Saturday, February 15, 2014

मी असं सांगत नाही की प्रेम करू नका | Prem Kavita | प्रेम कविता | Marathi Kavita | मराठी कविता

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

पण ???

तिनेही करावं प्रेम,
म्हणुन दबाव आणु नका.....

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

पण ???

स्वप्न पूर्ण करताना,
मागे कधी फिरू नका.....

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

पण ???

प्रेम केलं तर तिला,
सोडून कधी जाऊ नका.....

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

पण ???

तिच्या सुःखापुढे इतर कसलाही,
विचार करू नका.....

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

पण ???

स्वःताच्या स्वार्थासाठी,
तिच्या जिवाशी कधी खेळू नका.....

मी असं सांगत नाही,
की प्रेम करू नका.....

प्रेम करतोय असं दाखवून,
तिचा बळी तरी घेऊ नका.....


© सुरेश सोनावणे.....

No comments: