Wednesday, March 26, 2014

मुक्त केलं तुला भांडणातून | Marathi Alone Sad Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून......
जा गं तु,
बिँन्दास जा मुक्त केलं तुला आठवणीतून.....
काय मिळालं तुला मला अश्रूं देऊन ?
काय मिळालं तुला मला नेहमीचं रडवून,
काय मिळालं तुला मला बरबाद करुन ?
आता या पुढे उत्तर देणे ही तुला बंधनकारक
नाही.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातुन.....
जर जमलचं कधी,
तर सर्व गोष्टी आठवुन पहा ?
माझी चुक तुला दिसेलचं.....
पण ?????
स्वःताची चुक जरा निरखुन पहा.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून.....
जिथे जाशील तिथे सुःखी रहा,
भावना फक्त तुलाचं होत्या,
मी दगड होतो ना.....
अश्रूं फक्त तुझेचं होते,
मी फक्त डोळ्यातून पाणीचं वाहीले ना,
हो आणि मुलांना भावना समजत नाही,
हा आरोप मात्र चुकीचा केलास.....
भावना फक्त मुलीँना असतात,
म्हणुन मुली रडतात ना ?
हे हि लक्षात ठेव.....
मुलांना हि भावना असतात,
ते ही रडतात गं,
खरं प्रेम करतात ते,
म्हणुन ते ही झुरतात गं.....
फक्त जगासमोर हसतात मात्र,
विरहात चोरुन-चोरुन अश्रूं,
मुलं ढाळतात गं.....
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातून.....
जिथे जाशील तिथे सुःखी रहा.....

No comments: