Wednesday, March 12, 2014

तू जवळ नसताना देखिल | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

तू जवळ नसताना देखिल....
आजकाल मी रात्र रात्र जागते...
कधी कधी मी स्वतःशीच...
तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहते...

तुझ्याशी बोलुन झाल्यावर...
अजुनदेखिल...
तुझी ती गोडबडबड
माझ्या कानात गुणगुणत राहते...

कधी तुझं लाडीक हसणं आठवतं
तर कधी तुझं स्पष्ट बोलणं आठवतं...

कधी कधी या आठवणी
स्वप्नातल्या विश्वात घेऊन जातात...
आणि कधी कधी त्या
तुझ्या माझ्या अनमोल नात्याची जाणीव करुन देतात...

हे सगळं आठवताना नकळत कुठे जरासा डोळा लागतो...

अन् मी पुन्हा दचकून जागी होते...

तुझी आठवण मनाला फारच जोरात चिमटा काढून जाते रे...
अन् मी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा मी माझी रात्र जागुन काढते.....

                                                                        - Monika

No comments: