Showing posts with label एक स्वप्न ते हरवलेले. Show all posts
Showing posts with label एक स्वप्न ते हरवलेले. Show all posts

Monday, March 17, 2014

एक स्वप्न ते हरवलेले | Marathi Kavita | मराठी लेख | Virah Kavita | विरह कविता

एक स्वप्न ते हरवलेले
तुझी वाट बघत बसायचे 
तुला ताटकळत ठेवायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
हसरा चेहरा डोळ्यात साठवायचे 
तुझे अश्रू अलगद टिपायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
तुझ्यावर रागवायचे 
तुझा रुसवा काढायचे…….

एक स्वप्न ते हरवलेले
तुझ्यासोबत चांदण्या रात्री फिरायचे
तुझ्यासंगे आयुष्य काढायचे

पण अखेर स्वप्न ते स्वप्नच
एक स्वप्न ते हरवलेले
तुझेच स्वप्न बघायचे…