Sunday, March 30, 2014

हसली की फसली | Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Funny Kavita

हसली की फसली
असं मुलं समजतात
येथेच मुलींसमोर
ते खुळे ठरतात
ते मुलींचं मन आहे
हे ते विसरतात
उगीच मनास वेड लावून
नभी उंच उडतात
पण तेच बिच्चारे
अन वेडे ठरतात
जेव्हा मुली त्यांना
मित्र आहे सांगतात
मुलीच हल्ली मुलांना
मस्त उल्लू बनवतात
एकावेळी कितीजणांना
वेडी आशा लावतात
मुले नुसतेच मुलींना
स्वप्नात घेऊन फिरतात
म्हणूनच मुली अभ्यासात
मुलांच्या पुढे असतात
मुलांनी मुलींच्या मागे
नुस्तच धावायचं नसतं
तीच मन ओळखल्याशिवाय
प्रेमात पडायचं नसतं
प्रेमात पडलं तरी
करियर बघायचं असत
कारण त्यामुळेच तर
जीवन सुंदर होणार असत

येशील ना | Marathi Miss You Kavita | मराठी लेख | Virah Kavita | Marathi Virah Kavita Facebook

येशील ना
तूं येशील नां परत
मला नाही ग करमत
किती पावसाळे मी भिजलो
किती उन्हाळे मी तडफ़ड्लो
किती हिवाळे मी गारठलो
तूं येशील ना नक्की
ठरव भेट आपली पक्की
किती रात्री तळमळलो
किती दिवस शोधत फ़िरलो
किती तास वाट पहात थांबलो
तूं येशील ना खरंच
तुला सांगायचे मला बरंच
किती हाका मारल्या तुला
किती पत्रे लिहीली तुला
किती एसेमेस पाठवले तुला
पण तूं उत्तर नाही दिले
किती वाईट मला वाटले
खरच तूं येणार नाही परत

Wednesday, March 26, 2014

मुक्त केलं तुला भांडणातून | Marathi Alone Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून......
जा गं तु,
बिँन्दास जा मुक्त केलं तुला आठवणीतून.....
काय मिळालं तुला मला अश्रूं देऊन ?
काय मिळालं तुला मला नेहमीचं रडवून,
काय मिळालं तुला मला बरबाद करुन ?
आता या पुढे उत्तर देणे ही तुला बंधनकारक
नाही.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातुन.....
जर जमलचं कधी,
तर सर्व गोष्टी आठवुन पहा ?
माझी चुक तुला दिसेलचं.....
पण ?????
स्वःताची चुक जरा निरखुन पहा.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून.....
जिथे जाशील तिथे सुःखी रहा,
भावना फक्त तुलाचं होत्या,
मी दगड होतो ना.....
अश्रूं फक्त तुझेचं होते,
मी फक्त डोळ्यातून पाणीचं वाहीले ना,
हो आणि मुलांना भावना समजत नाही,
हा आरोप मात्र चुकीचा केलास.....
भावना फक्त मुलीँना असतात,
म्हणुन मुली रडतात ना ?
हे हि लक्षात ठेव.....
मुलांना हि भावना असतात,
ते ही रडतात गं,
खरं प्रेम करतात ते,
म्हणुन ते ही झुरतात गं.....
फक्त जगासमोर हसतात मात्र,
विरहात चोरुन-चोरुन अश्रूं,
मुलं ढाळतात गं.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून.....
जिथे जाशील तिथे सुःखी रहा.....

काय पाहिलेस तु माझ्यात | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या तुतलेल्या मनाला सावरले........
काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्यात
जगण्याची उम्मीद
आणलीस.......
काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या भुतकाळ माहित
असुन मला आपलेसे केले.......
काय पाहिलेस तु माझ्यात
की माझी एवढी काळजी घेतोस......
काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या साठी उपाशी राहतोस........
काय पाहिलेस तु माझ्यात
कीमाझी प्रत्येक
क्षणाला तुला आठवण
येते........
काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्यावर हक्काने
रागावतोस....... ..
काय पाहिलेस तु माझ्यात
की मला राग आल्यावर
माझी समजुत काढतो........
काय पाहिलेस तु माझ्यात
की तुला प्रत्येक वेळेस
माझा सहवास पाहिजे.,,....
काय पाहिलेस तु माझ्यात
की मला जेव्हाभिती वाटते
तेव्हा मला जवळ घेतो........
काय पाहिलेस तु माझ्यात
की तु माझ्यावर इतके प्रेम
करतोस.........
काय पाहीलेस तु माझ्यात
की माझ्याशिवाय तु जगु
शकत नाही........
काय पाहिलेस तु माझ्यात
की मला इतकी आस लावुन
दिली भेटीची.....,.
काय पाहिलेस तु माझ्यात
कि तुझ्या शिवाय
आता मी ही जगु शकत
नाहि........!

Sunday, March 23, 2014

विसर वेड्या हा तर टाइमपास होता | Marathi Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता,

आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,

वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल,

पण आवरणे नव्हे,सावरणे नव्हे,, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,

शब्द प्रत्येक खरा वाटत होता, म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,,

विसर वेड्या हा तर टाइमपास होता.....

जाताना एकदा तरी नजर वळवून जा Marathi Virah Kavita Facebook | Marathi Sad Kavita | Virah Kavita | विरह कविता

जाताना एकदा तरी नजर वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा..
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
जाताना एकदा तरी नजर वळवून जा..

Thursday, March 20, 2014

क्योँ की "नया है वह....!" Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Kavita

लग्नानंतर 2 दिवसांनी...
मुलगी मैत्रीणीला भेटायला जाते
मैत्रीण - काय मग कस चाललंय ..?
मुलगी - काय सांगु,
उठला की किस्स करतो..
नाश्ता झाला की किस्स अंघोळ
झाली की किस्स,
जेवलो की किस्स
करतो,
झोपताना किस्स..
मैत्रीण - येवढे किस्स करुन
कंटाळा नाही येत का त्याला ..?
मुलगी - अग,
कंटाळा आला की परत किस्स करतो..
मैत्रीण - अग, बरोबर आहे तो असाच करणार
क्योँ की "नया है वह....!"

- माझी मैत्री

भेट अखेरची होती | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती ...

कालची रात्र अन दिवसही माझ्यासाठी शापितच होती
कारण जिच्यावर जीवापाड प्रेम केले
तिच्या गळ्यात आज दुसऱ्याचेच मंगळसुत्र होते ...
कपाळ ही कुंकवाने भरलेले
ती आता सौभाग्यवती होती
अन नेहमीसारखेच माझे नशीब शापित होते ....
कालपर्यंत माझ्याच मिठीत जगणारी
माझ्यासोबत आयुष्याचे वाट चालणार म्हणणारी
माझ्या डोळ्यांत एक थेंब न पाहणारी
आज मात्र गप्प होती
मला विसरून जा
आता तुला माझ्याशिवाय जगायचं म्हणत
माझ्या डोळ्यांतली आसवे
माझ्या इतकेच तिलाही तेवढेच भिजवत होती ...

मला ठाऊक होतं ती आजही माझीच होती
नशिबाचे युध्द होते हे
अन त्यात मी नेहमीच हरत आलो
कालच्या युद्धातही तेच झाले
पण ह्यावेळीस मात्र मी माझ्या प्रेमालाही गमावून आलो होतो ...

भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती ...

ती तिच्या संसारात जगू पाहत होती
मी तिच्याविना दिवस मोजत होतो
पण माझ्यात जीव तिचा
एकट्यात नेहमीच मला आठवत रडत होती ...

अशी माझी प्रेम कहाणी
सुरु होण्याआधीच श्वास सोडत होती .

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं..... तरी उणं वाटतं | Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता,

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती.

माझ्यात काय आवडतं? | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

ती : माझ्यात काय
आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं
काहीच नाही आवडत
मला....पण
... ... ... ... "तुझ्या मनातला मी"
आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस
माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं
हिरवं पान दिसतंय?
त्या पानावर
जितक्या हिरव्या शिरा आहेत
न तितकंच प्रेम करतो.
जास्त नाही.
ती :
मला कधी विसरशील?
... तो : एकदम सहज
विसरेन....हा आकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण
सारखी सारखी का काढू ?
कधी तरीच काढेन...
पापण्यांची उघडझाप
करतील ना तेव्हाच
काढेन.
ती : तुझ्या सोबत
राहिल्याने
मला काही तोटा होईल
का?
तो : तोटा तर
आहेच...माझ्या सोबत
राहिलीस तर तुला तुझं
दु:ख कधीच
एकटीला अनुभवता येणार
नाही. त्यात
अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून
ठेवावा लागेल.
ती :
माझ्या कोणत्या गोष्टीवर
तूझा सर्वात जास्त हक्क
आहे?
तो : तुझ्या जगण्यावर
नसेल माझा हक्क पण...तू
माझ्याशिवाय एकटी हे
जग सोडून जाऊ
नाही शकणार..
सगळं ऐकून
आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात
पान
घेतलेल्या पापण्यांची उघडझाप
करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात
फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं
उत्तर
दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण
शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता....
मनात भरणारा..

