Saturday, February 15, 2014

असे असते का प्रेम | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

दुरवर असून ति माझ्या
सतत जवळ असते
स्पर्श जाणवतो तिचा
मनी ती वसते
ह्रुदयातही धड़कते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
भावनाना रोखता येत नाही
वहाताच रहातात त्या
कसे थांबउ त्याना
फुटलेल्या बांधासारखे
ओसंडुन वाहाते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
शब्दांच्या पलीकडले
काहीतरी आहे आमच्यात
खुप बोलावेसे वाटते
पण बोलता नाही येत
अबोल्यात फसते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
जवळ नसते ती तरी
प्रत्येक क्षणांत असते
डोळे मिटल्यानंतरही
तिचीच छबि दिसते
स्वप्नातही ठसते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
पहाटे जागेपणी
देवाआधी तीच स्मरते
प्रार्थना होते त्याची पण
भक्ति तिचीच असते
आत्म्याला हरवते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
दुराव्यताही आनंद असतो
विचारांची साथ असते
अशा ह्या नात्याला
मयेचिही ओढ़ असते
नाते कुठलेही असो
घट्ट बनवते का प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम..
लिहिण्यास शब्द अनेक
तरी अपुरे पडतात
तिच्यविणा जीवनाचे
सुर अधूरे राहतात
नको लाऊ वेळ
साद घालते हे प्रेम
असे असते का प्रेम
असे होते का प्रेम...
असे होते का प्रेम...

... अंकुश नवघरे
... Ankush Navghare.

No comments: