प्रिय
मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,
जरा ईकडे लक्ष द्या...!!
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
कोणी ना कोणी येते,
रिलेशनशिप मध्ये असलेल्या
ब-याचशा प्रेमयुगलांचा गैरसमजामूळे
ब्रेक-अप होते.....
काही लोक ब्रेक-अप
झाल्यानंतर,
स्वतःला कसं बसं सावरुन पुढे
निघून जातात,
तर काही लोकांच आयुष्य तिथेच
थांबून जातं.....
काही लोक विचार करतात की,
मी त्याला/तिला विसरलो आहे,
याचा अर्थ माझं प्रेम खोटं
होतं,
काही लोक विचार करतात की
जर तो/ती आजही खुश आहे,
त्याला/तिला ब्रेक-अप च
काही टेँन्शन नाही
म्हणजे आमचं प्रेम फेक
होतं.....
असे खुप सारे प्रश्न मनात
निर्माण होतात...!!
या सर्व प्रश्नांच एकच उत्तर
आहे,
" वेळ कुणासाठी थांबत नाही,
आपलं आयुष्य खुप छोटं आहे,
ब्रेक-अप झालं म्हणजे
याचा अर्थ असा नाही की,
त्याच्या/तिच्या आठवणीत रडत
बसायच,
स्वतःला त्रास करुन
घ्यायचा.....
नेहमी.....!!!
आपण पण
दुःखी आणि आपल्याला असं
पाहून घरवाले ही दुःखी,
असं केल्याने तुम्हाला काहीच
मिळणार नाही,
ब्रेक-अप झाल्यानंतर
स्वतःला उध्वस्त करु नका,
Positive Attitude ठेवून
आयुष्यात पुढे जात राहा.....
कधी कधी आयुष्यात
स्वतःसाठी न जगता
दुस-यांनसाठी ही जगावं लागतं,
ब्रेक-अप झाल्यामूळे
घरात बसून एकांतात बरेच जण
रडत असतात.....
पण ?????
मला असं वाटतं की,
काँलेजमध्ये किँवा अजून
कुठेही,
घरच्यांना विचारुन
तुम्ही प्रेम केलेलं नसतं.....
आणि या कारणामूळे घरात बसून
रडणे,
घरच्यांना विनाकारण दुःख
देणे,
उगाच एकाचा राग
दुस-यावर काढणे,
हे खरं तर साफ चूकीच आहे.....
जरा विचार करुन बघा...!!
जर तुम्ही तुमच्या घरच्यांना सुख देऊ शकत नाही,
तर त्यांना त्रास देण्याचा,
किंवा दुःख देऊन छळण्याचा
तुम्हाला काही एक अधिकार नाही.....
कुणाचे ही घरवाले, आपल्या मुलाला/मुलीला रडताना पाहू शकत नाही.....
So Plzzz.....!!!
मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,
ब्रेक-अप झाल्यानंतर
स्वतःला सावरायला शिका,
सुंदर आयुष्य जगायला शिका,
हे सगळं कठीण नक्की आहे,
पण अशक्य नाही...
तर नेहमी खुश रहा,
स्वतःला आणि घरच्यांना जपा.....
कारण ?????
आयुष्य जगण्याची मजा एकटेपणात नसते...!!
स्वलिखित -
दिनांक २६-०१-२०१४...
सांयकाळी ०६,४९...
© सुरेश सोनावणे.....