
तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात
आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत
कोण हो तुम्ही.?
कोण हो मी ..?
हा आपण प्रश्न नाही विचारायचा
कधीसुद्धा ..!!
कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत
आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या
मुठभर उधळलेल्या ....
आपापल्या परीनं चमकत राहतील
चांगले मित्र होऊन मस्ती करतील
करुद्या...!
खेळूद्या ...!!
आपण त्यांची मैत्री बघू
कधीतरी मनात येते माझ्या:
शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे
किती छान आहेत ....!
मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
[कारण आपण आपल्या शब्दांचे आई -बाबा आहोत ना ??]
तरीसुद्धा
आपण नाही भेटायचे कधी सुद्धां ....
एकमेकानां
आपले शब्द भेटतायतना ?
मला
तुम्हाला
आपल्याला
तेवढे पुरे आहे
नाहीका ..?
तुमच्या शब्दावरून मी छान कल्पना करतोय तुमची
तुमच्या स्वभावाची
तुमच्या प्रेमळपणाची
बस.... !!
तेवढे तुम्हालाही पुरे आहेना ..?
कारण तुम्ही कोठे ..?
परदेशात ..!
महानगरात ..!!
शहरात ...!!!
मी खेड्यात
कौलारू घरात
माझे शब्द तुमच्या शब्दाशी दोस्ती करून आहेत
तेवढे मला पुरे आहे
माझ्यां शब्दाचे आई बाबा धन्य आहेत ....!!

तुझ्याशिवाय

मला नाहि वाटत आता
पुन्हा अस काही घडेल.
घायाळ मन माझ पुन्हा
प्रेमाची पाउल वाट धरेल .........

जाता-जाता ती कस
सहज बोलून गेली.
विसरून जा मला आता
हो.. सपले.. सर्व काही...

मी मात्र प्रेमात तिच्या
पार वेडा झाला होतो.
स्वप्नंlत तिच्या रंगून माझी
दुनिया विसरून गेलो होतो.....

आता वाटा माझ्या संपतात
पण सोबत तुझी नसते.
माझा मीच चालतो. पण,
सगंत सावली तुझी नसते.

आता आठवणी शिवाय ओंजलित
माझ्या उरत काही नाहि.
आणि मागे वलून पाहायला
तुझी गोड हाक नाहि.......

Marahti Kavota on Life : जीवन असेच पुढे सरकत असते...!!

पहाट झाली.
कोंबड्याने बांग दिली.
मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां.
सायकलची घंटी वाजली.
चला पेपर आला..

हे रोजचेच असते,
सकाळ झाली की उठणे भाग पडते,
चहाचा गंधही झिरपत येत असतो.
चहा पितापिता पेपर चाळत बसतो.
संप ,अपघात ,उपोषण
ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...?
सिनेमाची जाहिरात बघत नाही,
सिनेमा आजकाल टि.व्ही. वर कधीपण बघता येतो.
महागाई तर वाढत असते नको ईतकी,
खिशाला पडलेले भोक वाढत असते
तिळातिळाने....

कालच, लोकलच्या डब्यात स्फोट झाला.
किती मेली अधिकृत ..?
किती गेली अनाधिकृत ..?
तो जिवंत आलाय ही देवाची कृपा.
बायको रोज देवापुढे हात जोडून प्रार्थना करते आजकाल,
देवा सुखरूप येउदे नवर्याला.
आताशी कोठे सुरवात आहे,
नुकतेच झाड फुलत आहे.

स्फोट झाल्यावर २-३ दिवस असेच चालते.
नवस प्रार्थना,
मग अलगद विसरले जाते.
जीवन असेच पुढे सरकत असते ...!!

Marathi Prem Kavita : तुला कस कळात नाही ?

बोलायचं आहे पण बोलणार नाही
ओठांवरचे शब्द ओठांवर आणणार नाही
तुझ तुलाच कळावे म्हणून मी आहे शांत
पण तुझ तुलाच कळत नाही

डोळ्यात पाणी आहे पण तुझ्यासमोर वाहू देणार नाही
कारण या मोत्याचं निर्माता तूच आहे
म्हणून मी डोळे पुस्नारही नाही
पण तेही तुला कळत नाही

सोबत तुज्या चालत आहे त्याची तुला गरज आहे
पण हात तुज्या हाती देणार नाही
कारण तू तो मागितला नाही
तुझी गरजाही तुला कळत नाही

क्षण क्षण माझी आठवण आहे
त्या क्षणात झुरतही मीच आहे
तुला हवीशी वाटणारी तुझ्या जवळ नाही
तरीही तुझ मन तुलाच कळत नाही

हसावस वाटल कि लगेच माझ नाव आहे
रडतांनाही डोळे पुसणारा रुमाल माझाच आहे
ठेच लागून पडतांना देणारा आधारही मीच आहे
तरीही माझ्याशी फक्त मैत्रीचा साथ आहे
तू प्रश विचारलास तर उत्तर नक्की देणार आहे
पण सुरुवात तू करावी हा माझा अट्टाहास आहे
तू विचारलेल्या प्रशांना प्रश मात्र करणार नाही
तुझ तुलाच कळतंय काय ते बघायचं आहे

Marathi Prem Kavita : पण ती येईल काय ?

आतुरतेने तिच्या येण्याची वाट बघतोय.
भेटीची तिच्या स्वप्न रंगवतोय.
दिशा दाखवणारी ती म्हणून वाट चुकतोय.
वाट चुकली म्हणून सावरायला तरी ती येईल काय ?
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची पुसणी करायला तरी ती येईल काय ?

लागताच चाहूल पावसाची आठवणीत तिच्या भिजायचय
तिच्या समवेत सरींमध्ये खूप खूप खेळायचय
एकाच आश्रयाखाली भिजलेली तिला बघायचय
थरथरनार्या शरीरातून अबोल आवाज ऐकायचाय
पण त्या सरी घेऊन तरी ती येईल काय ?

तिला फुल आवडतात म्हणून मला वेचायचीय.
केलेला गजरा मलाच तिच्या वेणीत माळायचाय.
सुगंधाने फुललेला चेहरा मला न्याहाळाचाय.
डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंना अलगद टिपायचाय.
पण फुलांचा येताना बहर तरी ती येईल काय ?

राणा वनात एकट्यानेच तिची वाट बघायचीय.
पश्चिमेकडून प्पुर्वेकडे जाणाऱ्या प्रत्येक सावलीत तिची प्रतिमा उमटवायचिय.
तिला वेड लावेल अशा चांदण्या रात्री तिला खुलवायचिय.
पण मला साखर झोपेतून उठवण्यासाठी तरी ती येईल काय ?

आली तरी माझ म्हणन ऐकून घेईल काय ?
डोळेभरून तिला पाहता यावे म्हणून तरी ती येईल काय ?
म्हणून तरी ती येईल काय ?

Marathi Virah Kavita : माझ्या प्रेमासाठी खास

तुझ्यापासून दूर अजून किती दिवस राहायचे..??
पाण्याच्या एका थेंबासाठी चातकाने अजून किती वेळ झुरायचे..??

तुझ्यापासून दूर आता खरच राहवत नाहीये...
तहानलेल्या चातकाला पावसाची वाट पाहवत नाहीये...

आयुष्याचा हिशोब कसा अजब होऊन बसलाय...
मिळवले तरी तूच .....आणि बघितले तरी तूच...

व्यर्थ माझे हे आयुष्य अन  व्यर्थ माझे हे जीणे....
तुझ्यावर केलेल्या चारोळ्याला तूच दाद न देणे....!!!

Marathi Poem : अर्थाचा अनर्थ

महाराष्ट्राकडून महाराज्याकडे
हाच संकल्पाचा अर्थ आहे.
मंत्री आणि आमदारांना वाटतेय
हा संकल्पच व्यर्थ आहे.

एवढे मात्र कबूल की,
हा अर्थसंकल्प शिलकी आहे!
विरोधकांपेक्षा सहकार्‍यांचीच
प्रतिक्रिया कितीतरी बोलकी आहे!!

Marathi Charoli : तीच उरते तीच ओसंडून जाते

मखमली काटे जणू फुलवून जाते
हाय ती जेव्हा अशी लाजून जाते
मी रिकामा व्हायचो नाही कधीही
तीच उरते तीच ओसंडून जाते
दार करतो आठवांचे किलकिले मी
ती मनाचे कोपरे उजवून जाते
लांबतातच सावल्या बघ सांजवेळी
सावलीला हाक मारून ऊन जाते
दोन श्वासांचीच पडते आहुती पण
जन्मभरिची वासना पेटून जाते...

एकट्याने ...!!