कसं रे सांगु तुला | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

... बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!!

एकदा एक माणूस साधूच्या आश्रमामध्ये जातो | Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Kavita

एकदा एक माणूस साधूच्या आश्रमामध्ये जातो.

साधूला तो आपली पत्रिका दाखवतो...


साधू :- तुझ नाव तुकाराम आहे.


माणूस :- होय महाराज..


साधू :- आईचे नाव सावित्री आणि बापाचे नाव गंगाराम आहे..


माणूस :- होय साधू महाराज...


साधू :- तू १० तारखेला दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर,दोन किलो तुरडाळ आणलीस..


माणूस :- होय महाराज...तुम्ही महान आहात....अंतर्ज्ञानी आहात...तुम्हाला हे सगळ कस काय कळलं महाराज.?


साधू :- अरे तू मला तुझी शिधा-पत्रिका दिली आहेस.

बर झाल तू गेलीस सोडून मला ते | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर
भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची
आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची
आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge
आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या
आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "
आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला
आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची
आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला
आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य
करतोय मी माज्या career चा विचार
आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी
स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,
येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,
२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस
आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?
आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,
१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे
नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!
थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!
आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!
तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!

" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,
आता डोक्याला कसलंच tension नाही आहे "

Wednesday, March 19, 2014

इंग्रजीच्या नादापायी झाला मराठीचा डब्बा गोल | Vinodi Kavita | विनोदी कविता | Marathi Kavita

इंग्रजीच्या नादापायी झाला मराठीचा
डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू
मराठीतून बोल....
इंग्रजीच्या पेपरात होऊन जतो काठावर
पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत
नापास.....
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले
की पोरगी म्हणते हें बावल्या
अन आय लव यु म्हटल्या वर मनात मारते
उड्या....
माय झाली मॉम आणि बाप
झाला आता ड्याड
रेव्ह पार्टीत शेण खाऊन पोर
झाली मॅड.....
मराठी सिनेमा पाहायला दिसतात
मोजकेच लोक
पण इंग्रजी पिच्चर म्हटले की राह्याते
डोक्यावर डोक......
भांडण करते बायको घरात
बाब्या ला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे
खरा मराठी भाषेला धोका......
मराठी विसरत चाललेले
शाळेतले शिक्षण
मराठी आक्सीजन वर
अन चालू इंग्रजीचे
रक्षण........
ज्ञानोबा , तुकोबाची अभंगवाणी,
आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असते
गुडी पाडवा
सावध व्हा मित्रहो ,
जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोलो सारे
मराठी रक्षणासाठी....

Monday, March 17, 2014

का रे तु असा करतोस | Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

का रे तु असा करतोस,
मी तुझ्या जीतकी जवळ
येण्याचा प्रयत्न करते
तु मला तीतकीच परकी करतोस.
माझ्या विचारातही तूच रे
माझ्या ओठांवरही तूच रे, माझ्या स्वप्नातही तूच रे
माझी एक मात्र आशा
आणि त्या आशेतही तूच रे.
तुझ्यावीना मरेल रे मी
का कळत नाही तुला,
माझ प्रेम पटऊन देण्यासाठी काय करु सांग नारे मला.
मरनाची भिती नाही रे मला
फक्त तुझी होऊन मरायच आहे,
हे एकच स्वप्न
जे तुझ्या सवे बघायच आहे.
मी तुझ्याकडे पाहील्यावर तु चेहरा फिरऊन घेतोस,
तु माझा होनार नाही
याची जानिव का करुन देतोस.
माहीत आहे मला
तुला नकोशी आहे रे मी,
माझ्या मुळे तुला त्रास नको म्हणुन आता तुझ्या जिवनातुन कायमची दुर जाते रे मी.
जाता जाता फक्त एकवेळा
प्रेमाच्या नजरेने बघ रे मला,
नंतर मग मी जगुन घेईल या गैरसमझुतीत कि
आवडते मी तुला
आवडते मी तुला.

अजून मला बरंच काही पहायचंय | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.....

माझ्यासाठी येशील का | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

तुझीच आठवण तरी ,
मनी तुझीच ओढ का ?

प्रेमात बुडालो अखंड तुझ्या ,
हृदयात माझ्या हुरहूर का ?

नाही तुझा सहवास तरी ,
तूच मला हवीस का ?

साथ मला द्यायची नव्हती ,
प्रेम तरी तू केलेस का ?

जातो विसरुनी तुझ्या आठवणी ,
तरी स्वप्नात माझ्या तू येतेस का ?

