Monday, April 12, 2010

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं...

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं... कारण हे एकमेव नातं असं आहे की, तिथे हुकुमशाही नसते. मालकीची भावना नसते; तर जीवनाचा सुर असतो. हुकुमाशाहिचा सुर उमटला की, जाणावं वाद होणार आहेत... मैत्रीचं नातं फक्त मनातूनच फुलतं.... श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... त्याला कुठलंच बंधन नसतं. ते फक्त जीवाची ओढ लावतं ... सगळया भावना समजून उमजतं, श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... मैत्री मोर पिसाऱ्या सारखी फुलवयाची असते... मैत्री कधीच पाटी वरच्या अक्षरांसारखी पुसायची नसते... मैत्री एखाद्या दवबिंदुप्रमाणे असते. सुर्याच्या कोवळया उन्हात चमकते; पण संशयाची थोडीशी जरी झुळूक आली तरी ती नष्ट होते, म्हणुनच एक वेळ सर्व जग जिंकण सहज शक्य आहे; पण मन जिंकण अत्यंत कठीण आहे...

No comments: