Monday, April 12, 2010

Marathi Prem Kavita : होउन गारवा आयुष्यात ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली
 मी तर पाकळ्यांची आस केली बनुन सडा पारीजात ती आली
 रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां सोडून तीची पाउलवाट ती आली
 बुडता बुडता किनारा गवसला मला होऊन माझा आधार लाट आली
 आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला घेऊन मग मेघातुन बरसात ती आली
 आजवर या कुट्ट काळोखात जगलो होउन प्रकाश घरी साजंवात ती आली
 आसवात कधी आभाळ पाहील नाही उधळून चादंण्यात चादंरात ती आली
 कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली
 हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा होऊन हिरवळ या श्रावणात ती आली

No comments: