Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : कसे आयुष्य फुलून जाते ..!!

कशी अचानक गाठ पडते..?
कसे आयुष्य फुलून जाते..!
ती आली की ,
कसे ऋतू बदलून जातात
अगदी हवेहवेसे होऊन जातात
आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते
मस्त सूर नि ताल
मन कसे गाऊन जाते ....!!

कशी अचानक फुलापाखारासारखी येते
मनाच्या आभाळात गिरकी घेत झुलत राहते
कसे मनसोक्त सूर लागतात
सूर कसे ताल धरतात
सगळेच कसे बदलून जाते
निळ्या निळ्या आभाळाचे
छान कसे गाणे होते ...?

ती आठवली की
मन कसे सैरभैर होते
शरीरावर रोमांच उठून जातात
कसे रक्तामध्ये दिवे पेटून जातात
कोणीतरी काळीज ओंजळीत घेऊन
कुणालातरी देऊन टाकते
ती दिसली की असेच होते
असेच होऊन जाते

आपण सर्वस्वी तिचे होऊन जातो
काळीज आपले हरवून बसतो
शप्पत हे खरे असते
हरवल्याचा हिशेब कोणी ठेवीत नाही
ती आपली झाली की खरेच असे होते
हरवण्यात देखील गम्मत असते ..!!

2 comments:

Anonymous said...

chan aahe....

Anonymous said...

i like it very much