आश्चर्य वाटतं भारत देश अजूनही अस्तित्वात आहे...!!!
होय आश्चर्य वाटतं तो अजूनही कार्यरत आहे...
प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक इसमाने लाच घेऊनही,
केंद्रातून येणारे प्रत्येक पैकेज प्रत्येकाने ओरबाडूनही,
माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!
'अर्थ'पूर्ण राजकारणात सर्वच भ्रष्टाचारी,
गल्ली ते दिल्ली नसे एकही सदाचारी,
तरीही राजकारभार चालू आहे ! आश्चर्य वाटतं...!!
शासकीय रुगणालयात सुईपासून औषधापर्यंत घोटाळा,
कधी औषधांचा तर कधी डॉक्टरांचाच तुटवडा,
तरीही दवाखाना चालू आहे ! आश्चर्य वाटतं...!!
'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' हा देऊनी नवीन नारा,
अपराध्याला नव्हे सापडेल त्याला चेपू असाच प्रकार सारा
करीत पोलीस ड्युटीवर आहे ! आश्चर्य वाटते...!!
देशाच्या तिजोरीवर सर्वांचाच भार,
नि सर्वत्र असूनही अनागोंदी कारभार,
तरीही माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!
तितक्यात होते पिता-परमेश्वराचे स्मरण,
नि उमजते देशाच्या अस्तित्वाचे कारण,
ईश्वर नामाचा नित्य गजर होतो जेथे,
'तोच' कर्ता-करविता नि संचालक असे तेथे,
शिर नतमस्तक होते,
नि शब्द आठवतात,
इये अध्यात्माचीये नगरी ! इये अध्यात्माचीये नगरी !!

No comments:
Post a Comment