ढगांनी कधी बरसावे ..?
आम्ही पावसासाठी किती तरसावे ..?
जाता जाता ढगाने मागे वळून बघावे
आणि त्वेषाने त्वेषाने
असे भन्नाट बरसावे
जसे वासरू लुचते तसे धरणीला लुचावे
ढग निघताना डोळे ओले झाले होते
ढग न बरसताच निघाले होते
व्याकूळ मन आणि घशाला कोरड
तरी ढग बरसत नव्हते
दुष्काळच ठेऊन चाललाय असेच वाटत होते
दुष्काळाचे माप ओटीत टाकून निघाले होते
डोळे भरले होते
ढग हात हलवीत निघाले होते
शेत कोरडे ,जमीन कोरड्या
भेगा पडून वांझ झालेल्या
ढग निघाले ..ढग निघाले
न बरसतच निघून चालले
आणि काय झाले कळलेच नाही
माघारी वळले नि भरते आले
नि असा बरसला असा बरसला
रसरसून लुचू लागला
जीव गुदमरून गेला
ढगांनी काय मांडले
कसे अचानक बरसून गेले ..?
सगळे ओले ओले चिंब झाले
ईतके बरसले ईतके बरसले
पुन्हा होत्याचे नव्हते झाले
देवा आवर रे ह्या पावसाला
बघणारे कसा छळ मांडला
कोरड पडली होती घशाला
नि आता नासवून गेला शेतीला ...
देवा आवरनारे ह्या ढगाला ...ह्या पावसाला..!!
No comments:
Post a Comment