मंद मंद जळत असते
देव्हार्यातील फुलवात
देवाच्या दर्शनासाठी
प्रकाश दाविते अंधारांत
मंद तो पाहून प्रकाश
भक्तजन मनीं म्हणतात
इतरांच्या सुखासाठी
जळते आहे ही वात
वरवरचा पाहून त्याग
सारेजण भुलून जातात
म्हणून मंद जळणार्याला
वातीची ते स्तुती करतात
दिव्यामधला तेलाचा
त्याग कुणा दिसत नाहीं
स्वतः जळूनही वातीची
संगत ते सोडत नाहीत
अखेरच्या कणापर्यंत
ते सर्व जळून जाते
पण लोकांना त्या त्यागाची
काहीं सुद्धा कल्पना नसते
सांगा का जळेल वात
तेल दिव्यांत नसताना
मग त्याग त्या तेलाचा
कां न दिसतो लोकांना
ह्यांस फक्त एकच कारण
लोक वरच्या रुपांस भुलतात
चकाकते ते सोने समजून
स्वतःची फसवणूक करून घेतात
- रविंद्र बेंद्रे
देव्हार्यातील फुलवात
देवाच्या दर्शनासाठी
प्रकाश दाविते अंधारांत
मंद तो पाहून प्रकाश
भक्तजन मनीं म्हणतात
इतरांच्या सुखासाठी
जळते आहे ही वात
वरवरचा पाहून त्याग
सारेजण भुलून जातात
म्हणून मंद जळणार्याला
वातीची ते स्तुती करतात
दिव्यामधला तेलाचा
त्याग कुणा दिसत नाहीं
स्वतः जळूनही वातीची
संगत ते सोडत नाहीत
अखेरच्या कणापर्यंत
ते सर्व जळून जाते
पण लोकांना त्या त्यागाची
काहीं सुद्धा कल्पना नसते
सांगा का जळेल वात
तेल दिव्यांत नसताना
मग त्याग त्या तेलाचा
कां न दिसतो लोकांना
ह्यांस फक्त एकच कारण
लोक वरच्या रुपांस भुलतात
चकाकते ते सोने समजून
स्वतःची फसवणूक करून घेतात
- रविंद्र बेंद्रे
No comments:
Post a Comment