Sunday, February 23, 2014

तू असतीस तर | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....

तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....

तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....

तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....

तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०२-२०१४...
सकाळी १०,३२...
© सुरेश सोनावणे.....

No comments: