Saturday, November 30, 2013

जग पाहून :: Marathi Kavita - मराठी कविता | Vidamban Kavita | विडंबन कविता

मैफिलीत जातात कलाकार पाहून !
मैत्री करतात आईपत पाहून !!

दिल देतात प्रेयसी चे रूप पाहून !
नाते तोडतात बेवफाई पाहून !!

सौदा करतात खरीदार पाहून !
विमा उतरवतात आईपात पाहून!!

रहातात चूप आपली चूक पाहून !
पाया पडतात स्वार्थ पाहून!!

दिल दुखते असा व्यवहार पाहून !
हैराण आहे मी मतलबी जग पाहून!!

तुषार खेर

महागाई :: Marathi Kavita - मराठी कविता | Vidamban Kavita | विडंबन कविता

 महागाईचे  सगळे  बहाणे

सहन  करणे  भाग  असायचे

महागला  तो  gas  भयंकर

जणू  चुलीने  डोळे  मिटले

कशी  मिळेल  भाजी  भाकर

भुकेने  आतडे  तुटले

तेल  रॉकेल  नसता  घरी

लाकडे  शेण्या  की  करी

महागाई  पक्की  सठेबाज

ती  तर  डबल  भाव  खायची

डबल भाव  वाढतच

टंचाई  नाव  द्यायची

कशी  करावी  साजरी  सणवारी

मनी  खंत  वाटुनी  डोळ्यात  येई  पाणी

पेट्रोल  भडकले  डिसेल  भडकले

गाडी  कुठली  त्वो  व्हीलर  हि  fashion झाली

महागयीचा  खर्या  रेखा

मला  कळून  चुकल्या  होत्या

मुले  म्हणती  फिरायला  जायू

मजबूर  मी  कसे  कुठे  मी  नेऊ

कशी  मिळेल  शांती  जीवाला

कौन  आवारे    ह्या  महागायीला

 - सौ  संजीवनी  संजय  भाटकर  :)

मी आणि माझे तीन मित्र :: Marathi Kavita - मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

तशी नातेवाईकांची कधी मला गरजच नाही भासली,
सुख - दु:ख नेहमी आम्ही एकत्रच वाटली,
दिलीप आणि नितिन तसे बालपणिचे मित्र,
एन तारुण्याईच्या ओघात संदेश ने भर घातली . . .

ते नाते असे घट्ट होते, जशी रेशमाची गाठ,
कधीच फिरवली नाही आम्ही, एकमेकांकडे पाठ,
तसा आपापल्या आयुष्यात, जो तो गुंतलेलाच असायचा,
पण गरज आहे का माझ्या मित्राला, हे जो तो वळुनच पहायचा . . .

दिलीप तसा शांत, पण जसा फौजेतला मेजर,
शिस्त आणि नम्रपणा, नेहमी त्याच्या जिभेवर,
वेळ आली कोणावर, तर नेहमी पुढे धावतो,
बचतीचे गणित माझ्यापुढे नेहमी मांडतो . . .

नितिनची तर काय बाबा, बातच निराळी,
कधी कोणाकडे पाहून त्याने, फूंकलीच नाही शिराळी,
जगण्याचा त्याचा काही फंडाच और आहे,
लेक्चरचे बाण आमचे त्याच्याकडेच वाहे . . .

संदेश सारखा स्वच्छंदी माणुस भेटनारच नाही,
त्याची आईडिया आणि त्याचे फंडे कधी कळलेच नाही,
मनाने असा निर्मळ, जसा वाहता झरा,
माझ्या भावनांसाठी, एक सैफ डिपोसिट बरा . . .

अशी माझी मैत्री आणि असे माझे मित्र,
हृदयात माझ्या आहे त्यांचेच चित्र,
कधी मस्ती, कधी मज्जा, तो प्रत्येक क्षण जिवंत आहे,
माझ्या आयुष्याच्या डायरीत, प्रथम त्यांचेच नाव कोरलेले आहे . . .


- दीपक पारधे

गोड मैत्रीण आहेस तू माझी :: Marathi Kavita - मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

प्रेमळ तुझं मन, भोळा स्वभाव तुझा...

प्रेमात आपटली आहेस, जीव गुंतलाय तुझा !!!

कसं समाजावतेस तू त्या वेड्या मनाला ???

कसं सहानुभूती देते आहेस त्या एकट्या जीव्हाला ???

दूर राहून प्रेम निभावणं कठीण आहे...

Hahaha तुझी LOVE STORY unique आहे !!!

गोड मैत्रीण आहेस तू माझी...

अशीच ऱ्हां, सात हवी आहे तुझी !!!

.....................................................amu♥

आयुष्याच्या मार्गात,सोबत्यांची आठवण येईल का? :: Marathi Kavita - मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

कधी कधी अशी अवस्था होते कि मन शांत बसत नाही,
खूप चल-बिचल असते मनात,
खूप एकटेपणा जाणवतो,
अन त्यात मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येते,
त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न.....

अजाण अशा वातावरणात,
कोणी एकट रहायला शिकवेल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

मन झुरतय,आसुसलय कोणासाठी,
त्याची साद एकू येईल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

न बोलणारं मन,
चंचल असं हृदय,
दुसऱ्यासाठी धड-धडेल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

न मोजता येणारे सोबती,
मित्र-मैत्रिणींची येणारी आठवण,
यात अश्रूंचा मेळ घालता येईल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?...
  .....श्रीकांत रा. देशमाने.

मैञी तुझी अन् माझी :: Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता |

| प्रेम कविता.दोन मने, एकत्र हसतात एकत्र बोलतात,
  पण प्रेमाचे गुपित कधीच एकमेकांना ना सांगता राहतात....!
हि दोन मने एक मैत्रीण अन एका मित्राचे आहे, जिथे कधी मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले दोघानाही न कळले आहे....!
दोघही एकमेकांवर खूप प्रेम करतात,
  पण परिस्थिती मुळे सांगण्यास घाबरतात....!
मित्राचे लग्न ठरलेले आहे,
  मैत्रिणीने प्रेम हे म्हणून मनी लपवलेले आहे....!
तो तिला म्हणतो का ग वेडे मला आधी नाही भेटलीस,
  मग आपणच असतो एकमेकांचे आता सोबती....!
ती म्हणे त्याला देवाच्या मनी काय आहे कधी कुणास कळले म्हणूनच प्रेम असूनही आपले नाते नाही जुळले....!
कदाचित पुढच्या जन्मी आपण भेटू,
  तू अन मी असे आपले जग सजवू....!
या जन्मी मैत्री आपली जपावी मिळून दोघांनी,
  पुढील जन्मी आपण होऊ तू साजन अन मी साजणी....!!

Thursday, November 21, 2013

ती म्हणजे कलर प्रिंट तर : Marathi Kavita मराठी कविता | Vinodi Kavita विनोदी कविता.

ती म्हणजे कलर प्रिंट तर
मी म्हणजे झेरॉक्स कॉपी,
कळ्त नव्हत लव स्टोरी
होईल तरी कशी...???

म्हणून म्हनलं देवाला
जमेल कारे आमची जोडी.
तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार
मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

@सतीश भूमकर

मला कुठे जमतं तुझ्यावर चार शब्द बोलायला : Marathi Kavita मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता.

मला कुठे जमतं
तुझ्यावर  चार शब्द  बोलायला .....

तुझ्या सौंदर्याचे  कौतुक माझ्याच मुखाने करायला

तु म्हणतेस तुला जराही माझी किंमत नाही
पण हृदयाला कोण  समजावेल

वेळच  नसतो त्याला तुझ्यावर लिहलेल्या कवितांना
ओठांशी आणून तुला माझ्या मोहात पाडायला.....
-
© प्रशांत डी शिंदे

खरं तर तुझ्याशिवाय, मला ही करमत नाही : Marathi Kavita मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता

तु माझ्याशी किती ही भांडलीस,
माझ्यावर किती ही ओरडलीस.....
तरी मला शोनू तुझा,
कधीच राग येत नाही.....
कारण ???
तुझ्यावर खुप प्रेम केलयं,
आणि करतोय गं मी.....
खरं तर तुझ्याशिवाय,
मला ही करमत नाही.....


स्वलिखित -
© सुरेश सोनावणे.....

Saturday, November 16, 2013

आयुष्य थोडसं असाव. Marathi Kavita मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता

आयुष्य थोडसं असाव,
पण आपल्या माणसाला ओढ लावणार असाव.
आयुष्य थोडच जगाव,
पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव.
प्रेम असं द्याव की,
घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी.
मैञी अशी करावी की,
स्वार्थाचही भान नसावं.
आयुष्य असं जगाव की,
"जग अजुन थोडासा, मी येईन नंतर"
अस मृत्युनेही म्हणावं....

तुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागावसं वाटतं..Marathi Kavita मराठी कविता Prem Kavita | प्रेम कविता

तुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागावसं वाटतं,
तुझ्या आठवणीत क्षण-क्षण रडत बसावसं वाटतं..

तुझ्या आठवणीतचं तुझ्याचंसाठी जगतोय मी
हे ओरडून- ओरडून सांगावसं वाटतं ,

तुझ्या आठवणीत एकदा का होईना खोटं-खोटं मरावसं वाटतं..

माहीत आहे भेटणार नाहीस तु मला,
तरीही देवाकडे प्रत्येक वरदानात
फक्त आणि फक्त तुलाचं
मागवसं वाटतं..

शेवटी कुणीच कुणाच नसतं : Marathi Prem Kavita Marathi Virah Kavita

आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....