तुझीच आठवण तरी ,
मनी तुझीच ओढ का ?
प्रेमात बुडालो अखंड तुझ्या ,
हृदयात माझ्या हुरहूर का ?
नाही तुझा सहवास तरी ,
तूच मला हवीस का ?
साथ मला द्यायची नव्हती ,
प्रेम तरी तू केलेस का ?
जातो विसरुनी तुझ्या आठवणी ,
तरी स्वप्नात माझ्या तू येतेस का ?
येवूनी स्वप्नात माझ्या ,
सांग रोज मला छळतेस का ?
विसरलो होतो तुला तरी ,
काल पुन्हा हसलीस का ?
काय तुझ्या मनात आहे ,
गुपीत मला ते कळेल का ?
एकच इच्छा आहे आता ,
तू पुन्हा भेटशील का ?
तुझीच वाट पाहत आहे ,
माझ्यासाठी येशील का ???@????
No comments:
Post a Comment