साद दिली तरी आता प्रतिसाद येत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
तुझ्या सोबत असताना दिवस क्षणभर वाटत होते
माझ्या खट्याळपणाने तुझे गोड हास्य दाटत होते
आठवायचे म्हटले तरी ते हसू आठवत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
रोज तुला पाहण्याची मनात आस जागत होती
कुठेही जाताना वाट तुझ्या घराजवळून जात होती
आता भेटावेसे वाटले तरी ती वाट उमजत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
शब्द तुझे ते लाघवी मला गुंग करत होते
दिवसागणिक मला तुझ्या जवळ आणत होते
आता त्या शब्दांचे अर्थच समजत नाही
इतकी दूर गेलीस की तुझी याद येत नाही
काही क्षणांची ओळख आपली मैत्रीत बदललीस
काही क्षणांत प्रेम जडलं अन् काही क्षणांत विसरलीस
आठवले तरी त्या क्षणांची जादू जाणवत नाही
इतकी दूर गेलीस की तुझी याद येत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
तुझ्या सोबत असताना दिवस क्षणभर वाटत होते
माझ्या खट्याळपणाने तुझे गोड हास्य दाटत होते
आठवायचे म्हटले तरी ते हसू आठवत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
रोज तुला पाहण्याची मनात आस जागत होती
कुठेही जाताना वाट तुझ्या घराजवळून जात होती
आता भेटावेसे वाटले तरी ती वाट उमजत नाही
इतकी दूर गेलीस कि तुझी याद येत नाही
शब्द तुझे ते लाघवी मला गुंग करत होते
दिवसागणिक मला तुझ्या जवळ आणत होते
आता त्या शब्दांचे अर्थच समजत नाही
इतकी दूर गेलीस की तुझी याद येत नाही
काही क्षणांची ओळख आपली मैत्रीत बदललीस
काही क्षणांत प्रेम जडलं अन् काही क्षणांत विसरलीस
आठवले तरी त्या क्षणांची जादू जाणवत नाही
इतकी दूर गेलीस की तुझी याद येत नाही
No comments:
Post a Comment