Monday, April 12, 2010

Marathi Maitri Kavita (Marathi Friendship Poem) : मित्र मोठे होऊ लागलेत

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
कामाच्या एस एम् एस शिवाय एकही विनोदी एस एम् एस येत नाही.
मित्रांच्या कॉल साठी आता मीटिंग ही मोड़ता येत नाही.
 बहुतेक कामाचा व्यापच आता सर्व जागा व्यापयाला लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 फालतू विनोदावर ही हसण्याची सवय आता मोडायला लागलीये,
 चेष्टेने केलेली ही चेष्टा आजकाल भुरातीगिरी वाटायला लागलीये .
आणि वाटतय की आजकाल धिंगाना ही कमी होऊ लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 पूर्वी वेळ सर्वांसाठी असायचा आता स्वत साठीचा वेळ वाढायला लागलाय.
 पजेशनचा वेळ येइल तसा रूम मधील कालवा दडायला लागलाय.
 ट्रिप चा रविवार आता नविन जोडीदार शोधण्यात जाऊ लागलाय .

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 मान्य आहे स्वतसाठीही जीवन जगायच असत, मग त्यासाठी कुणाला खरच दुखवयाचे असत
पण हे मात्र खर आहे की मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढू लागलाय .
मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!

No comments: