जाताना एक पक्षी सांगत होता झाडाला,
मी परतुन येणार नाही सावर स्वताला.
" तु मला आश्रय दिला, माझ्यावर मायेचा वर्षाव केला.
आलेल्या संकटांपासून वाचवले, तेव्हाच माझ्या डोळ्यातील आश्रु तु तुझ्या मनात साठवले."
" पण............. आता मी कधीच येणार नाही परत,
तु हि बसू नको माझी आठवण काढत."
त्याच वेळी झाड होत विचार हा करत , गेलेली माणस कधीच येत नाही का परत ?
चार दिवसांचा खेळ मांडून, पटकन उडून जातात.
चार क्षणांचा मेळ घालून, आठवण ठेवून जातात.
आपल्यापासुन दुर जाऊन आपल्या मनात वावरत असतात.
आपल्या मनात वावरतांना, आश्रुंद्वारे प्रकट होत असतात.
जगण्याच धैर्य देवून, पुन्हा दुर निघुन जातात.
काहीतरी आठवण ठेऊन, मनात साठुन राहतात.
आठवण त्यांची काढताक्षणी, आश्रु डोळ्यात उभे राहतात.
शब्द सगळे आठवून पुन्हा, जगण्याच धैर्य देतात.
झाडच हे बोलन ऐकून, पक्षी दुर उडून जातात.
झाड मात्र त्यांच्या पाठमोऱ्या सावल्यांकडे, स्तब्द मनाने निशब्द होऊन पाहत राहतात.
पुन्हा त्या आठवणी काढून, स्वतातला अश्रूंच्या पावसात भिजवून घेतात.

No comments:
Post a Comment