येवूनी स्वप्नात माझ्या ,
सांग रोज मला छळतेस का ?

विसरलो होतो तुला तरी ,
काल पुन्हा हसलीस का ?

काय तुझ्या मनात आहे ,
गुपीत मला ते कळेल का ?

एकच इच्छा आहे आता ,
तू पुन्हा भेटशील का ?

तुझीच वाट पाहत आहे ,
माझ्यासाठी येशील का ???@????

एक स्वप्न ते हरवलेले | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

एक स्वप्न ते हरवलेले
तुझी वाट बघत बसायचे 
तुला ताटकळत ठेवायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
हसरा चेहरा डोळ्यात साठवायचे 
तुझे अश्रू अलगद टिपायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
तुझ्यावर रागवायचे 
तुझा रुसवा काढायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
तुझ्यासोबत चांदण्या रात्री फिरायचे
तुझ्यासंगे आयुष्य काढायचे

पण अखेर स्वप्न ते स्वप्नच
एक स्वप्न ते हरवलेले
तुझेच स्वप्न बघायचे…

एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो | Marathi Kavita | मराठी कविता | Vinodi Marathi Kavita | मैत्री कविता

एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो,
ती त्याला नकार देते.....
पण तो दुःखी होत नाही,
मित्र त्याला विचारतो,
" तुला काही भावनाचं नाहीत का ???
तुला दुःख झाले नाही का ???
मुलगा : मी कशाला दुःखी होऊ ?
मी एकीला गमावलं जी माझ्यावर प्रेम
करत
नव्हती..
पण ???
तीने तर असा एक माणूस गमावला,
जो तिच्यावर खुप प्रेम करत होता.

आयुष्यं हे बदलतं असतं | Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत ......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव
देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !

शेवटपर्यन्त साथ देता येणार नसेल | Marathi Kavita | Marathi Virah Kavita Facebook | Virah Kavita | विरह कविता

शेवटपर्यन्त साथ देता येणार नसेल
तर
कधी कोणालाही प्रेमात पाडू
नका,
शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट
वाली सोबतच
घरच्यांचा पसंतीने च करणार
असाल
तर
कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल
ला होकार
देऊच नका
रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच
करायच अस आधीपासूनच ठरवले
असेल
तर
रिलेशनशीप ला स्टार्ट करून
कोणाच्या भावनांशी खेळु
नका ......

येशील ना आज तरी तू | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

येशील ना आज तरी तू..
एक भेट द्यायला मला..
प्राणज्योत हि विझता विझता..
अखेरचे दर्शन द्यायला मला...
कर माफ माझ्या चुकांना..
केल्या होत्या ज्या मी नकळत...
करीत होतीस प्रेम तेव्हाही तू..
बैचेनी माझी होती तुला कळत...
कशी सहज तू मला माफ करायची..
असलो भांडत तुझ्याशी मी जरी...
ओशाळणे डोळ्यात माझ्या तू..
प्रेम शोधत बसायची...
विझता विझता प्राणज्योत माझी..
तुलाच हाका मारत आहे...
अजून थोडा हवा वेळ मला म्हणुनी..
देवाचा धावा मी करत आहे...
....
नसलो जरी मी या दुनियेत..
कमी माझी तुला भासणार नाही..
विझला असला जरी जीव माझा..
पण प्रेम माझे विझणार नाही...प्रेम माझे विझणार नाही .

कसं सांगू तुला मी | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

कसं सांगू तुला मी

तु माझ्यासाठी कोण आहेस ?

जीवनातलं तू संगीत आहेस,

माझ्या मनातलं तू गीत आहेस..

माझ्या ह्रदयाचं शोना,

तू स्पंदन आहेस..

तूचं माझं हसू अन्,

रडणं ही तूचं आहेस..

तूचं माझ्या शब्दांत अन्,

श्वासतही तूचं आहेस..

कसं सांगू तुला मी,

तु माझ्यासाठी कोण आहेस ?

तुम्ही काळजी करु नका | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

संकटावर   संकट  येतात  जेंव्हा
तेव्हा  तो  तुमची  परीक्षा घेतो
लाडक्या भक्तांला त्याच्या
खंबीर  बनवत असतो
अशावेळी  तुमचा  विश्वास
उडायला  नको  आहे
तुम्ही  फक्त   तुमचे
काम करीत  रहा  आणि
त्याला  आठवत  रहा
तो  हुशार  आहे
तो  तुम्हाला  काळजी
करायला  लागतो , पण
तुम्ही   काळजी  करु  नका
तो तुमची काळजी  करतो
तोच  तुमची  काळजी  करतो-

             ।।  कवि-डी।।
                  स्वलिखीत
                दि,26:02:2014
                वेळ-05:15:15

काय। शिकू | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

काय। शिकू
हा प्रश्र  मला पडतो  आहे
वाढती  लोकसंख्या
त्यात बेकारीची  भर  आहे
जिकडे  जाईल तिकडे
स्पर्धेची  तलवार  आहे
काय  शिकू
हा  प्रश्र  मला  पडतो  आहे

भेटला  विठू  माझा
त्याने  मला  सांगितले
काय  बी  शिक
पर  नंबर  एक  शिक  -

          ।कवि-डी।

फक्त तुझ्यामुळे | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

शब्दाला माझ्या कींमत
फक्त तुझ्यामुळे
हसण्याला माझ्या अर्थ
फक्त तुझ्यामुळे
माझी होणारी प्रगती
फक्त तुझ्यामुळे
मला भेटलेले यश
फक्त तुझ्यामुळे
माझी वाढलेली उम्मीद
फक्त तुझ्यामुळे
माझ्या जीवनातील आनंद
फक्त तुझ्यामुळे
माझ्या कवितेला वळण
फक्त तुझ्यामुळेच......

$ vidyakalp $

ती जरा वेगळीच होती | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

ती जरा वेगळीच होती....!!!
पावसातील सरीसारखी,
चिबं अशी भिजवणारी....
मातीचा नवासा सुगंध,
मनी माझ्या पसरवणारी....!!

ती जरा वेगळीच होती....!!!
ह्या सुसाट हवेसारखी,
स्पर्श करुन जाणारी....
अनं फुलपाखरासारखी,
उंच भरकटत उडणारी....!!
ती जरा वेगळीच होती....!!!

स्वप्नात मनसोक्त माझ्या,
सोबत मनात वावरणारी...
अनं हातात हात घालुनी,
वाटेवरूनी माझ्यासवे चालणारी......!!
ती जरा वेगळीच होती....!!!!

©स्वप्निल चटगे. 

ऐसे जीवन दिले देवा | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

ऐसे जीवन दिले देवा
सुख कुठेच माझे नव्हते
प्रेमासाठी धडपड केली
पापणी नेहमीच ओली राहिली  ............

ऐसे जीवन दिले देवा
अंधारच अंधार भेटला

आधार घ्यावा वाटला थोडा
तिथे दगाच  बक्षिसी भेटला ..................

रिकामे हाथ होते माझे
नशिबही कोरेच राहिले

वाढले स्वप्न पाखरासारखे
झेप घेताना स्वप्नांची
मग  ते  पांगळेच राहिले ......

ऐसे जीवन दिले देवा
क्षणभरही सुख अनुभवायचे नाही
साधे भोळे वागणे माझे
सूत्र एवढेच "कुणास दुखवायचे नाही "

भरभरून वाटले प्रेम नि माया मी
कारण एवढेच देऊ शकलो
पण मी मागणी केली तेव्हा
माझ्यासाठीच मात्र ती संपली .....................
ऐसे जीवन दिले देवा
मरणही लाभले नाही
निराशांचेच मला दोस्त भेटले
दुखांशिवाय कुणीच  नाही ................

विदुषकच रे मी
इथे पायातल्या  चप्पलचे हि   वर्चस्व
माझ्या जीवाला इथे जराही  किंमत  नाही  

डोळ्यांत रक्त आले
आज  आसवांनी हि साथ सोडली
तरी नाही बोलणार तुला
कारण  क्षुद्राला ह्या
जगण्याचा तर हक्कच रे नाही........

एक छोटी इच्छा  मनी माझ्या
एवढं  तरी ऐकशील का??

पुरे जगणे झालं हे  आता
भिक म्हणून तरी  मृत्यू देशील का ?
निरर्थक ह्या श्वासांना थांबवून
विसावा थोडा देशील का ? .............

ऐसे जीवन  दिले  देवा
शेवटी  हातही   नांगडेच  राहिले
प्रश्नांचेच आयुष्य देउनि
उत्तरांनीच   जन्म घ्यायचे राहिले  ..............
-

©प्रशांत डी शिंदे ....
दि.१४/०३/२०१४

दोन दिवस | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

- नारायण सुर्व

(अविनाश मोहन)प्रवारासंगम

तुझी आठवण | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे
तुझेच चित्र
... तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे
तेच मला कळत
नाही,
तुझी आठवण आल्यावर
मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू, खुप
गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या
अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही
पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही...

-निखिल मिसाळ :-X

माझी मैत्री | Marathi Kavita | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात
ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य
होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही.,
पण
काही क्षण असे असतात जे
विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...

