येशील ना
तूं येशील नां परत
मला नाही ग करमत
किती पावसाळे मी भिजलो
किती उन्हाळे मी तडफ़ड्लो
किती हिवाळे मी गारठलो
तूं येशील ना नक्की
ठरव भेट आपली पक्की
किती रात्री तळमळलो
किती दिवस शोधत फ़िरलो
किती तास वाट पहात थांबलो
तूं येशील ना खरंच
तुला सांगायचे मला बरंच
किती हाका मारल्या तुला
किती पत्रे लिहीली तुला
किती एसेमेस पाठवले तुला
पण तूं उत्तर नाही दिले
किती वाईट मला वाटले
खरच तूं येणार नाही परत
तूं येशील नां परत
मला नाही ग करमत
किती पावसाळे मी भिजलो
किती उन्हाळे मी तडफ़ड्लो
किती हिवाळे मी गारठलो
तूं येशील ना नक्की
ठरव भेट आपली पक्की
किती रात्री तळमळलो
किती दिवस शोधत फ़िरलो
किती तास वाट पहात थांबलो
तूं येशील ना खरंच
तुला सांगायचे मला बरंच
किती हाका मारल्या तुला
किती पत्रे लिहीली तुला
किती एसेमेस पाठवले तुला
पण तूं उत्तर नाही दिले
किती वाईट मला वाटले
खरच तूं येणार नाही परत
No comments:
Post a Comment