ती आठवत असते कधीपण
संध्याकाळी
तिन्हीसांजेला
अवचित तिची दिसू लागते लगबग
नि देवाजवळची पणती
तिची आर्त प्रार्थना
तिची आठवण येताच व्याकुळ होऊन जातेय मन
सगळे जागच्या जागी
जसेच्या तसे
नि तो असा अस्थिर .
व्याकुळ उध्वस्त

कधीकधी ती स्वप्नात येत असते
अचानक ,नकळत
जुन्या आठवणीतली
तिला हवे असते काहीतरी
न बोलता ती करीत राहते खाणाखुणा
तो लावीत बसतो एक एक अर्थ
तो आठवीत बसतोय काय हवे असेल तिला
नि आठवता आठवता येऊन जाते जाग
नि मग नुसता कल्लोळ मनात
कसे जगायचे आता
एकट्याने....
किती दिवस नि किती काळ ..?

मनातला पाऊस ...!!!

असाच काल कंपनीच्या गाडीतून जात होतो
भूरभूर पाऊस नुकताच सुरु झालेला
ट्राफिक नेहमीपेक्षा जास्तच
नजर खिडकीतून बाहेर रोखलेली
शून्यात
गाडीमध्ये रेडीओवर नेहमीसारखाच गोंधळ
आणि अचानक गाणे बदलून
"सावन बरसे तरसे दिल
क्योंना घरसे निकले दिल " चे
मनाला भिडणारे सूर ऐकू येतात
आणि मग ते हरिहरनचे सूर घेऊन जातात परत मागे
चालत्या गाडीला कोणीतरी रिवर्स गियर टाकावा
आणि सुसाट घेऊन जावे तुझ्या गावाला तसाच काही तरी
आणि उलगडावी तुझी प्रत्येक आठवण
वार्याने जशी पुस्तकची पाने आपोआप उलगडत जावी तशीच
बोटाला सुई मारावी आणि झरझर रक्त बाहेर यावे
असेच काही तरी गाण्याने केले होते
खूप दिवस धुळीने झाकाळलेली तुझ्या नावाची पाटी
एक दिवस पावसाने धुवून निघावी
आणि तुझा नाव लख्ख दिसावं असाच काही तरी
परत तीच काळजात धडधड
जिवंत असल्याचा पुरावा
म्हणूनच की काय निर्जीव झालेल्या मनाला
मातीचा दरवळलेला सुगंध ही जाणवू लागलेला

पापण्यांत आसवांना थांबवत नाही..

पापण्यांत आसवांना थांबवत नाही..
कसे सांधु नशिबा कळत नाही

सारे रोजचे तरी झेलतो नव्याने...
कसे घाव हे दुखाचे टळत नाही...

किती सुंदर होते तुझे येणे खुशाली..
तिच आशा अन वेदनेस गाळत नाही..

कशास करता अट्टहास उगाचा
बाजारात सुख  म्हणे विकत नाही..

पैस्या पैस्यात उभे आयुष्य गेले..
तीच्या गज-याचा त्यात सुघंध नाही.

उभाच राहतो आशेत त्याच्या..
मंदिरात तो ही कधी भेटत नाही..

आता कशाच काही वाटत नाही.....

श्रावण आला पण पाऊस नाही , झाडावर   पाखर नाही
मल्हार आरविला पण मेघ गर्जना काही होत नाही ....
                                                                 
आता कशाच काही वाटत नाही
देव आहे पण भाव नाही,  सोंगाडे आहेत पण भक्त सापडत नाही
गजर हा तुझ्या नावाचा पण साद काही पोहचत नाही
   
                                                             आता कशाच काही वाटत नाही 

अर्थ मंत्री बदलले पण GDP काही वादात नाही,
काळ्या पैश्यावर कोणाकडे काही उत्तर नाही
दिवसेंदिवस वाढे भ्रष्टाचार पण महागाई काही कामी होत नाही

                                                      ....... आता कशाच काही वाटत नाही

Strategy बदलल्या  पण Recesion जात नाही,
 Performace दिला तरी ipad काही भेटत नाही
 Revenue  वाढला .....रात्रं दिवस कामी घातले..
                ...वर्षे गेली  पण appriasal  काही होत नाही......

तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त ...Marathi Kavita : मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता

तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त ..
आपल्या पहिल्या भेटीत एक नातं जडलं होतं
आता मला माहित नाही पण तेव्हा तुला माझ्या बद्दल काहीतरी वाटतं होतं
मी ही म्हणून धाडस केलं होतं
आज तेच नातं तोडताना तुझ्या डोळ्यात साधं पाणी ही न्हवत

आपल्या प्रत्येक भेटीत आपण एक नवीन स्वप्नांचं घर बांधलं होतं
आज तीच स्वप्ना उधळताना तुला काहीच वाटत न्हवत
नेहमी भेटल्य्वर घट हाथ धरणारी तू
आज तोच हात सोडताना माझ्या कडे तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ही न्हवत .

नेहमी तासन तास बोलणारी तू
अन " उद्या करशील ना रे फोन " असं बजावणारी तू
आज माझ्याशी कायमचा अबोला धरताना
तुला काहीच कसं वाटत नह्व्त

येवडचा मी जर नकोसा होतो तर
आधी होकार का दिलास
अन एका वाटेवर आपण सुखाने चालत असताना
अर्ध्या वाटेवर माझी साथ सोडताना
तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त .
काहीच कसं वाटत नह्व्त .....

हरवलेली पाउलवाट ..!!

वाटा, पाउलवाटा
नागमोडी
वाटा तळ्याकाठच्या
गवती फुलांनी फुललेल्या
त्याला आठवतात
नागासारख्या वळत गेलेल्या
फणा काढून फुक्तारनार्या
तो हरवून जातो स्वताला
कुठल्याशा तळ्याकाठच्या
पाउलवाटेवर ...

त्याला आठवते ती पाउलवाट
तळयाजवळची
तळ्याकाठची...
सापाच्या शेपटीसारखी
नि ते गर्द निळे पाणी
त्यात उतरलेले आभाळ
पांढरा शुभ्र ढग
कधी सोबत ती
बिलगलेली....

खूप काळ हरवून गेला..
ह्या देशात परतायला
त्याच गावी
आजकाल तो शोधत असतो
ती पाउलवाट
असते नव्याने जन्मलेली
पण सोबत ती नसते
ती असते अस्तित्वाच्या पलीकडे
तो उभा तळ्याकाठी
त्याचेच प्रतिबिंब बघत
ती दिसतेय का..?
बिलगलेली....
कमीत कमी
त्या निळ्या निळ्या पाण्यात
पाण्याच्या भिंगात ...

अंत त्या कवीचा तू करू नकोस...

लिखाणास लेखणी सज्ज होती
पाने वहीची फडफडत होती..
मनात काहूर अनेक विचारांचे
शब्दासी मात्र जाग येत नव्हती...

कोड्यात पडले मन वेडे माझे
ना विचारांचे उलगडले कोडे
लिहिण्यास आज मजपाशी
ना उरले होते शब्द मजकडे...

क्रोधीत हे मन माझे
स्वताशीच आज भांडू लागले
कामाच्या या ओघापायी
का शब्द तू माझे हिरावले...

उतार-चढाव आयुष्यातील
सहज रित्या पार पाडत गेलास
ना पहिले कधी मागे वळूनी तू
पण या शब्दां पासून तू दुरावालास...

होते तुझेच शब्द सारे वेड्या
तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे
ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे
शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे...

सहज शब्दांसी गुंफणारा तू
स्वताच आज तू हरवलास
जन्म घेतला होता कवीने त्या
अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

आहेत तुझेच शब्द अजूनही सारे
त्यांच्या पासुनी तू दुरावू नकोस
आहे जिवंत कवी तुझ्यातला आजही
अंत त्या कवीचा तू करू नकोस...अंत तू करू नकोस...

माणसातला माणूसपणा खरच का संपत चाललाय???

इथे सगळ्यांच्या घराचा 
                        दरवाजा बंदच असतो,
माणसात राहण्यापेक्षा प्रत्येकाला 
                        एकटेपणा हवा असतो.
दारच काय इथे मनाचे 
                        कप्पेही बंद असतात,
बोलायचं म्हटलं कुणाला 
                        सगळे अनोळखीच वाटतात.
शेजारी राहून सुद्धा
                       माणसे अनोळखी भासतात,
खरच माणुसकीच्या व्याख्या 
                      इथे शहरानुसार बदलतात.
शेजार धर्माचे अर्थ 
                     मलाही नव्यानेच उमगले,
माणसातून एकटे राहताना 
                     फक्त वेड लागायचे राहिले.
सवय झली आता मलाही
                    एकटेपणा आवडू लागलाय,
माणसातला माणूसपणा खरच का संपत चाललाय??????

ढगांनी किती बरसावे ...?

