Showing posts with label अजून मला बरंच काही पहायचंय. Show all posts
Showing posts with label अजून मला बरंच काही पहायचंय. Show all posts

Monday, March 17, 2014

अजून मला बरंच काही पहायचंय | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita | मराठी कविता

अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.....