स्वलिखीत
निखिल मिसाळ

कधी नरम, कधी गरम | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

कधी  नरम,   कधी गरम
प्रेमात  व्हाव  लागतं

कधी  शरम,  कधी  बेशरम
प्रेमात   व्हाव  लागतं

कधी   टाईम ,  कधी   दाम
प्रेमात   द्यावं  लागतं

कधी   काम ,  कधी   आराम
प्रेमात  करावं  लागतं

कधी   जोम,   कधी  कोम
प्रेमात   रहावं   लागतं

कधी  राजा,   कधी  गुलाम
प्रेमात  व्हाव  लागतं

कधी    राम,   कधी   शाम
प्रेमात  व्हाव   लागतं. .................


                  । कवि-डी ।
                    स्वलिखीत
                     दि. 14.03.2014
                    वेळ.  सकाळी  .07.  26

लव्ह स्टोरी | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे
त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर
त्रास दिला. सरांची नक्कल केली.
कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर
महिन्याला त्याच्या अंगावर नवा शर्ट असायचा.
तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष
करणार, प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं
त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स' असंच लिहिलं
होतं.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय
त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे
मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक
नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा.
अभ्यासात हुशार नव्हता; पण
खेळाची कमालीची आवड
होती त्याला. कायम खिदळत असायचा....
पण आज त्याच्या चेह-यावरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय.
तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान
आणि देखणी मुलगी होती ती.
कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं
होतं. ती होस्टेलला राहायला होती.
सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं
त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव
निर्मळ होता.
पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं
प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं.
त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा.
खडकवासल्याच्या पुढे पानशेत
रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत
बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले
तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये
छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप
लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट
धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं
ती रुसूनही बसली होती.
कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले.
दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत
पाण्याची बाटली होती.
त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात
एकदा तरी त्यांची तिथं चक्कर
व्हायचीच. दर वेळी ते दोघं
त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके
दिवशी ती गावी निघाली.
तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं
त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन
दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं
नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं.
घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन ठेवला.
तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण
कुणीच उचलला नाही.
घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग
मनात धरून त्यानंही परत तिला फोन
केला नाही. दुर्दैवानं दुस-
या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं.
त्याला ही बातमी कशी सांगायची तेच
सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं.
हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्
मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला?
माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न
करता त्यानं गाडी काढली.
मला पाठीमागं बसवलं अन्
आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण
काही उपयोग नाही. सर्व
काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला सावरलं.
तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता.
आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन् अर्ध्या तासात
माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण
आमची गाडी खडकवासल्याकडं
निघाली होती.
मी काही बोललो नाही. पानशेत
रस्त्याशेजारी त्यानं
गाडी थांबवली अन् एका झाडाला पकडून
तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्
झाडापाशी बसून ढसाढसा
रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर
कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय.
आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत
मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच
माहिती नाही. तो घरात
काही बोलतही नाही. फक्त
रात्रीच्या वेळी तिनं
त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल
आता सुकलंय. ते एकटक बघतो अन् उशीत तोंड खुपसून
रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे.
त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम
करा असं म्हणतात;पण मी प्रेम
करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन,
की तुम्हीही असं एखादं रोपटं
लावा. तुमची "लव्ह स्टोरी'
माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं
प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप
काही देतात.....

निखिल मिसाळ :-X

आज तुझा दास झालो | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

नको  भांडण, नको  तंटा
आज  तुझा  विश्वास  झालो

तुझ्यात   मिसळूनी  मी
तुझा  श्वास  झालो

सांगेल  ते  काम  करून
मी  तुझा  खास  झालो

तु  उभी  वाघीण  तर
मी  तुझा   घास  झालो

विसरूनी  मी  स्वतःला
माझे  मी  खल्लास   झालो

विकली  लाज  मी
आज  मी  उदास  झालो

सोडीला  स्वाभिमान   मी
आज   तुझा  दास   झालो. ......तुझा  दास   झालो. ..


                   । कवि-डी ।
                    स्वलिखीत
                     दि. 13. 03.2014
                    वेळ .रात्री 12.  02

तुझ्याशिवाय कसा राहू | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

तुच  माझी  जिंदगी
तुझ्याशिवाय  काय  पाहू
तुच  माझी  कविता
तुझ्याशिवाय  काय  लिहू

तुच  गाणे  प्रीतीचे
तुझ्याशिवाय  काय  गाऊ
उबदार  कुशी  तुझी
तुझ्याशिवाय  कोठे  जाऊ

तुच  माझा    श्वास
तुझ्याशिवाय  कसा  जगू
तुच   प्राण  माझा
तुझ्याशिवाय   कसा  राहू ....
तुझ्याशिवाय   कसा   राहू. ............


              । कवि-डी ।
                स्वलिखीत
                दि. 11. 03.2014
               वेळ. दुपारी .04.36

मला लागलं होत वेडं | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

मला लागलं होत वेडं,
तुझ्या आठवणीत रमायचं...
जणू चिबं पावसात,
तुझ्यासवे बेधुदं रंगायचं....!!

मला लागलं होत वेडं,
तुझ्या स्वप्नात यायचं...
जणु ओल्या पापण्याना,
अनं प्रेमानं पुसायचं....!!

मला लागलं होत वेडं,
तुझ्या श्वासात गुफायचं...
जणू जाणुनी स्पर्श तुझा,
तुझ्यात हळूवार गुतायचं.....!!

_ _ _स्वप्नील चटगे_ _ _

घागर भरली | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

घागर भरली
भान विसरली
झाली साडी ओली
गोपी घाबरली .....-.....

डोईस गगरी
नजर बावरी 
ओचा हाती धरी 
चाले लवकरी .....-.....

उसळले नीर
धडधडे ऊर
लपेटे पदर
सखे ग सावर .....-.....

तोच पावा स्वर
ऐकूनी ती नार
मिटे एकवार
(डोळा )पाहे चितचोर .....-.....

संसार विसरली
भरली घागर .....-.....

  विजया केळकर ___

Wednesday, March 12, 2014

जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो | Marathi Miss You Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

प्रेमात झालो पुरता वेडापिसा,

रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी पिल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो.....

असा कसा गं बावरलो मी,

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....

काय जादू मंतरलीस माझ्यावर,

जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....


स्वलिखित -
दिनांक १९-०२-२०१४...
सांयकाळी ०६,४८...
©सुरेश सोनावणे.....

कशाला केलं मी हे प्रेम-बीम | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

चंद्र-बिंद्र चांदण्या-बिंदण्या
अन तू न मी
गारवा-बिरवा थंडी-बिंडी
तुझी मिठी अन मी
रात्र-बित्र स्वप्न-बिप्न
स्वप्नातली तू अन मी
पाउस-बिउस गारा-बिरा
भिजलेली तू अन चिंब मी
वचन-बिचन सोबत-बिबत
हातामधले तुझे हात अन मी
भांडण-बिंडण राग-बिग
समजावणारा मी
अश्रू-बिश्रु वेदना-बिदना
सहन करणारा मीच
माघारी फिरणारी तू
अन तिथेच थांबलेला मी
स्वताशीच बोलत..."कशाला केलं मी हे प्रेम-बीम...
                                        ----Shailesh Shael

तू जवळ नसताना देखिल | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

तू जवळ नसताना देखिल....
आजकाल मी रात्र रात्र जागते...
कधी कधी मी स्वतःशीच...
तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहते...

तुझ्याशी बोलुन झाल्यावर...
अजुनदेखिल...
तुझी ती गोडबडबड
माझ्या कानात गुणगुणत राहते...

कधी तुझं लाडीक हसणं आठवतं
तर कधी तुझं स्पष्ट बोलणं आठवतं...

कधी कधी या आठवणी
स्वप्नातल्या विश्वात घेऊन जातात...
आणि कधी कधी त्या
तुझ्या माझ्या अनमोल नात्याची जाणीव करुन देतात...

हे सगळं आठवताना नकळत कुठे जरासा डोळा लागतो...

अन् मी पुन्हा दचकून जागी होते...

तुझी आठवण मनाला फारच जोरात चिमटा काढून जाते रे...
अन् मी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा मी माझी रात्र जागुन काढते.....

                                                                        - Monika

प्रेम आहे धोक्याचे | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

किती दिवस असतात प्रेमाचे
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे
डोळ्यात उतरलेल्या प्रेमळ स्वप्नांना
कितीवेळ असेच पहायचे ..........

आनंद असतो प्रेमात
जेव्हा तुझा हाथ हातात असतो
मिठीत तुझ्या असताना दुखांचा भास अदृश्य असतो
जगायचे असतं आयुष्य तुझ्या सहवासातच
पण का असे दृष्ट लागते प्रेमाला
वळणे येतात मध्येच धोक्याचे .....................

किती जपायचे हे नातं मीच नेहमी
तू ही आता जपतजा
खचतो मी सांभाळताना त्यांना
तू येउन सांभाळत जा .............

खूप नशिबाने मिळतं हे नातं
म्हणूनच डोळ्यांना काहींच्या खुपसत असतं
अन आपल्या प्रेमाच्या   सागराला
वादळरुपी दिशाहीन करीत असतं ..............

नाही जमत प्रत्येक  भावना असे
तुझ्यापासून लपवणं
तू तेव्हा माझ्या हृदयाचे दुख थोडे समजत जा .........

किती दिवस असतात प्रेमाचे
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे
जपताना कळतं हे  प्रेम आहे खरेच  धोक्याचे ............
-
प्रशांत डी शिंदे
दि.१७/०२/२०१४

हवाय तु मला | Marathi Charolya | चारोळ्या व म्हणी | Prem Kavita | प्रेम कविता

राञीचा एकांत छळतोरे मला
तुझ्याविना चंद्र खुणावतो मला
कस सांगायचं रे तुला
की आजही हवाय तु मला...!
कवी-गणेश साळुंखे...!

Love नावाचा Timepass | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

आज पुन्हा नव्या जोमाने,

प्रेमाची बाजी मी खेळणार आहे.....

तुला माझ्यासाठी जिँकताना पाहून,

स्वतःच पराभव मी पत्कारणार आहे.....

माझ्या अधु-या राहीलेल्या स्वप्नांना,

तुझ्या साथीने मी खरी ठरवणार आहे.....

तुला प्रेम जाळ्यात फसवून,

माझ्यात पुर्णपणे मी गूंतवणार आहे.....

आणि.....!!!

Love नावाचा Timepass,

तुझ्यासोबत LifeTime मी करणार आहे.....


स्वलिखित -
दिनांक १६-०२-२०१४...
सांयकाळी ०८,५२...
©सुरेश सोनावणे.....

काय दिवस होते ते | Marathi Kavita | मराठी लेख | Miss You Kavita | विरह कविता

काय  दिवस होते  ते
कुणीतरी आपले असायचे
हस~या चेह~यामागे दडलेलं दु:ख
कुणी सहजच  ओळखायचे ................

सारखेच  वाटायचे असावे कुणीतरी
पण ती मात्र दूर असायची
जवळ असली कि नजर
तिच्या हसण्यावरच   माझी असायची
किती सहज दूर करायची विचारांचे प्रदूषण
अन मोकळे मन करून थोडे हस म्हणायची .................

काय दिवस होते  ना..  ते हसत खेळत घालवले
सोबत आहेत ते क्षण आजही
फक्त न फक्त आठवणरुपी
तिचा मात्र काहीच पत्ता नाही ..............

काय दिवस होते ना ते
एकमेकांस भेटून आनंदी होण्याचे
पण आता चोहीकडे भयाण आहे
तू कुठेतरी दूर आहेस
अन..मी हरवलेल्या ह्या अंधारात आहे .............
-
©प्रशांत डी शिंदे.....
दि.०६-०३-२०१४

शाळेतले ते दिवस | Marathi Kavita | Marathi Miss You Kavita | Virah Kavita | विरह कविता

!! शाळेतले ते दिवस !!

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर
आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
 बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर
तुमच्यासारखं स्वतःलाच
रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय
 आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा समास
तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

बाटलीत बुङून होतो | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

सोङून  गेलीस  तु
थोडी  थोडी  पीत  होतो
दुकानात  'त्या'  पङून होतो
बाटलीत  बुङून  होतो

असा  काय  केला  गुन्हा
विचाराने  गढून   होतो
माझ्यावर  मी   बिघङून   होतो
बाटलीत  बुङून   होतो

ना   घोर  उद्याची   चिंता
नशीबी   काय  वाढून   होतो
तुझ्या  आठवणीने  चिङून   होतो
बाटलीत  बुङून  होतो. ...
बाटलीत  बुङून  होतो  ...

              । कवि-डी ।
               स्वलिखीत
              दि. 07. 03.2014
              वेळ. सकाळी 09. 10

येईल अशी वेळ जेव्हा शोधशील तू मला | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

येईल अशी वेळ,
जेव्हा शोधशील तू मला.....

पण ???

काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला.....

पण ???

अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला.....

येईल अशी वेळ,
स्पर्श करण्यास तरसशील तू मला.....

पण ???

विरहाच्या जाळ्यात फसलेली,
एकटी दिसेल मी तुला.....

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तू मला.....

पण ???

तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना,
दिसणार नाही मी तुला.....

तुझ्याविणा जगावस वाटत नाही रे,
खुप एकटी समजतेय रे स्वतःला.....

कारण ???

तुझी खुप आठवण येते रे मला,
विसरु शकत नाही रे मी तुला.....


स्वलिखित -
दिनांक १६-०२-२०१४...
दुपारी ०४,०२...
©सुरेश सोनावणे.....