ढगांनी कधी बरसावे ..?
आम्ही पावसासाठी  किती तरसावे ..?
जाता जाता  ढगाने  मागे वळून बघावे 
आणि त्वेषाने त्वेषाने  
असे भन्नाट बरसावे 
जसे वासरू लुचते तसे धरणीला  लुचावे 

ढग निघताना डोळे ओले झाले होते 
ढग न बरसताच निघाले होते 
व्याकूळ मन  आणि घशाला  कोरड  
तरी  ढग बरसत नव्हते 

दुष्काळच ठेऊन  चाललाय असेच वाटत होते  
दुष्काळाचे माप  ओटीत टाकून निघाले  होते  
डोळे भरले होते 
ढग हात हलवीत निघाले होते 
शेत कोरडे ,जमीन कोरड्या 
भेगा पडून वांझ झालेल्या 

ढग निघाले ..ढग निघाले 
न बरसतच निघून चालले 
आणि काय झाले कळलेच नाही 
माघारी वळले  नि भरते आले 
नि असा बरसला असा बरसला 
रसरसून लुचू लागला 
जीव गुदमरून गेला 

ढगांनी काय मांडले 
कसे अचानक बरसून गेले ..?
सगळे ओले ओले चिंब झाले 
ईतके बरसले ईतके बरसले 
पुन्हा  होत्याचे नव्हते झाले 
देवा आवर रे ह्या पावसाला 
बघणारे कसा छळ मांडला 
कोरड पडली होती घशाला 
नि आता नासवून गेला शेतीला ...
देवा  आवरनारे ह्या ढगाला  ...ह्या पावसाला..!!

तुझीच आठवण

माहिती नाही पण आजकाल जरा  शांत  रहायची इच्चा  होते  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच आठवण  येत आहे .

करण्यासाठी  खूप   काही  आहे  पण  काही  करायची  इच्छाच  होत  नाही  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे ..

झोप  येते  आहे   पण  नीटशी  झोप  घेऊ  पण  शकत  नाहीये
राहून   राहून  फक्त  तुझीच  आठवण  येत   आहे

तू  बसत   होतास  ती  जागा  आता  रिकामी  झाली  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे

नकळत  पणे  माझे  डोळे  तुझ्याच  पूर्वीच्या  जागेवर  तुला  शोधात  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  येते  आहे ...

तुझाशी न बोलून २ दिवस संपत  आले आहे
राहून  राहून  तुझीच  आठवण  होते  आहे  ....

तुझ्या  त्या  साब्दांचा  कानात  परत  परत  नाद  होतो  आहे
राहून  राहून  फक्त  तुझीच  आठवण  होते  आहे...

सतत  सतत  स्वतःल  सांगूनही  तुझ्याच  विचारांमध्ये  मी  गुंतते  आहे
साहून  राहुं  फक्त  तुझीच  आठवण  होते  आहे  ..

जाऊ  नको  मला  सोडून
राहून  राहून  मी   माझी  न  राहता  तुझीच  होते  आहे  ....

माझं स्वप्नं

काल रात्री मला एक स्वप्नं पडल होतं,
एका रात्रीत अवघं जग बदललं होतं.
सर्व राष्ट्र एकजूट होते,
युद्ध - प्रतियुद्ध घडतंच नव्हते. 
मानवता हाच होता एकमेव धर्म,
माणसाची महानता ठरवत होते कर्म.
पृथ्वीवर नव्हता एका ही भ्रष्टाचारी,
अस्तित्वातच नव्हती कोर्ट अन कचेरी.
कुलूपाविना होतं दार,
कारण तेथे नव्हते गुन्हेगार.
स्त्री पुरुष समानतेचा नव्हता वाद,
शुद्ध, सुंदर, प्रेमळ भाषेत होते संवाद.
राष्ट्र प्रगतीचे स्वप्नं पाहत होते नेते,
माणसा - माणसात होते बंधुत्वाचे नाते.
गुन्हे घडतच नव्हते, म्हणून पोलीस खातेच नव्हते,
गुन्हे घडतच नव्हते, म्हणून पोलीस खातेच नव्हते!

माझे हे स्वप्नं स्वप्नंच होते,
सत्य काही नव्हते,
सत्य काही नव्हते....

तो पावूस

पाउस थांबला होता 
पण पानावरून टप टप चालू होती 
मी पण थांबलो होतो 
तुझ्यावरून नजर हटली नव्हती 

स्वतःच्या पावलावर खिळलेले तुझे डोळे
हळूच वर पहात होते
पावूस थांबूच नव्हे
असेच जणू सुचवित होते

मला तरी दुसरे काय हवे होते
माझ्या छत्रीने काम साधले होते
जीवनभर छत्र धरण्याचे
मनोमन ठरवले होते

कावर्या बावर्या हरणीने
विशाल नेत्र मोठे केले
छत्री ऐवजी हातावरच माझ्या
कोमल हात ठेवले होते

पावसाच्या थंडीतही
हाताला चटका बसला होता
किती बरे वाटले होते
इश्काचाच फटका होता

आज परत पाउस पडत आहे
टप टप आवाजहि येत आहे
पण खिडकी बंद करण्यामध्ये
सौ चे हात गुंतले आहेत

आश्चर्य_वाटतं...!!

आश्चर्य वाटतं भारत देश अजूनही अस्तित्वात आहे...!!!
होय 
आश्चर्य वाटतं तो अजूनही कार्यरत आहे...

प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक इसमाने लाच घेऊनही,
केंद्रातून येणारे 
प्रत्येक पैकेज प्रत्येकाने ओरबाडूनही,
माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

'अर्थ'पूर्ण राजकारणात सर्वच भ्रष्टाचारी,
गल्ली ते दिल्ली नसे एकही सदाचारी,
तरीही राजकारभार चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

शासकीय रुगणालयात सुईपासून औषधापर्यंत घोटाळा,
कधी औषधांचा तर कधी डॉक्टरांचाच  तुटवडा,
तरीही दवाखाना चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' हा देऊनी नवीन नारा,
अपराध्याला नव्हे सापडेल त्याला चेपू असाच प्रकार सारा
करीत पोलीस ड्युटीवर आहे ! 
आश्चर्य वाटते...!!

देशाच्या तिजोरीवर सर्वांचाच भार,
नि सर्वत्र असूनही अनागोंदी कारभार,

तरीही  माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

तितक्यात होते पिता-परमेश्वराचे स्मरण,
नि उमजते देशाच्या अस्तित्वाचे कारण,
ईश्वर नामाचा नित्य गजर होतो जेथे,
'तोच' कर्ता-करविता नि संचालक असे तेथे,
शिर नतमस्तक होते,
नि शब्द आठवतात,

इये अध्यात्माचीये नगरी ! 
इये अध्यात्माचीये नगरी !!

दुरावा

तू माझी नाहीस 
दुसर्याची झालीस 
पण मला मात्र ठेवलेस 
उगीच का ओलिस 

शोभते का तुला 
रोज स्वप्नात येणे 
उगीच खोळंबून 
खोटे खोटे लाजणे 

काय हक्क आहे आता 
तुझा माझ्यावर 
हे छळणे  बस कर 
 सोडून दे  माझा कर 

माझ्या नशिबाला 
लावीन मी बोल 
विसरून जावू दे 
सम्भाळीन मी तोल

 जिथे असशील 
तिथे सुखाने रहा 
निदान त्याला सुखी ठेव 
आता त्याच्याच कडे पहा

Marathi Kavita : आयुष्य …. एक गुंता ??

आयुष्य जगा सरळ सोपं … 
नका करू त्याचा गुंता,
निष्पन्न काहीच निघणार नाही,
वाढत जातील काल्पनिक चिन्ता. 

प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला …. 
आयुष्य नाही पुरणार,
दुसऱ्याच्या अनुभवावरून शहाणे व्हाल… 
तर चिंतेला वाव नाही उरणार . 

आपली मतं दुसर्यावर लादल्यामुळे …
नाती मात्र तुटतात,
आयुष्यातले काही प्रश्न…. 
सोडून दिल्यानेच सुटतात. 

नात्यांच्या ह्या भाऊगर्दीत …. 
एकट जगायला जो शिकला,
त्याच्या आयुष्यातला आनंद … 
आयुष्यभर टिकला. 

नात्यांच्या जपणुकीत नका विसरु…. 
स्वतःचं आयुष्यातलं स्थान..

Marathi Kavita : शब्द..!!

मी बघितलेय शब्दांना फुलताना 
मी बघितलेय शब्द कोमेजताना
मी बघितलेत
शब्दांचे दिवे पेटताना

शब्दांशी मी खेळत असतो
शब्दांचे फुगे फुगवत बसतो
मी बघितलेत
शब्द फटकन फुटताना

शब्दात शक्ती असते
सुप्त अनु-रेणूची
शब्द मने पेटवून जातात
स्फोट घडवितात
शब्दांच्या सामर्थ्याने
सात मावळे दौडत जातात

शब्द ओथंबून येताना मी बघितले आहे
शब्दांची प्रार्थना मी अनुभवली आहे
माझ्या ओंजळीत
शब्दांचा दिवा
देवाजवळ तेवताना बघितला आहे

शब्द रडतात
शब्द रडवतात
डोळ्यातून चक्क पाणी काढतात
बाबा गेले नि भिजून गेले आईचे शब्द
शब्दांनीच सावरले आईला
आणि शब्दाना बघितलेय
तिला सावरताना

त्या दिवशी
शब्दानाच बघितलेय
तिच्या डोळ्यातील आसवे पुसताना
आणि आम्हालाही धीर देताना
आणि आमच्या पाठीशी ठाम
आई होऊन ....

Monday, July 8, 2013

Marathi Prem Kavita : एकटी होती तेव्हा आनंदी होती

एकटी होती तेव्हा आनंदी होती
स्वतःच्या छोटुल्या जगात समाधानी होती
साध सरळ जीवन मस्त होत

तू आलास जीवनाला जगण्याचा नवा  सूर गवसला
न आवडणाऱ्या गोष्टीही आवडू लागल्या
आयुष्य स्वर्गाहूनही सुंदर वाटू लागलं
तुझ्यापर्यंत येउन जग माझ संपत होत

तू गेल्यावर मात्र दिशा सगळ्याच हरवल्या
स्वप्नांचा सगळ्या चुराळा झाला
जगण्याची इच्छाच संपल्या
उरली आहे ती फक्त जगण्याची सवय

त्यापेक्षा…….
        कोणीच कधीच न यावं
        अन आल्यावर कधीच न जावं
        तू येऊन स्वप्न दाखवून ती हिरावून तरी न घ्यावं
        निदान कोणीतरी कधीतरी येईल ह्या आशेवर आयुष्य तरी संपाव

त्रास होतो ह्या सगळ्याच गोष्टींचा
हे ऐकायला पण कोणीच कस नसावं
याहून कमनशिबी कोणीच कधी नसावं


दूर सारून आयुष्यभर एकट राहायची शिक्षा का तू द्यावं
जे कधी स्वतः जगलेले क्षण मलाही जगायला का शिकवावं

प्रेम करन हि खरच एवढी मोठी चूक आहे का?
कि त्याची शिक्षा श्वास कायमचाच बंद झाल्यावरच संपणार आहे का?....

Marathi Prem Kavita : आता कुठे हसू लागलो आहे मी

आता  कुठे हसू लागलो आहे मी
तुला  विसरलो  आहे  असे  सांगतो
खरे तर आठवणी सोबतच जगू लागलो आहे मी ..

आता तुला  माझा  कसलाच त्रास  होणार नाही
कारण  ते शहरच तुझे  सोडून आलो आहे मी
सारी नाते  सारे  सोबती  सोडून
आज  एकटे जगू लागलो आहे मी ....

एक खरे सांगू तुझ्याच आठवणी  आहेत
म्हणूनच  जगू लागलो आहे मी ....

आठवतात  ते  दिवस मला आज ही
जेव्हा  तू  माझ्या जवळ असायची
कधी  रे आपण  लग्न करू

सारखे मला बोलत असायची
पण  माझे  दारिद्र्य

माझ्या  प्रेमात ही  आडवे  का यावे
जे  तुला  आज  दुसर्याचे पाहत  यातना भोगतो आहे मी ....

तुला मात्र  माझे  दुख नाही  मी दाखवणार
कारण  मला ठाऊक आहे
कळेल तुला  हे  तेव्हा 
डोळ्यांतले तुझ्या पाणी बनणार आहे मी .....

हरलो आहे मी  आयुष्याच्या  ह्या  युद्धात
पाकळ्यांसारखे गळून  पडलो आहे मी
तुडवत आहे  भावनांना  माझ्या आज सारेच
तरी  अश्रू  लपवून  जगतो आहे मी ....

तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
-

नको येवूस तू कधी

नको येवूस तू कधी
काही अडणार नाही
तुटुनिया गेली स्वप्ने
शोके रडणार नाही

मी झेलीले आहे उरी
तप्त खदिरांगार ही
दु:खे कधीच कुठल्या 
आता जळणार नाही

फुंकले आयुष्य सारे
असा खचणार नाही
प्रीतीच्या नाटया तुझ्या 
पुन्हा बधणार नाही

जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले

जो नको तो प्रकार मी केला
या जगाचा विचार मी..केला
जीवनाशी आता पटे माझे..
सोसण्याचा करार मी केला


जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले
हुंदका दाटून येता...
हुंदका दाटून येता...
.
.
.
मज हसावे लागले..


