Showing posts with label मी प्रेमात पडलो. Show all posts
Showing posts with label मी प्रेमात पडलो. Show all posts

Sunday, February 23, 2014

आमच्या ब्रेक-अप नंतर | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

आमच्या ब्रेक-अप नंतर,
मी खुप खुप रडलो,
तिला मनवण्यासाठी,
तिच्या पायाही पडलो.....

तिला कदर नव्हती प्रेमाची,
जिवंतपणी गेलो गाडलो,
तिला तर माहीतचं नाही,
तिच्यासाठी किती मी झूरलो.....

एकदा विचार केला,
कायमचा निरोप घ्यावा जगाचा.....

कारण ???

तिचं माझी होणार नाही,
जिच्यासाठी मी जगाशी नडलो,
आयुष्य माझे संपवताना,
कुणी तरी खुप खुप समजावले.....

ती ही मैत्रिण होती माझी,
जिने मला प्रेम काय असते शिकवले,
खरचं आता आयुष्य जगावेसे वाटते मला,
जन्मदात्यांच्या खातिर मी आज जगलो.....

पुन्हा कुणी तरी मुलगी,
आली आयुष्यात माझ्या,
आणि खरचं मला कळले नाही,
पुन्हा नकळत कसा मी प्रेमात पडलो.....

मी प्रेमात पडलो...!! :-D

© सुरेश सोनावणे.....