इथे सगळ्यांच्या घराचा
दरवाजा बंदच असतो,
माणसात राहण्यापेक्षा प्रत्येकाला
एकटेपणा हवा असतो.
दारच काय इथे मनाचे
कप्पेही बंद असतात,
बोलायचं म्हटलं कुणाला
सगळे अनोळखीच वाटतात.
शेजारी राहून सुद्धा
माणसे अनोळखी भासतात,
खरच माणुसकीच्या व्याख्या
इथे शहरानुसार बदलतात.
शेजार धर्माचे अर्थ
मलाही नव्यानेच उमगले,
माणसातून एकटे राहताना
फक्त वेड लागायचे राहिले.
सवय झली आता मलाही
एकटेपणा आवडू लागलाय,
माणसातला माणूसपणा खरच का संपत चाललाय??????
No comments:
Post a Comment