नाईलाजाने तू म्हटलेस नाते संपवू,
नाईलाजाने मला ही...
नाईलाजाने मला ही...
.
.
.
हो म्हणावे लागले
जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले..


जिंदगीच्या मैफिलीचे हे झाले असे कसे?
काय गाणार होतो मी..?
काय गाणार होतो मी..?


काय गावे लागले..
जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले


दूर जाताना..तुझा आवाज झाला कापरा..
अन मला ही शब्द माझे..
अन मला ही शब्द माझे ..
.
.
.
आवरावे लागले..
जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले

जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले
हुंदका दाटून येता...
हुंदका दाटून येता...
.
.
.
मज हसावे लागले..

तो बाहेर एकटाच बरसतोय

तो बाहेर  एकटाच बरसतोय
आग मात्र आत लावून गेलाय
भिजायचं मला त्याच्या प्रेमात
शहारायचंय त्याच्या प्रत्येक थेंबात

अंगातली आग आज शांत होणार आहे
कारण त्याची भेट आज होणार आहे
खूप झुरवलय त्याने
आज सगळी तडप संपवायची आहे

त्याच्यात मी माझ्यात तो फक्त दोघे  एकमेकात
रात्र जागवायचिय आज त्याच्या कुशीत ..Shona

आज तुला खुप miss करतोय...

तसे काहीच नाहीय
तुला miss करण्यासारखे
तसे काहीच नाहीय
तुला आठवण्यासारखं
तरीही का तुलाच खुप आठवतोय
आज तुला खुप miss करतोय...
तु जीवनात आलीस
खुप खास बनून राहिलीस
वाटले होते तु हि असशील
इतरांसारखीच अनोळखी
काय असेल तुझ्यात इतके विसरता येईल
पण तसे झाले नाही
विसरण्याचा खुप प्रयत्न करतोय तरी
आज तुला खुप miss करतोय...
आताच कुठे आपले नाते जुळले
मनाच्या वाटेने येऊन हृदयाला भिडले
मला कळलेच नाही इतक्या खोलवर रुतले
असे का ह्याचाच विचार करतोय
आज तुला खुप miss करतोय...
मला आठवते आपली पहिली भेट
निव्वळ योगायोगच तर होता
त्यापुढे काही असावे हा
प्रश्नच अस्तित्वात नव्हता
स्वप्नांतही वाटले नव्हते
इतके तुझ्यात रमतोय
आज तुला खुप miss करतोय...
तु नक्की आहेस कोण हे उमगत नाही
तुझे अंतरंग काही केल्या उलगडत नाही
असे वाटते हरवुन जाईन तुझ्यात
खरेतर हळूहळू तुझ्यातच हरवतोय
आज तुला खुप miss करतोय...
ह्या जन्मात आपली भेट क्षणाचीच आहे
कदाचित आपले भेटणे नियातीत नाही
आज नाही पण पुढचे सर्व जन्म
देवाकडे तुलाच मागतोय
आज तुला खुप miss करतोय...
आज तुला खुप miss करतोय...

जेव्हा पासून break -up झालंय

जेव्हा पासून  break -up झालंय
मन कशातच लागत नाही
शोधत असते नजर माझी
ती मात्र कुठेच  दिसत नाही ....

खरे सांगू तुला
मी तिच्यावर खूप प्रेम करतो
पण तिला कुणास ठाऊक  हे का कळत नाही 
तिने हे असे वागावे
मला खरच काही  कळत नाही  ..

चुकी माझी एवढीच ना
मी  तुझी  जास्तच  काळजी करतो
का हे  तुला डोळ्यांत माझ्या दिसत नाही

जेव्हा पासून  break -up झालंय
सारखा  फोनकडे  पाहत असतो  मी
तुझा  call नाही तर एखादा massage  तरी येईल 
म्हणून फोन एक क्षण ही दूर ठेवत नाही मी

आता काय उरलंय  जगण्यात ह्या
प्रेम  माझे  हरवून  बसलो आहे मी
प्रेम युगुलांना पाहून  आता
त्यांच्यातच  तुला  पाहत असतो मी


जेव्हा पासून  break -up झालंय
वेड्यासारखाच    रात्री ही जागत असतो मी
तुझा  आवाज  ऐकू येईल म्हणून
डोळे मिटून  तुला आठवत असतो मी ...


जेव्हा पासून  break -up झालंय....
रोजच मरत असतो  मी ......
खूप  एकटा असतो मी .....

जेव्हा पासून  break -up झालंय....