कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा......
स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस
स्वप्नात का होईना एकदा येऊन जा......
हात रिकामा भासतोय मला
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा.......
बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू
त्या गर्दीत भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ........
तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही
एकदा फक्त येऊन त्या वेड्या मनाला हे समजावून जा ...
फक्त एकदा येऊन जा.........
फक्त एकदा येऊन जा .......
No comments:
Post a Comment