Monday, April 12, 2010

अस ही प्रेम होत....

अस ही प्रेम होत,
नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.......
 रबने बनायीं जोड़ी म्हणतात ना त्यातलच हे सार असत,
 सर्व काही विधिलिखित असत.....
 जे आपल्याला हव असत ते आपल्याला कधीच मिळत नाही
जे आपल्याला अपेक्षित नसत , तेच आपणास मिळत असत......
 संध्या आणि शाम यांच ही असच काहीस होत,
दोघांत जीवाभावाची मैत्री "हो!नक्कीच मैत्रीच होती".....
 मैत्री मैत्री म्हणता शामने अशीच एकदा संधि साधली
 "तुझ्या वर माझ खुप प्रेम आहे" असाच काहीस म्हणाला, " हो ! नक्की असाच म्हणाला होता ".....
 संध्याला काहीच समजेनास झाल, "मी तर तुला माझा चांगला मित्र समजते" हा! हा!
नेहमी सारखीच ही सुधा एक तर्फी प्रेम कथा......
 संध्या आणि शाम त्या दिवसा पासून नाहीसे झाले,
मैत्री संपल्या सारखीच असावी असच काहीस झाल ...
 दोन वर्षाने एक वादल आल्यासारखच काहीस घडल होत,
शाम पुन्हा संध्याच्या आयुष्यात आला होता ना त्याने संध्याला बोलावल , 'हो!नक्की बोलावल होत "......
 पण यंदा शाम काहीच बोलला नाही तो विसरला असेल का तिला?
 पण प्रेमाची लहर जाणवत होती,
संध्याच्या डोळ्यात प्रेमाआश्रू दिसत होत, "हो! नक्की दिसत होत !"......
 "कुठे होतास रे? त्या दिवसा पासून"
 "कुठेच नाही! इथेच होतो तुझ्या आठवणी आहेत ना तिथेच"
"कस सांगू रे तुला मी ?आज मी किती खुश आहे"
" नको सांगुस! नेहमी सारख जानवल मला तुझ्या त्या अबोल भावना पण इतका वेळा का लावलास ?"
 "कदाचि मी तेव्हा स्वताचा विचार केला असेल" ......
 अस ही प्रेम होत, नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.....

No comments: