गर्दीत हात सुटला तुझा
कासावीस मन झाले
नयनांच्या कोनात मग तेव्हा थेंब दोन आले
एकमेकांना नजर देऊन ते ही थोडे कावरे-बावरे झाले
एकटीच मी गांगरलेली.. एन सोबतीला..
तुझी जागा भरून काढायला म्हणून कि काय कुणास ठाऊक ??
मला छळणारा - तुझा गंध सामावलेला - तू माळलेला गजरा..
अनोळखी ठिकाण.. सारेच नवे..
मनाला भेदून टाकणाऱ्या कित्येक नजरा..
वेळ सरत होती तसे पटीपटीने वाढणारे श्वास..
एन चटकन समोर येऊन उभा राहशील असे असंख्य भास..
मी हरवेन, मला काही होईल याची पडलीच नव्हती..
तू कसा असशील हा एकच ध्यास..
हळू हळू गर्दी कमी होऊ कमी होऊ लागली..
एक जीवघेणी भीषण शांतता पसरली आसपास..
थकून गेले डोळे आणि सर्व आशा खल्लास
डोक्यान म्हटलं आता बास
पण मन काही मानेना
संकटात सापडलेले.. तासन तास उलटून गेले तरी तू येण्याची आस..
दुकट्यान केलेला तो शेवटचा प्रवास
आता काही वाट संपत नाही..
पूर्वी सारखे वाटेवर कुणी ओळखीचे पण भेटत नाही
मी भोळसट असेन कदाचित पण वेडी नव्हते..
ती चुकामुक नव्हतीच..
तो होता निव्वळ माझ्या आत्म्याचा विश्वास घात
आकांत केला.. चिडले.. रागावले..
तुला शोधून जाब विचारेन म्हटलं..
पुन्हा माझच मन शंकांनी दाटल..
तुला वाटल मी हरवले.. त्या गर्दीत कायमची भरकटले..
पण आता भानावर आलेय..
जगण्याला खरी दिशा मिळालीय
सौभाग्याच्या जिवंतपणी एक अभागी जीवन जगतेय
जगासाठी मी मेलीय.. तुझ्यासाठी हरवलीय ..
आज चित्र वेगळे असते नक्कीच
जर मी " तुझ्यात हरवलेले " तुला वेळीच कळले असते..

No comments:
Post a Comment