Monday, April 12, 2010

देवा.....!

देवा.....! किती दिवस घालू तुला साकड का आहे प्रेमाचं अन माझ वाकड....... बघ एकदा तरी माझ्याकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! आता वैताग आलाय आतल्या आत झुरण्याचा...... जुना झालाय फंडा तिच्यावर लाईन मारण्याचा...... बघ कुठतरी तोडक -मोडक होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! किती दिवस मी देवा स्वप्नातच झुरू..... किती वेळ मनातल्या मनात मनालाच हाक मारू..... असेल का कुणी खरोखर वेड-वाकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! वय चोवीस झालय तिला शोधताना..... जीव कासावीस झालाय तिला बघताना मनाचा गारवा बघ असू दे कसलंही रूपड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! फोन नको करू देवा पण miss call तरी दे..... पत्र नको पाठवू नको पण एक SMS तरी दे...... हसतात ऐकत बघून कॉलेज मधली माकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......!

No comments: