पहाट झाली.
कोंबड्याने बांग दिली.
मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां.
सायकलची घंटी वाजली.
चला पेपर आला..
हे रोजचेच असते,
सकाळ झाली की उठणे भाग पडते,
चहाचा गंधही झिरपत येत असतो.
चहा पितापिता पेपर चाळत बसतो.
संप ,अपघात ,उपोषण
ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...?
सिनेमाची जाहिरात बघत नाही,
सिनेमा आजकाल टि.व्ही. वर कधीपण बघता येतो.
महागाई तर वाढत असते नको ईतकी,
खिशाला पडलेले भोक वाढत असते
तिळातिळाने....
कालच, लोकलच्या डब्यात स्फोट झाला.
किती मेली अधिकृत ..?
किती गेली अनाधिकृत ..?
तो जिवंत आलाय ही देवाची कृपा.
बायको रोज देवापुढे हात जोडून प्रार्थना करते आजकाल,
देवा सुखरूप येउदे नवर्याला.
आताशी कोठे सुरवात आहे,
नुकतेच झाड फुलत आहे.
स्फोट झाल्यावर २-३ दिवस असेच चालते.
नवस प्रार्थना,
मग अलगद विसरले जाते.
जीवन असेच पुढे सरकत असते ...!!
कोंबड्याने बांग दिली.
मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां.
सायकलची घंटी वाजली.
चला पेपर आला..
हे रोजचेच असते,
सकाळ झाली की उठणे भाग पडते,
चहाचा गंधही झिरपत येत असतो.
चहा पितापिता पेपर चाळत बसतो.
संप ,अपघात ,उपोषण
ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...?
सिनेमाची जाहिरात बघत नाही,
सिनेमा आजकाल टि.व्ही. वर कधीपण बघता येतो.
महागाई तर वाढत असते नको ईतकी,
खिशाला पडलेले भोक वाढत असते
तिळातिळाने....
कालच, लोकलच्या डब्यात स्फोट झाला.
किती मेली अधिकृत ..?
किती गेली अनाधिकृत ..?
तो जिवंत आलाय ही देवाची कृपा.
बायको रोज देवापुढे हात जोडून प्रार्थना करते आजकाल,
देवा सुखरूप येउदे नवर्याला.
आताशी कोठे सुरवात आहे,
नुकतेच झाड फुलत आहे.
स्फोट झाल्यावर २-३ दिवस असेच चालते.
नवस प्रार्थना,
मग अलगद विसरले जाते.
जीवन असेच पुढे सरकत असते ...!!
No comments:
Post a Comment