Monday, April 12, 2010
मे महिन्याच्या सुट्टी मधे
मे महिन्याच्या सुट्टी मधे
मी मुंबई ला आलो
गोड तीच रूप पाहून
अगदी भाराउन गेलो
माझ्या मनाला तिच्या कड़े पाहून
खुप आनंद झालेला
घरी कधी घेउन जातोय हाच
विचार पडलेला
पण वाटल आई बाबाना न विचारता
कस घेउन जाव
आणि घरी गेल्यावर आई बाबांच बोलन कोणी खाव
मनात म्हटल ही
आपल्या बरोबर येइल का
आली तरी ही आपल्या गावाकडे राहिल का
पण जाऊद्यात म्हटल , जरा डेरिंग केलि
आणि तिला घेउन आमची स्वारी घराकड़े आली
घरा मधे तिला पाहताच आई खुप रागविली
बाबांन तर माझी लायकीच काढली
कार्ट्याला कमवाय्ची अक्कल नाही आणि
अशी नाटक करतोय , ताई बोलली दादा अस का केलस .....
सग्ल्यांच मी निमूट पने ऐकून घेत होतो
तिच्या कड़े पाहून हळूच हसत होतो
तिच्या सोबत देवलात जात असताना
सगलेच पाहत होते ....जास्त दिवस नाही टिकणार
असे बोलत होते
मी देवलात गेलो ती बाहेरच होती
आणि दर्शन करूंन आलो तर
ती गायब झाली होती सग्ल्यान्ना विचारल पण
कोनच सांगत न्हवत
मन माझ आता कशावरच लागत न्हवत
तिच्या विरहाने पायाला चटके
खुप लागत होते ,
अहो खड़े तर रस्त्या वरुण चालूनच देत न्ह्व्ते
( कृपया माझी चप्पल हरवली आहे आणून दया..विनाकारण भांडंन होइल )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment