Monday, April 12, 2010
बाबा मी चुकलो
बाबा मी चुकलो
माफ़ मला कराल का
तुम्हाला,
"बाबा" बोलायला मी लाजलो
शिक्षा मला दयाल का
...उपास मारीचि वेळ आली
हमालीच काम केलत
स्वता: उपाशी मरून
आम्हाला पोट भर जेऊ घातलत
स्वता: फाटकी कपड़े घालून
आम्हाला अंगभर कापड दिलित
आम्ही आजारी पडलो तर
रात्रभर दवाखाण्याच्या बाहेर
रडत रडत .... रात्र काढलित
स्वतहाच्या अंगातील रक्त देऊन
मला तुम्ही वाचवलत
नको तेवढा पैसा ओतून
खुप खुप शिकवलत
आज मी खुप मोठा झालोय
एक दिवस तुम्ही
मळकी कपड़े घालून
माझा जेवणाचा डब्बा
घेउन
कॉलेज मधे आलात
कोलेज मधल्या मुलींनी
"हे कोंन" आहेत अस विचारल
बाबा तुमची ओलख
"आमच्या शेजारचे "आहेत
अशी दिली ........
बाबा ....मी चुकलो
माफ़ मला कराल का
तुम्हाला बाबा बोलायला
मी लाजलो ...शिक्षा मला दयाल का
शिक्षा मला दयाल का
आय लव यू बाबा .......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment