ती आठवत असते कधीपण
संध्याकाळी
तिन्हीसांजेला
अवचित तिची दिसू लागते लगबग
नि देवाजवळची पणती
तिची आर्त प्रार्थना
तिची आठवण येताच व्याकुळ होऊन जातेय मन
सगळे जागच्या जागी
जसेच्या तसे
नि तो असा अस्थिर .
व्याकुळ उध्वस्त
कधीकधी ती स्वप्नात येत असते
अचानक ,नकळत
जुन्या आठवणीतली
तिला हवे असते काहीतरी
न बोलता ती करीत राहते खाणाखुणा
तो लावीत बसतो एक एक अर्थ
तो आठवीत बसतोय काय हवे असेल तिला
नि आठवता आठवता येऊन जाते जाग
नि मग नुसता कल्लोळ मनात
कसे जगायचे आता
एकट्याने....
किती दिवस नि किती काळ ..?
संध्याकाळी
तिन्हीसांजेला
अवचित तिची दिसू लागते लगबग
नि देवाजवळची पणती
तिची आर्त प्रार्थना
तिची आठवण येताच व्याकुळ होऊन जातेय मन
सगळे जागच्या जागी
जसेच्या तसे
नि तो असा अस्थिर .
व्याकुळ उध्वस्त
कधीकधी ती स्वप्नात येत असते
अचानक ,नकळत
जुन्या आठवणीतली
तिला हवे असते काहीतरी
न बोलता ती करीत राहते खाणाखुणा
तो लावीत बसतो एक एक अर्थ
तो आठवीत बसतोय काय हवे असेल तिला
नि आठवता आठवता येऊन जाते जाग
नि मग नुसता कल्लोळ मनात
कसे जगायचे आता
एकट्याने....
किती दिवस नि किती काळ ..?
No comments:
Post a Comment