मला एकदाच येऊन भेट.
माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.
काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा, ठाव कुठंही जडत नाही.
निस्तेज ह्या ह्रदयाला, तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला, तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.
तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग, फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट.

No comments:
Post a Comment