Saturday, February 15, 2014

माझ्या मनातून ती उतरत गेली | Virah Kavita | विरह कविता | Marathi Kavita | मराठी लेख

मलाच सर्वच काही मानणारी,

माझं सुख दुःख जाणणारी ती.....

सावली सारखी माझ्या सोबत,

नेहमी असणारी ती.....

वाळू सारखी माझ्यातून,

ती हळू हळू सरकत गेली.....

मी तिच्यासाठी झूरत असताना देखील,

मलाच अनोळखी सारखी ती जाणून बुजून विसरत गेली.....

खुप प्रयत्न केले मी,

तिला ह्रदयात साठवून ठेवायचे.....

पण ???

माझे मलाच कळले नाही,

माझे मलाच समजले नाही कधी.....

मी तिला मनात ठेवत असताना,

माझ्या मनातून ती उतरत गेली.....

ती उतरत गेली.....


स्वलिखित -

© सुरेश सोनावणे.....

No comments: